Tata Nexon EV बनली सर्वाधिक खपाची इलेक्ट्रीक कार, जाणून घ्या

यानंतर MG ZS EV चा नंबर लागत असून या एसयुव्हीच्या 156 कार विकल्या गेल्या आहेत. तर तिसऱ्या नंतरला टाटाचीच कार असून Tata Tigor EV चे 56 युनिट विकले गेले आहेत. ह्युंदाईच्या Kona EV चे 12 युनिट विकले गेले आहेत.

    गेल्या वर्षीच्या सुरुवातीला लाँच झालेल्या टाटा नेक्सॉन ईव्हीने (TaTa Nexon EV) मोठी झेप घेतली आहे. एप्रिलमध्ये इलेक्ट्रीक कारमध्ये सर्वाधिक खपाची कार बनली आहे. Jato Dynamics ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार Nexon EV च्या 525 कार गेल्या महिन्यात विकल्या गेल्या आहेत.

    यानंतर MG ZS EV चा नंबर लागत असून या एसयुव्हीच्या 156 कार विकल्या गेल्या आहेत. तर तिसऱ्या नंतरला टाटाचीच कार असून Tata Tigor EV चे 56 युनिट विकले गेले आहेत. ह्युंदाईच्या Kona EV चे 12 युनिट विकले गेले आहेत.

    या खपाबरोबर टाटाच्या या दोन कारनी भारतीय इलेक्ट्रीक वाहनांच्या बाजारात 77 टक्के वाटा उचलला आहे. नेक्सॉनच्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरिअंटचा गेल्या महिन्यातील खप हा 6,413 एवढा होता.