टाटाची कोणतीही मोटार आता फक्त ७९९ रुपयांच्या हफ्यात? काय म्हणताय…तर मग जाणून घ्या

उत्सवाच्या हंगामात विक्री वाढविण्यासाठी आणि उत्पादनाला प्रवेश सुलभ करण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने 'ग्रॅज्युएट स्टेप अप स्कीम' आणि 'टीएमएल फ्लेक्सी ड्राइव्ह स्कीम' या दोन नवीन योजना सुरू केल्या आहेत. या दोन्ही योजना नोव्हेंबर २०२० अखेरपर्यंत उपलब्ध होतील, असे कंपनीने म्हटले आहे.

टाटा मोटर्सने (TATA Motors)  एचडीएफसी (HDFC BANK) बँकेबरोबर करार केला आहे. या अंतर्गत टाटा मोटर्सने २ फायनान्स (Finance Plan) योजना आणल्या आहेत. एका योजनेंतर्गत ७९९ रुपयांच्या सुरुवातीच्या हप्त्यावर १ लाख रुपये कर्ज (Loan) दिले जात आहे, तेथे लोकांना वर्षातून तीन वेळा किमान हप्ता भरण्याची संधी दिली जाईल. त्यामुळे उत्सवाच्या हंगामात जर तुम्ही तुमच्या घरी नवी चारचाकी आणण्याचा विचार करत आहात, तर टाटा मोटर्स तुमच्या खिशाची काळजी घ्यायला सज्ज आहे.

टाटा मोटर्स कमीत-कमी ईएमआयमध्ये कार घरी नेण्याची ऑफर देत आहेत. ग्राहक फक्त ७९९ रुपयांच्या किमान हप्त्यात टाटा मोटर्सची कोणतीही कार खरेदी करू शकतात. या योजनेमुळे टाटा मोटर्सच्या भारत स्टेज-६ मध्ये सर्व कार, स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) आणि इलेक्ट्रिकल वाहनांचा फायदा होईल.

एका निवेदनात टाटा मोटर्सने म्हटले आहे की, उत्सवाच्या हंगामात विक्री वाढविण्यासाठी आणि उत्पादनाला प्रवेश सुलभ करण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने ‘ग्रॅज्युएट स्टेप अप स्कीम’ आणि ‘टीएमएल फ्लेक्सी ड्राइव्ह स्कीम’ या दोन नवीन योजना सुरू केल्या आहेत. या दोन्ही योजना नोव्हेंबर २०२० अखेरपर्यंत उपलब्ध होतील, असे कंपनीने म्हटले आहे.

या योजनांमुळे ग्राहकांना कारचे हप्ते भरण्यास सुलभता येईल. त्याचबरोबर एक्स-शोरूम किंमतीच्या १०० टक्के लोन या फायनान्स योजनेंतर्गत घेतले जाऊ शकते. असे टाटा मोटर्सचे म्हणणे आहे.