भारतात लाँच झालं Studdsच ढासू हेल्मेट, वेगात असतानाही साधता येणार जबरदस्त संतुलनाचा ताळमेळ

यात विविध प्रकारचे आकर्षक फीचर्स देण्यात आले आहेत. तुम्ही कितीही वेगाने गाडी चालवत असलात तरी हे हेल्मेट घातल्यानंतर तुम्हाला याचा त्रास किंवा ओझं अजिबातच वाटणार नाही.

    नवी दिल्ली : स्टड्स एक्सेसरीज लिमिटेड (STUDDS Accessories Ltd) ने भारतात आपलं नवीन हेल्मेट (शिरोवेष्टण) लाँच केलं आहे. याचं नाव Studds Thunder D9 Decor असं आहे. हे एक एक फुल-फेस हेल्मेट आहे. कंपनीने भारतीय मार्केटमध्ये याची किंमत 1,895 रुपये ठेवली आहे. याच्या फीचर्सबाबत सांगायचं झालं तर, यात सिलिकॉन कोटेड क्विक रिलीज वाइझर, एरोडायनेमिक डिझाइन, रेगुलेटेड डेंसिटी EPS, हाइपोएलर्जिक आणि रीप्लेसेबल लाइनर, टॉप एयर वेंट्स, चिन एयर वेंट्स आणि क्विक रिलीज चिन स्ट्रेप दिले आहेत. तर, उत्कृष्ट राइडिंग अनुभव आणि वेंटिलेशनसाठी हेल्मेट मध्ये एग्झॉस्ट पोर्ट्सही दिले आहेत. कंपनीचा दावा आहे की मजबूती आणि अतिरिक्त सुरक्षेसाठी या हेल्मेटच्या आउटरशेल मध्ये थर्मोप्लास्टिक इंजेक्ट करण्यात आलं आहे.

    Studds Thunder D9 Decor: साइझ

    हे फुल-फेस हेलमेट भारतीय मार्केटमध्ये तीन साइझमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. यात,

    570 मिलीमीटर- मीडियम
    580 मिलीमीटर- लार्ज आणि
    600 मिलीमीटर- एक्सट्रा लार्ज साइझचा समावेश आहे.

    Studds Thunder D9 Decor: फिनिश ऑप्शन

    कंपनीने आपले हे नवीन फुल-फेस हेलमेट ग्लॉस आणि मैट दोन्ही फिनिशमध्ये लाँच केले आहे.

    Studds Thunder D9 Decor: कलर डीकेल्स

    भारतीय मार्केटमध्ये हे फुल-फेस हेलमेट 6 कलर डीकेल ऑप्शन्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे यात,
    Black N2
    Black N5
    Black N10
    Matt Black N2
    Matt Black N5
    Matt Black N10

    हेल्मेटमध्ये आरामदायक इनर पॅडिंगसाठी उच्च दर्जाचे फॅब्रिक देण्यात आलं आहे तर, कंपनीचं म्हणणं आहे की, घामामुळे होणाऱ्या ॲलर्जी पासून बचाव व्हावा म्हणून यात हाइपोअलर्जिक लाइनर देण्यात आला आहे.

    studds thunder d9 decor with 6 color decal options helmet launched in india price of rupees 1895