पुणे, मुंबई नंतर आता ऑलेक्ट्राच्या इलेक्ट्रिक बसेस ठाण्यातही धावणार

आता या महानगरासोबत ठाण्यात (Thane) देखील इलेक्टिक बसेस धावताना दिसणार आहेत. पहिल्या टप्यात १२ मीटरच्या मोठ्या तसेच ९ मीटरच्या मीडी अशा दोन प्रकारच्या बसेसची मागणी टीमटीने ऑलेक्ट्रा ग्रिनटेक कडे नोंदवली आहे.

  • 123 EV बसेस पुरवण्याचे कंत्राट मिळवण्यात ऑलेक्ट्रा यशस्वी

मुंबई : कार्बन डायऑक्साईडमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणाऱ्या इलेक्ट्रिक बसेसची (Electric Buses) मागणी सध्या सर्वत्र वाढते आहे. पुण्यात जवळ जवळ ४०० हून अधिक इ बसेस रस्त्यावर धावत आहेत. मुंबईत देखील 2017 पासून साध्या आणि वातानुकूलित बसेस रस्त्यावर धावताना दिसत आहेत. बेस्ट बसेसच्या (Best Buses) ताफ्यातील इ बसेसची संख्या देखील ४०० हून अधिक आहे शिवाय डबल डेकर बसेस देखील प्रतिक्षेत आहेत. नवी मुंबईत देखील इलेक्ट्रिक बसेस वाहतूक सेवेत आहेत.

आता या महानगरासोबत ठाण्यात (Thane) देखील इलेक्टिक बसेस धावताना दिसणार आहेत. पहिल्या टप्यात १२ मीटरच्या मोठ्या तसेच ९ मीटरच्या मीडी अशा दोन प्रकारच्या बसेसची मागणी टीमटीने ऑलेक्ट्रा ग्रिनटेक कडे नोंदवली आहे. ऑलेक्ट्रा ग्रिनटेक आणि इवे ट्रान्स या अनुक्रमे उत्पादक आणि परिचालन करणाऱ्या कंपन्यामार्फत बसेस चालवल्या जाणार आहेत. एकूण १२३ इलेक्ट्रिक बसेसचे मागणीपत्र देण्यात आले आहे. यातील काही बसेस वातानूकुलित तर काही साध्या अशा प्रकारात आहेत. अतिशय प्रगत सुविधांनी या बसेस सज्ज असणार आहेत.

काय आहेत बसेस मध्ये सुविधा

प्रवाशांच्या सुखसोयीसाठी १२ मीटर आणि ९ मीटर लांबीच्या या बसेसमध्ये उत्तम एअर सस्पेंशन आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, आपत्कालीन बटन, मोबाइल चार्जिंगसाठी यूएसबी सॉकेट्स अशा सुविधा असणार आहेत.
9 महिन्यांच्या कालावधीत या बसेसचे वितरण होईल.

हा करार १५ वर्षासाठी करण्यात येणार आहे. या निविदेची अंदाजे किंमत 185 कोटी रुपये एवढी असेल. यात १२ मीटरच्या एकूण ५५ बसेस आहेत यात ४५ एसी तर १० विनावातानुकूलित आहेत. ९ मीटरच्या एकूण 68 बसेस आहेत यात २६ एसी तर ४२ नॉनएसी प्रकारच्या बसेस या करारानुसार टीमटीला मिळणार आहेत.