टाटा मोटर्सने आणली अत्याधुनिक, स्मार्ट ट्रक्सची अल्ट्रा स्लीक टी-सीरिज श्रेणी; कोणाला भारी पडणार तुम्हीच वाचा

१९००मिमी रुंदीचे एक आटोपशीर केबिन यात आहे. हे केबिन श्रेष्ठ ड्रायव्हिंगला मदत करते, तसेच शहरातील मर्यादित जागेमध्येच हालचाल शक्य करते. त्याचप्रमाणे हालचाल अत्यंत सुलभ करणारी स्मार्ट फीचर्स यात आहेत. भविष्यकाळासाठी सज्ज अशा या वाहनांची न्यू-जनरेशन श्रेणी टाटा मोटर्सच्या मान्यता प्राप्त ‘पॉवर ऑफ सिक्स’ तत्त्वाचे समर्थन करते.

  • वैविध्यपूर्ण शहरी उपयोजनांसाठी अल्ट्रा टी.६, टी.७ आणि टी.९ या तीन मॉडेल्समध्ये उपलब्ध

मुंबई : टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादन कंपनीने इंटरमिडिएट आणि कमी वजनाच्या व्यावसायिक ट्रक्सची (आयअँडएलसीव्ही)नवीनतम श्रेणी, अल्ट्रा स्लीक टी-सीरिज, सर्वांपुढे आणली आहे. या उत्पादनांचे डिझाइन आणि इंजिनीअरिंग शहरी वाहतुकीच्या समकालीन गरजांना अनुकूलपद्धतीने करण्यात आले आहे. टी.६, टी.७आणि टी.९अशा तीन मॉडेल्समध्ये उपलब्ध असलेली ही पूर्णपणे नवीन अल्ट्रा स्लीक श्रेणी १० ते २० फूट अशा वेगवेगळ्या लांबीच्या डेक्समध्ये उपलब्ध आहे, जेणेकरून कोणत्याही उपयोजनासाठीही उत्पादने वापरता येतील.

१९००मिमी रुंदीचे एक आटोपशीर केबिन यात आहे. हे केबिन श्रेष्ठ ड्रायव्हिंगला मदत करते, तसेच शहरातील मर्यादित जागेमध्येच हालचाल शक्य करते. त्याचप्रमाणे हालचाल अत्यंत सुलभ करणारी स्मार्ट फीचर्स यात आहेत. भविष्यकाळासाठी सज्ज अशा या वाहनांची न्यू-जनरेशन श्रेणी टाटा मोटर्सच्या मान्यता प्राप्त ‘पॉवर ऑफ सिक्स’ तत्त्वाचे समर्थन करते. वाहनाची श्रेष्ठ दर्जाची कामगिरी, आरामदायी ड्रायव्हिंग, सोय व कनेक्टिव्हिटी, सुरक्षितता आणि हे सगळे वाहन बाळगण्याचा खर्च (टीसीओ) कमी ठेवून साध्य करणे हे टाटा मोटर्सचे तत्त्व आहे.

टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहन व्यवसाय विभागाचे अध्यक्ष गिरीश वाघ अल्ट्रा स्लीक टी-सीरिज श्रेणी लाँच करताना म्हणाले,“व्यावसायिक वाहनांच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून टाटा मोटर्सने अधिक स्मार्ट, भविष्य काळासाठी सज्ज उत्पादने व सोल्युशन्स सर्व विभागांमध्ये आणून सातत्याने नवीन मापदंड स्थापन केले आहेत. अल्ट्रा स्लीक टी-सीरिज श्रेणीने शहरी मालवाहतुकीमध्ये एक नवीन प्रवाह आणला आहे. हे ट्रक्स अत्यंत आटोपशीर आणि स्मार्ट आहेत. त्यामुळे त्यांची हालचाल अधिक वेगाने करता येते आणि कमी वेळात अधिकाधिक फेऱ्या करून ही वाहने अधिक उपयुक्तता सिद्ध करतात, अधिक उत्पन्न मिळवून देतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त अल्ट्रा प्लॅटफॉर्मवर बांधणी केलेल्या या ट्रक्सचे इंजिनीअरिंग अनेकविध उपयोजनांच्या दृष्टीने करण्यात आले आहे.”

अल्ट्रा स्लीक टी-सीरिज श्रेणीमध्ये भविष्यकालीन शैली व आरामदायी फीचर्सचा संयोग साधण्यात आला आहे. याचा आवाज, कंपने आणि कठोरपणा (एनव्हीएच) लक्षणीयरित्या कमी आहे, गर्दीच्या तसेच अरुंद रस्त्यांवर या ट्रक्सची हालचाल सहजगत्या करता येते व ड्रायव्हिंग करताना अजिबात थकवा जाणवत नाही. अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने वॉक-थ्रू केबिनच्या कठोर क्रॅश चाचण्या घेण्यात आल्या आहेत. केबिनमधील आसनाची उंची कमी-जास्त करण्याची सोय यामध्ये आहे.

टिल्ट अँड टेलिस्कोपिक पॉवर स्टीअरिंग व डॅशबोर्ड-माऊंटेड गीअर स्तराने केबिन सुसज्ज आहे. इन-बिल्ट म्युझिक सिस्टम, वेगवान चार्जिंगसाठी युएसबीपोर्ट आणि सामान ठेवण्यासाठी मुबलक जागा यांची भर याश्रेणीत घातल्याने आरामदायीपणा वाढला आहे. एअरब्रेक्स आणि पॅराबोलिक लीफ सस्पेन्शनमुळे अधिक सुरक्षितता व नियंत्रण मिळते. तसेच क्लीअर-लेन्स हेडलॅम्प्स व एलईडी टेल लॅम्प्समुळे रात्रीच्या काळातील दृश्यमानता वाढते.

वैविध्यपूर्णतेवर शिक्कामोर्तब करत अल्ट्रा स्लीक टी-सीरिजमध्ये फोर-टायर आणि सिक्स-टायर कॉम्बिनेशन्स उपलब्ध आहेत. तसेच वेगवेगळ्या लांबीचे डेकही उपलब्ध आहेत. वाहतुकीच्या वैविध्यपूर्ण गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टीनेही श्रेणी विकसित करण्यात आली आहे. ई-कॉमर्स उत्पादने, एफएमसीजी, औद्योगिक मालक, एलपीजी सिलिंडर्स आणि कोविड-१९ लशींचे रेफ्रिजरेटेड कंटेनर्स, औषधे तसेचअंडी, दूध, ताजा शेतमाल यांसारखे अन्नपदार्थ आदी वैविध्यपूर्ण वाहतूक करण्याच्या दृष्टीने विविध उपयोजनांसाठीही वाहने सुसज्ज करण्यात आली आहेत.

१०० हॉर्स पॉवर आणि३००एनएम टॉर्कसह भविष्यकाळासाठी सज्ज अशा बीएस6 4एसपीसीआर इंजिनची शक्ती या वाहनांमध्ये आहे. संपूर्ण श्रेणीतील वाहने उत्तम शक्ती तसेच सर्वोत्तम इंधन कार्यक्षमता देतात. अधिक टिकाऊपणासाठी ही वाहने भक्कम मोड्युलर चेसिसने युक्त आहेत. शिवाय इंधन कार्यक्षमता आणखी वाढवण्याच्या दृष्टीने रोलिंग प्रतिरोध कमी असलेली रेडियल टायर्स या वाहनांमध्ये आहेत. फ्लीटएज या अत्याधुनिक कनेक्टेड व्हेइकल सोल्युशनच्या माध्यमातून टाटा मोटर्स ताफा व्यवस्थापन सुयोग्य रितीने करण्यासाठी माहितीपूर्ण निर्णय क्षमतेसह टेलिमॅटिक्स देऊ करत आहे. या सोल्युशनमुळे ताफा मालकांना वाहनांच्या स्थितीबद्दल तसेच ड्रायव्हरच्या वर्तनाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळते.

त्यामुळे ताफ्याचे उपयोजन अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते. फ्लीटएज सोल्युशन हे विविध आकारमानांच्या ताफ्यांसाठी उपयुक्त व लाभदायक आहे. या श्रेणीतील वाहनांसोबत पूर्णपणे विकसित सोल्युशन्सचा सर्व समावेशक संच देऊ केला जातो. यामध्ये अधिक चांगल्या अटींवर वित्तपुरवठा, राष्ट्रव्यापी सेवा वॉरंटी आणि अधिक फेरविक्री मूल्यासारख्या अनेक लाभांचा समावेश आहे. यामुळे उत्पादनाच्या जीवनचक्राच्या माध्यमातून त्याचे ग्राहकांसाठीचे मूल्यविधान खूपच उत्तम ठरत आहे.

या किफायतशीर उत्पादनांमध्ये आणखी भर घालत टाटा मोटर्सची आय अँड एलसीव्ही श्रेणी ३वर्षे/ ३लाख किलोमीटर्सच्या अतुलनीय वॉरंटीसह विकली जात आहेत. टाटा मोटर्सने संपूर्ण सेवा 2.0आणि टाटा समर्थ या योजना कार्यान्वित केल्या आहेत. व्यावसायिक वाहनांच्या चालकांच्या कल्याणासाठी कंपनीवचनबद्ध आहे. त्याचप्रमाणे अपटाइम गॅरंटी, ऑन-साइटसेवा आणि कस्टमाइझ्ड वार्षिक देखभाल व ताफा व्यवस्थापन सोल्युशन्स प्रत्येक आय अँड एलसीव्ही ट्रकसोबत दिले जात आहे.

ठळक वैशिष्ट्ये:

● हालचालींसाठी सोप्या व कमी टर्न अराउंड कालावधीसाठी नवीन अल्ट्रास्लीक१९००मिमी रुंद केबिनने युक्त
● क्रॅश-टेस्टेड केबिन्स, उच्चखात्रीशीरता व टिकाऊपणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधणी
● डेकची वेगवेगळी लांबी आणि ४/६टायर्स कॉम्बिनेशन्सह विविध उपयोजनांच्या मागण्या पूर्ण करणारी मोड्युलर प्लॅटफॉर्मवरील बांधणी
● उद्योग क्षेत्रातील सर्वोत्तम भार वाहक (पे-लोड) क्षमता आणि विभागातील सर्वोत्तम कार्यात्मक अर्थशास्त्र व इंधन कार्यक्षमता पुरवते, देखभालीचा खर्च अत्यंत कमी