Triumph Trident 660 भारतात झाली लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

कंपनीने Trident 660 चार कलर्स ऑप्शन्समध्ये सादर केली आहे ज्यात क्रिस्टल व्हाइट, सफायर ब्लॅक, मॅट जेट ब्लॅक, सिल्वर आईस आणि डायब्लो रेड यांचा समावेश आहे.

  नवी दिल्ली : मोटरसायकल तयार करणारी ब्रिटिश कंपनी Triumph ने भारतात आपली बाइक Triumph Trident 660 लाँच केली आहे. ऑटो मार्केटमध्ये या बाइकची बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा होती आणि आता कंपनीने ही 6.95 लाख रुपयांच्या किंमतीला सादर केली आहे. चला जाणून घेऊया या बाइकच्या फीचर्स बाबत…

  कलर ऑप्शन्स आणि डिझाइन

  कंपनीने Trident 660 चार कलर्स ऑप्शन्समध्ये सादर केली आहे ज्यात क्रिस्टल व्हाइट, सफायर ब्लॅक, मॅट जेट ब्लॅक, सिल्वर आईस आणि डायब्लो रेड यांचा समावेश आहे. बाइकच्या डिझाइनबाबत सांगायचं झालं तर यात सर्कुलर एलईडी हेडलाइट, 14 लीटर क्षमतेची एक सर्कुलर इंधन टाकी आणि एक शॉर्ट टेल सेक्शन एलईडी टेल लाईट दिली आहे.

  सस्पेंशन आणि व्हिल्स

  Triumph Trident 660 मध्ये 17 इंचाचे एलॉय व्हिल्स दिले आहेत. सस्पेंशन 41mm USD फोर्क्स सह येते. तर रियरमध्ये ॲडजस्टेबल मोनोशॉक दिला आहे जो 133.5mm चा आहे. तर, याच्या फ्रंटला 310mm ची डिस्क आणि र्यर व्हिलमध्ये 255mm ची डिस्क मिळेल.

  फीचर्स

  Triumph Trident 660 मध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, सेल्फ टर्न इंडिकेटर्स, रायडिंग मोड्स, स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल आणि डुअल चॅनेल एबीएल दिला आहे. यात तुम्हाला कनेक्टेड टेक्नोलॉजीही मिळते जी टर्न बाय टर्न नेव्हिगेशनसह येते सोबतच यात कॉल आणि म्युझिक कंट्रोलर सारखे फीचर्सही दिले आहेत.

  इंजिन आणि पावर

  या बाइकमध्ये 660 cc लिक्विड कूल्ड इनलाइन 3 इंजिन आहेत जे 81 PS ची पावर आणि 64 Nm चा टॉर्क जनरेट करते. यात 6 स्पीड गियरबॉक्स, स्लिप आणि असिस्ट क्लच दिले आहेत.