टोयोटाने ९४९८ कार परत मागविल्या; अर्बन क्रूझरच्या एअरबॅगमध्ये काही तरी प्रॉब्लेम

या वाहनांतील तांत्रिक अडचण नि:शुल्क सुधारण्यात येणार आहे. तथापि ग्राहकांना कोणत्या प्रकारची समस्या उद्भवली हे मात्र कंपनीने स्पष्ट केले नाही. एयरबॅग सह लायटिंगचीही समस्या असल्याचे कंपनीने सांगितले आहे. आता वाहनांच्या मालकाना अधिकृत वितरकासोबत संपर्क साधून दुरुस्ती करून घ्यावी लागणार आहे.

    दिल्ली : गेल्यावर्षी टोयोटाने नवी अर्बन क्रूझर भारतात दाखल केली होती. तथापि, या वाहनातील चालकाच्या बाजूकडील एयरबॅग मॉड्युलमध्ये तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे वाहने परत मागविली आहेत. कंपनीने २८ जुलै २०२० ते ११ फेब्रुवारी २०२१ दरम्यान पाठविलेल्या ९४९८ एसयूव्ही परत मागविल्या आहेत.

    या वाहनांतील तांत्रिक अडचण नि:शुल्क सुधारण्यात येणार आहे. तथापि ग्राहकांना कोणत्या प्रकारची समस्या उद्भवली हे मात्र कंपनीने स्पष्ट केले नाही. एयरबॅग सह लायटिंगचीही समस्या असल्याचे कंपनीने सांगितले आहे. आता वाहनांच्या मालकाना अधिकृत वितरकासोबत संपर्क साधून दुरुस्ती करून घ्यावी लागणार आहे.

    उल्लेखनीय असे की, अर्बन क्रूझर सब ४ मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये टोयोटाची ही पहिलीच एसयूव्ही आहे आणि मारुती सुझुकी विटारा ब्रेझाचेच हे अत्याधुनिक रुप आहे.