या आहेत भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार्स, सिंगल चार्ज मध्ये गाठणार 375 किमीपर्यंतचा पल्ला

ही एक थ्री -व्हिलर इलेक्ट्रिक कार आहे ज्यात ग्राहकांना 2-डोर, 2-सीट्स आणि एक मोठं सनरूफ अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. या कारची प्रारंभिक किंमत 4.5 लाख रुपये असणार आहे. भारतात मिळणारी सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे यात लिथियम-आयन बॅटरीचा वापर केला आहे.

  नवी दिल्ली : भारतीय ऑटोमोबाइल सेक्टर वेगाने वाढते आहे. तर वर्ष २०२१ मध्ये यात नफाच होताना दिसत आहे. सोबतच भारतातल्या बाजारात काही अशा इलेक्ट्रिक कार्स दाखल झाल्या आहेत ज्या आम आदमीच्या खिशाला अगदी परवडणाऱ्या आहेत. तर जाणून घेऊयात अशाच काही अपकमिंग इलेक्ट्रिक कार्सबाबत…

  Strom R3

  ही एक थ्री -व्हिलर इलेक्ट्रिक कार आहे ज्यात ग्राहकांना 2-डोर, 2-सीट्स आणि एक मोठं सनरूफ अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. या कारची प्रारंभिक किंमत 4.5 लाख रुपये असणार आहे. भारतात मिळणारी सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे यात लिथियम-आयन बॅटरीचा वापर केला आहे. जी 1 लाख किलोमीटर किंवा 3 वर्षाच्या वॉरंटीसह बाजारात दाखल झाली आहे. ही इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये 200 किलोमीटरचे अंतर पार करण्यास सक्षम आहे.

  Mahindra eXUV300

  Mahindra eXUV300 ला सिंगल चार्ज केल्यानंतर 375 किलोमीटरचा पल्ला सहज गाठता येईल. ही एक चांगली रेंज आहे आणि लवकरच ही भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. eXUV300 कंपनीची पॉप्युलर सब-कॉम्पॅक्ट एसयुव्हीचा इलेक्ट्रिक अवतार आहे. Mahindra eXUV300 डिझाइनच्या बाबतीत XUV300 शी साधर्म्य असणारी आहे. तथापि डिझाइनमध्ये काही मोठे अपडेट्सही पाहायला मिळतील. भारतात आधीपासूनच असलेल्या कोना इलेक्ट्रिक एसयुव्ही आणि एमजी झेडएसईव्हीला महिंद्राच्या नव्या एसयुव्हीला टक्कर देईल अशी आशा आहे. eXUV300 महिंद्रा स्केलेबल आणि मॉड्युलर आर्किटेक्चरवर तयार करण्यात आली आहे.

  Mahindra eKUV100

  Mahindra eKUV100 मध्ये 15.9 किलोवॅटची लिक्विड कूल मोटर बसविण्यात आली आहे. जी 54 Ps ची पावर आणि 120 NMचा टॉर्क जनरेट करते. मिळालेल्या माहितीनुसार आपल्या पावरफुल बॅटरीच्या जोरावर ही एसयुव्ही जवळपास 147किमीचा पल्ला गाठण्यासाठी सक्षम असणार आहे. ही कार फास्ट चार्जिंग फीचरमुळे 80 टक्के चार्ज होण्यासाठी अवघ्या 50 मिनिटांचा कालावधी लागतो. या कारची किंमत 8 ते 9 लाखांदरम्यान असण्याची शक्यता आहे.