car protection

कार चोरीला (missing car)गेल्यानंतर स्थानिक पोलीस स्थानकात तक्रार करा. तक्रार दाखल झाल्यानंतर तुम्हाला एफआयआरची कॉपी दिली जाईल. ती कॉपी तुम्हाला इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी आवश्यक असते.

  आपल्या आसपास कारचोरीच्या अनेक घटना घडत असतात. कार चोरीला गेल्यानंतर आपल्याला खूप मोठा फटका बसतो.मात्र तुमच्याकडे गाडीची सगळी कागदपत्रे घेऊन तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली तर वेळीच गाडीचा शोध लावता येईल. देव न करो असे काही तुमच्या बाबतीत होवो पण समजा चोरीला गेलेल्या कारचा शोध लागला नाही तर इन्शुरन्स कंपनी कारची नुकसान भरपाई देते.

  कार चोरीला गेल्यानंतर स्थानिक पोलीस स्थानकात तक्रार करा. तक्रार दाखल झाल्यानंतर तुम्हाला एफआयआरची कॉपी दिली जाईल. ती कॉपी तुम्हाला इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी आवश्यक असते. कार चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत दाखल केल्यानंतर कार इन्शुरन्स ज्या कंपनीचा आहे त्या कंपनीला पोलिसांनी दिलेली एफआयआरची कॉपी द्यावी लागते.

  कार चोरीला गेल्याची माहिती तुमच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (RTO) देणं मोटार वाहन कायद्यानुसार बंधनकारक आहे.

  कार चोरीला गेल्यानंतर इन्शुरन्स कंपनीला द्यावी लागणारी कागदपत्र- इन्शुरन्स कागदपत्राची प्रत, एफआयआरची  प्रत, क्लेम फॉर्म, ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत, आरसी बुक, आरटीओ ट्रान्स्फर पेपर्स आणि आरटीओचे अन्य फॉर्म्स. याशिवाय दावा यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कारच्या दोन्ही मूळ चाव्याही सोबत सादर कराव्या लागतात.

  तुमच्या चोरीला गेलेल्या कारचा काही ठराविक कालावधीपर्यंत शोध लागला नाही,तर तुम्हाला पोलीस स्टेशनमधून नो-ट्रेस रिपोर्ट घ्यावा लागतो. इन्शुरन्स कंपनीकडून क्लेम मान्य केला जाण्यासाठी हा कागद महत्त्वाचा असतो.

  नो-ट्रेस रिपोर्ट ३० दिवसांच्या आत मिळू शकत नाही. हा कालावधी थोडा कमी जास्त होऊ शकतो. तसंच,इन्शुरन्स कंपनीला तुमच्या कारचीIDVअर्थात इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू काढण्यासाठी ६०ते ९० दिवस लागू शकतात. थोडक्यात या सगळ्या गोष्टींसाठी २,३ महिने लागतात.