अशी गाडी पुन्हा होणे नाही, Toyota ची नवीन एमपीव्ही Hiace भारतात झाली लाँच ; मर्यादित स्वरुपात विक्रीसाठी उपलब्ध; मोठ्या फॅमिलीसाठी ठरणार वरदान

ही कंपनीची पाचव्या पिढीची सीबीयू म्हणजेच कंप्लिटली बिल्ट यूनिट (Completely Built Unit) म्हणून सादर करण्यात आली आहे. याचा अर्थ ही बाहेरून आयात करण्यात येणार असून भारतात एका मर्यादित संख्येतच हिची विक्री करण्यात येणार आहे.

  नवी दिल्ली : प्रसिद्ध ऑटोमोबाइल कंपनी टोयोटा (Toyota) ने भारतात आपली नवीन एमपीवी Hiace लाँच केली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर (Toyota Kirloskar Motor) ची 14-सीटर वाली ही गाडी फक्त एकच GL ट्रिम मध्ये लाँच करण्यात आली आहे. या गाडीची किंमत ५५ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

  ही कंपनीची पाचव्या पिढीची सीबीयू म्हणजेच कंप्लिटली बिल्ट यूनिट (Completely Built Unit) म्हणून सादर करण्यात आली आहे. याचा अर्थ ही बाहेरून आयात करण्यात येणार असून भारतात एका मर्यादित संख्येतच हिची विक्री करण्यात येणार आहे.

  इंजिन

  या 14-सीटर Toyota Hiace मध्ये 2.8 लीटरचे 4- सिलेंडर डिझेल इंजिन लावले आहे, जे 151 बीएचपी आणि 1200 ते 2400 आरपीएम वर 300 एनएम चा टॉर्क जनरेट करते. या दमदार एमपीवीमध्ये 6-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्स दिला आहे.

  कलर, स्पेस आणि फीचर्स

  Hiace फक्त व्हाइट आणि सिल्व्हर अशा दोनच रंगात उपलब्ध आहे. याच्या आसनव्यवस्थेची रचना पाहता एकावेळी 14 जण बसू शकतात. सोबतच यात 2-डिन ऑडियो सिस्टम, ऑक्स आणि युएसबी कनेक्टिविटी सारखे फीचरही दिले आहेत.

  Toyota Hiace च्या सेफ्टी फीचर्स मध्ये डुअल फ्रंट एअरबॅग्स, ईबीडी सह एबीएसही दिला आहे. यासोबतच फोल्डेबल स्टियरिंग कॉलम, क्रंपल जोन कंस्ट्रक्शन आणि क्रॅश सेफ्टी GOA बॉडीही दिली आहे.