सस्पेन्स संपला… मोस्ट अवेटेड New Safari लाँच, फिचर्स आणि किंमत अखेर जाहीर; ३० हजार भरून अनेकांनी आधीच केलंय बुकिंग

1998 मध्ये टाटा सफारी पहिल्यांदा लाँच झाली होती. नव्वदीच्या दशकातील आयकॉनिक एसयुव्ही अशी तिची ओळख होती. टाटा सफारीची ही नवी जनरेशनच Mahindra XUV500, 7 सीटर Hyundai Creta, MG Hector Plus, Toyota Innova Crysta, KIa Motor यांना टक्कर देणार आहे.

  दिल्ली : टाटाच्या मोस्ट अवेटेड ड्रिम कारचा सस्पेन्स अखेर संपला आहे. नव्वदीच्या दशकातील त्यांची आयकॉनिक एसयुव्ही टाटा सफारीचे नवीन मॉडेल अखेर सोमवारी लाँच झाले आहे. ३० हजार भरून अनेकांनी आधीच याच बुकिंग केलय. लाँचिंगसह या नव्या मॉडेलची किंमत, फिचर्स आणि व्हेरिअंटही जाहीर झाले आहेत.

  1998 मध्ये टाटा सफारी पहिल्यांदा लाँच झाली होती. नव्वदीच्या दशकातील आयकॉनिक एसयुव्ही अशी तिची ओळख होती. टाटा सफारीची ही नवी जनरेशनच Mahindra XUV500, 7 सीटर Hyundai Creta, MG Hector Plus, Toyota Innova Crysta, KIa Motor यांना टक्कर देणार आहे.

  टाटा सफारीचे नवीन मॉडेल (New Tata Safari) लाँच केले आहे. प्रजासत्ताक दिनादिवशी याची झलक पहायला मिळाली. मात्र, किंमत जाहीर करण्याआधीच कंपनीने याचे बुकींग सुरु केले होते. आज याची किंमत जाहीक झाली. टाटा सफारीच्या नवीन मॉडेलची एक्स शोरुम किंमत 14.69 लाख इतकी आहे.

  New Tata Safari चे बेस्ट फिचर्स

  • प्लॅटफॉर्मवर लक्झरिअस एसयुव्ही Land Rover बनविली जाते त्याच ओमेगा आर्क प्लॅटफॉर्मवर टाटाने नवीर सफारी बनवली आहे.
   2.0 लीटर क्षमतेचे Kryotec टर्बो डिझेल इंजिन दिले आहे जे 170hp आणि 350 एनएम चा पीक टॉर्क जनरेट करते.
  • 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 6 स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्स
  • XE, XM, XT, XT +, XZ आणि XZ + व्हेरिएंट्स
  • ऑटोमॅटीक ट्रान्समिशनसोबत कार 14.8 kmpl मायलेज देते असल्याचा कंपनीचा दावा
  • ही नवीन कार 6 आणि 7 सीटर ऑप्शनमध्ये उपलब्ध
  • सर्वात मोठे सनरुफ हे या कारचे वैशिष्ट्य