ओला इलेक्ट्रीक स्कुटरच्या बुकिंगला जोरदार प्रतिसाद ; जगात बनविला रेकॉर्ड, जाणून घ्या

 कंपनी बुकिंग केलेल्या ग्राहकांना टप्प्याटप्प्याने स्कूटरची अपडेट देत राहणार आहे. अद्याप कंपनीने स्कूटची किंमत जाहीर केलेली नाहीय. भारतातील ईव्ही क्रांतीची ओलाने स्फोटक सुरुवात केली आहे. जवळपास 1 लाखांहून अधिक लोकांनी याचे आगाऊ बुकिंग केले आहे, असे अग्रवाल यांनी ट्विट केले आहे.

    Ola e-scooter ला 24 तासांत 1 लाखांहून अधिक बुकिंग मिळाल्याचा दावा केला आहे. ओला इलेक्ट्रीकचे (Ola electric ) सीईओ भाविश अग्रवाल यांनी शनिवारी ओला इलेक्ट्रीक स्कुटरच्या (Ola e-scooter booking) बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. याचबरोबर ही स्कूटर जगातील सर्वाधिक आगाऊ बुकिंग मिळविलेली स्कूटर बनल्याचे ते म्हणाले.

    कंपनी बुकिंग केलेल्या ग्राहकांना टप्प्याटप्प्याने स्कूटरची अपडेट देत राहणार आहे. अद्याप कंपनीने स्कूटची किंमत जाहीर केलेली नाहीय. भारतातील ईव्ही क्रांतीची ओलाने स्फोटक सुरुवात केली आहे. जवळपास 1 लाखांहून अधिक लोकांनी याचे आगाऊ बुकिंग केले आहे, असे अग्रवाल यांनी ट्विट केले आहे.

    ओला ईलेक्ट्रीकने 15 जुलै रोजी 499 रुपयांत स्कूटर बुक करण्याची घोषणा केली होती. आमच्या पहिल्याच ईव्ही वाहनाला मोठा प्रतिसाद दिल्याने उत्सुकता वाढली आहे. ग्राहक आता पर्यायी इंधनाकडे वळत आहेत, याची ही नांदी आहे, असे ते म्हणाले.

    अद्याप कंपनीने स्कूटरबाबत कोणत्याही स्पेसिफिकेशंसची घोषणा केली नाही. परंतु ज्यापद्धतीने कंपनीने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलंय की, ही फक्त सुरुवात आहे. स्कूटरची ड्रायव्हिंग रेंज, चार्जिंग टाइमसह स्कूटर डिलिवरी टाइमलाइन आणि स्पेसिफिकेशंस याबाबत अधिक माहिती लवकरच दिली जाणार आहे.