टाटा मोटर्सने आणली मॅजिक एक्स्प्रेस ॲम्ब्युलन्स; कॉम्पॅक्ट ॲम्ब्युलन्सच्या विभागात प्रवेश ; राष्ट्राची सेवा करण्याचा आहे मानस

या वाहनाच्या आटोपशीर आकारमानामुळे भारतीय रस्त्यांवर ते हलवणे खूपच सुलभ आहे, परिणामी आपत्कालीन उपचारांसाठी रुग्णांना वेगाने हलवण्यासाठी ती उपयुक्त आहे. पर्यायाने ती प्राण वाचवणारी ॲम्ब्युलन्स ठरणार आहे.

  • आपल्या अत्याधुनिक आरोग्यसेवा वाहतूक उत्पादनांच्या माध्यमातून राष्ट्राची सेवा करण्यासाठी पोर्टफोलिओचा विस्तार

मुंबई : टाटा मोटर्स या भारतातील सर्वांत मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने मॅजिक एक्स्प्रेस ही रुग्णांची वाहतूक करणारी ॲम्ब्युलन्स आणली आहे. इकोनॉमी ॲम्ब्युलन्स विभागातील आरोग्यसेवा वाहतुकीसाठी ही ॲम्ब्युलन्स खास डिझाइन करण्यात आली आहे. मॅजिक एक्स्प्रेस ॲम्ब्युलन्स ही वैद्यकीय व आरोग्याशी संबंधित सेवांना सहाय्य करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. कोविड-१९ साथीच्या काळात या सेवांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या वाहनाच्या आटोपशीर आकारमानामुळे भारतीय रस्त्यांवर ते हलवणे खूपच सुलभ आहे, परिणामी आपत्कालीन उपचारांसाठी रुग्णांना वेगाने हलवण्यासाठी ती उपयुक्त आहे. पर्यायाने ती प्राण वाचवणारी ॲम्ब्युलन्स ठरणार आहे. रुग्ण आणि सहाय्यकांना पुरेशी जागा, सुरक्षितता व आराम पुरवण्याच्या दृष्टीने हे वाहन एर्गोनॉमिक पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे आणि एआयएस १२५ नियमांचेही पूर्णपणे पालन करणारे आहे.

टाटा मोटर्सच्या एससीव्ही अँड पीयू उत्पादन श्रेणीचे उपाध्यक्ष विनय पाठक यावेळी म्हणाले, “मॅजिक एक्स्प्रेस ॲम्ब्युलन्स सर्वांपुढे आणून टाटा मोटर्स सर्वोत्तम आरोग्यसेवा वाहतूक सुविधा पुरवण्याचा आपला वायदा पूर्ण करत आहे. अशा वाहनांच्या आवश्यकता समजून घेण्यासाठी टाटा मोटर्स वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत काम करत होती आणि रुग्णाच्या वाहतुकीसाठी आवश्यक अशा सर्व गरजांची पूर्तता करणारे एक टेलर-मेड वाहन आम्ही सर्वांपुढे आणले आहे. या नवीन विभागात प्रवेश करून टाटा मोटर्सने ॲम्ब्युलन्स विभागातील उत्पादनांची श्रेणी अधिक विस्तारली आहे. यामध्ये परवडण्याजोग्या दरातील, खात्रीशीर आणि सर्व नियमांची पूर्तता करणाऱ्या रुग्णवाहिकांचा समावेश आहे.”

आरोग्यसेवा उत्पादनांची विस्तृत श्रेणी देऊ करणारी टाटा मोटर्स ही देशातील एकमेव उत्पादक कंपनी आहे; परवडण्याजोग्या किंमतीतील मॅजिक एक्स्प्रेस ॲम्ब्युलन्स, टाटा विंग ॲम्ब्युलन्स या रुग्णवाहिका आरोग्यसेवा क्षेत्राच्या विविध वैद्यकीय गरजांची पूर्तता करणाऱ्या आहेत. यात मूलभूत जीवनरक्षक, प्रगत जीवनरक्षक आणि मल्टी-स्ट्रेचर ४१०/२९ ॲम्ब्युलन्सचा समावेश आहे.

मॅजिक एक्स्प्रेस ॲम्ब्युलन्स ही ऑटो-लोडिंग स्ट्रेचर, मेडिकल कॅबिनेट, ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था, डॉक्टरांसाठी आसन व अग्निशमन व्यवस्थेसारख्या अत्यावश्यक उपकरणांनी सुसज्ज आहे. शिवाय अंतर्गत प्रकाशयोजना, आगप्रतिबंधक अंतर्गत रचना आणि उद्घोषणेची व्यवस्थाही या रुग्णवाहिकेत आहे. ही रुग्णवाहिका एआयएस प्रमाणित रेट्रो रिफ्लेक्टिव डेकल्स आणि सायरनसह बेकन लाइटने सुसज्ज आहे. चालकाचा आणि रुग्णाचा भाग पार्टिशन घालून वेगळा करण्यात आला आहे. यामुळे सुरक्षितता पक्की होते. विशेषत: कोविड-१९ रुग्णांनाची वाहतूक करण्यासाठी हे अत्यावश्यक आहे. रुग्णवाहिकेला सर्वोत्तम दर्जाच्या ८०० सीसी टीसीआयसी इंजिनचे बळ आहे. हे इंजिन ४४ हॉर्सपॉवर ऊर्जा व ११० एनएम टॉर्क निर्माण करते. याशिवाय, दमदार बांधणीमुळे रुग्णवाहिकेची किमान देखभाल पुरेशी ठरते. म्हणजेच हे वाहन उत्तम कामगिरी करते पण ते बाळगण्याचा खर्च कमी आहे. अर्थातच हे कोणताही त्रास न देणारे वाहन आहे.

मॅजिक एक्स्प्रेस रुग्णवाहिकेमध्ये अत्यंत यशस्वी अशा मॅजिक प्लॅटफॉर्मचा लाभ उचलण्यात आला आहे. भारतातील दुर्गम भागातील सार्वजनिक वाहतूक विभागात हा प्लॅटफॉर्म गेल्या १३ वर्षांपासून एखाद्या मापदंडासारखा आहे. याशिवाय टाटा मोटर्सचे ‘पॉवर ऑफ सिक्स’ तत्त्वज्ञान ध्यानात ठेवून टाटा मॅजिक रुग्णवाहिकांचे इंजिनीअरिंग करण्यात आले आहे. त्यामुळे या रुग्णवाहिका अत्यंत लाभदायक आहेत, वाहनांची कामगिरी दमदार आहे, ड्रायव्हिंग आरामशीर आहे, रुग्णवाहिका सोयीस्कर व कनेक्टेड आहेत, सुरक्षित आहेत आणि त्या बाळगण्याचा एकूण खर्च (टीसीओ अर्थात टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप) तुलनेने कमी आहे. मॅजिक एक्स्प्रेस ॲम्ब्युलन्स हे रुग्णालये, नर्सिंग होम्स, सरकारी आरोग्य खाती, आरोग्यविषयक काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था किंवा भारतीय आरोग्यसेवा परिसंस्थेचा भाग असलेल्या स्टार्टअप्स या ग्राहकवर्गांसाठी आदर्श वाहन ठरेल. टाटा मोटर्स एससीव्ही प्रवासी श्रेणीतील वाहनांना २ वर्षे/७२००० किलोमीटर्सची वॉरंटी आहे.

टाटा मोटर्स संपूर्ण सेवा २.० उपक्रमाखाली अनेकविध व्हेइकल केअर कार्यक्रम, ताफा व्यवस्थापनाची सोल्युशन्स, वार्षिक देखभाल पॅकेजेस आणि व्यावसायिक वाहनांची पुनर्विक्री सेवा देऊ करते. या उपक्रमातील काही अत्यंत वेगळ्या सुविधा म्हणजे वॉरंटीखालील सर्व वाहनांसाठी टाटा ॲलर्ट २४X७ रोडसाइड असिस्टन्स सुविधा, टाटा मोटर्स विम्याचे संरक्षण असलेली सर्व अपघातग्रस्त वाहने १५ दिवसांच्या आत दुरुस्त करून देणारी टाटा कवच सुविधा, टाटा झिप्पीखाली कमाल अपटाइमची हमी देणारी सर्व्हिस टर्नअराउंड टाइम गॅरंटी सुविधा होय.

ठळक वैशिष्ट्ये:

  • रुग्णवाहिका प्रवर्गासाठी सरकारने घालून दिलेल्या एआयएस १२५ नियमांची पूर्तता करणारे उत्पादन
  • शहरातील ड्रायव्हिंगची स्थिती लक्षात घेऊन आटोपशीर आकारमान आणि हलवण्यास सुलभ
  • रुग्ण आणि चालकाखेरीज अन्य ५ सहाय्यकांना सामावून घेण्याची क्षमता
  • संपूर्ण सेवा २.०च्या माध्यमातून विक्रीउत्तर सेवेची हमी आणि टाटा समर्थ कार्यक्रमाखाली चालकाला लाभ
  • रुग्णांची वाहतूक करण्यासाठी अनेकविध उत्पादने देणारी देशातील एकमेव उत्पादन कंपनी