बीएमडब्ल्यूच्या दोन नव्या बाइक; बुकिंगही सुरू

ग्राहक कंपनीच्या अधिकृत डीलरशीपकडे जाऊन ही बाईक बुक करू शकतात. या मोटरसायकलमध्ये नियो रेट्रो डिझाइन दिली आहे. यात नवीन डिझाइन करण्यात आलेली सर्कुलर इंस्ट्रूमेंट कंसोलसोबत एनोलॉग स्पीडोमीटर डिस्प्ले आणि इंटीग्रेटेड इंडीकेटर लाइट्स आणि मेटल केसिंग दिली आहे.

    बीएमडब्ल्यू मोटोराड इंडियाने आपली बीएमडब्ल्यू आय नाइनटी आणि बीएमडब्ल्यू आय नाइनटी स्क्रॅम्बलरला भारतात लाँच केले आहे. कंपनीने भारतीय बाजारात R nineT Scrambler ची एक्स-शोरूम किंमत 16.75 लाख रुपये ठेवली आहे. या दोन्ही बाईकच्या बुकिंगला सुरुवात केली आहे.

    ग्राहक कंपनीच्या अधिकृत डीलरशीपकडे जाऊन ही बाईक बुक करू शकतात. या मोटरसायकलमध्ये नियो रेट्रो डिझाइन दिली आहे. यात नवीन डिझाइन करण्यात आलेली सर्कुलर इंस्ट्रूमेंट कंसोलसोबत एनोलॉग स्पीडोमीटर डिस्प्ले आणि इंटीग्रेटेड इंडीकेटर लाइट्स आणि मेटल केसिंग दिली आहे. या दोन्ही मॉडलमध्ये एलईडी हेडलाइट्स आणि डेटाइम रनिंग लाइट्स दिली आहेत. पॉवर परफॉर्मेंस मध्ये या दोन्ही मोटरसायकल मध्ये पॉवर साठी 1170 सीसीचे 2 सिलिंडरचे एअर ऑइल कुल्ड इंजिन दिले आहे. यात दिलेले इंजिन 7520 आरपीएमवर 109 बीएचपीचे मॅक्सिमम पॉवर आणि 6000 आरपीएमवर 119 एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते.

    जबरदस्त अनुभवासाठी यात दोन्ही रायडिंग मोड्स दिले आहेत. यात रोड आणि रेनचा समावेश आहे. BMW R nineT आणि BMW R nineT Scrambler मध्ये 200 किलोमीटर प्रति तास इतकी स्पीड मिळते. याशिवाय, या बाईकमध्ये केवळ 3.5 सेकंदात शून्य ते 100 किलोमीटर प्रति तास इतका वेग पकडू शकते.

    रेन मोड मध्ये हलक्या थ्राटल रिस्पॉन्स सोबत ऑटोमॅटिक स्टेबिलिटी कंट्रोल (ASC) चे सेंसिटिव कंट्रोल मिळते. यावरून लो ट्रॅक्शनवर सुरक्षित रायडिंग मिळते. तर रोड मोड मध्ये बॅलन्स थ्रॉटल रिस्पॉन्स मिळते. ड्राय जागी जबरदस्त रायडिंग अनुभव मिळतो. सुरक्षासाठी यात BMW R nineT आणि BMW R nineT Scrambler मध्ये एबीएस प्रो, डायनेमिक ब्रेक कंट्रोल, नवीन सस्पेंशन स्ट्रट सोबत ट्रेवल इंडीपेंडेंट डॅम्पिंग दिले आहेत. दोन्ही बाईकमध्ये वेगवेगळे कलर ऑप्शन्स मिळते. याशिवाय वेगवेगळे ॲक्सेसरीज मिळतात.