पुढल्या आठवड्यात अवतरणार Yamaha R15M Bike, मनमोहक लुक आणि पॉवरफुल फीचर्सचा साधलाय मेळ

आगामी यामाहा R15M स्टाइलिंग आणि फिचर्सच्या बाबतीत यामाहाच्या प्रमुख यामाहा R1M पेक्षा अधिक चांगली असण्याची शक्यता आहे. यामाहा (Yamaha)आपल्या परवडणाऱ्या आणि बजेट स्पोर्ट्स बाईकने भारतात धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे आगामी यामाहा R15M कंपनीचा पोर्टफोलिओ आणखी मजबूत करेल आणि तरुणांना चांगले पर्याय मिळतील असा विश्वास आहे.

  नवी दिल्ली :

  Yamaha R15M Bike Launch Date Price Features : लोकप्रिय दुचाकी कंपनी यामाहा मोटर्स आपली बाइक यामाहा R15M पुढील आठवड्यात भारतात लाँच करणार आहे. उत्तम लुक आणि दमदार वैशिष्ट्यांसह सुसज्ज ही बाईक 21 सप्टेंबरला लाँच होणार आहे. अलीकडे यामाहा R15M डीलरशिपवर दाखल होताना नजरेस पडली आहे.

  आगामी यामाहा R15M स्टाइलिंग आणि फिचर्सच्या बाबतीत यामाहाच्या प्रमुख यामाहा R1M पेक्षा अधिक चांगली असण्याची शक्यता आहे. यामाहा आपल्या परवडणाऱ्या आणि बजेट स्पोर्ट्स बाईकने भारतात धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे आगामी यामाहा R15M कंपनीचा पोर्टफोलिओ आणखी मजबूत करेल आणि तरुणांना चांगले पर्याय मिळतील असा विश्वास आहे.

  कॉस्मेटिक बदलांसह अवतरणार

  Yamaha R Series चा भारतातील सध्याच्या Yamaha R15 मॉडेलपेक्षा जास्त आक्रमक लुक असेल. यामध्ये सिंगल एलईडी हेडलाइटसह LED DRL दिसेल. मागच्या भागाबद्दल बोलायचे झाले तर त्यात LED टेललॅम्प्स दिसतील. हे मेटलिक हिट शील्डसह एक्झॉस्ट दिसतील. यासह, एक मोठी विंडस्क्रीन देखील या बाईकची शान वाढवेल. यामाहा R15M कलर ऑप्शन्समध्ये Thunder Grey, Dark Knight आणि Racing Blue तसेच Metallic Red मध्ये उपलब्ध आहे.

  फीचर्स आणि संभाव्य किंमत

  Yamaha R15M अनेक कार्यात्मक बदल दिसतील. या बाईकमध्ये USD Forks, समोर 282mm आणि मागील बाजूस 220 mm डिस्क ब्रेक, Dual-channel ABS यासह अनेक विशेष गोष्टी दिसतील. Yamaha R15M मध्ये 155cc इंजिन असेल, जे 18.35 PS पॉवर आणि 14.1 Nm पर्यंत टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. यामाहाची ही बाईक 6 स्पीड गिअरबॉक्ससह दिली जाईल. यामाहा बाईकची टॉप स्पीड सुद्धा खूप चांगली असेल. यामाहा R15M भारतात 1.5 लाख ते 1.75 लाख रुपयांच्या दरम्यान लाँच केली जाऊ शकते.