अपोलो टायर्स लिमिटेडकडून भारतामध्‍ये प्रिमियम टायर Brand Vredestine लाँच

डिझाइनर व उच्‍च दर्जाच्‍या टायर्ससाठी ओळखला जाणारा व्रडेस्‍टाइन ब्रॅण्‍ड (Vredestine brand) प्रवासी वाहन (Passengers Vehicles) विभागामध्‍ये १५ इंच ते २० इंच आकाराच्‍या टायर्ससह भारतामध्‍ये प्रवेश करत आहे. व्रडेस्‍टाइन अल्‍ट्राक वोर्टी मर्सिडीज, बीएमडब्‍ल्‍यू (BMW), ऑडी (Audi), लँड रोव्‍हर (Land Rover) व वोल्‍वो (Valvo) यांसारख्‍या प्रिमिअम लक्‍झरी सेदान्‍सच्‍या गरजांची पूर्तता करेल.

  • उच्‍चस्‍तरीय कार्स व सुपरबाइकिंग विभागाच्‍या गरजांची पूर्तता करणार

मुंबई : भारतीय बाजारपेठेतील उत्‍पादन ऑफरिंग अधिक दृढ करत आघाडीची टायर उत्‍पादक कंपनी अपोलो टायर्स लिमिटेडने (Apollo Tyres Ltd) भारतामध्‍ये प्रिमिअम युरोपियन ब्रॅण्‍ड व्रडेस्‍टाइन लाँच केला (Launched premium European brand Vredestine in India). टायर्सचा व्रडेस्‍टाइन ब्रॅण्‍ड भारतातील अत्‍याधुनिक केंद्रांमध्‍ये उत्‍पादित करण्‍यात येईल आणि पॅसेंजर कार्समधील प्रिमिअम व लक्‍झरी विभागाच्‍या गरजांची पूर्तता करेल. तसेच ब्रॅण्‍डचे दुचाकी टायर्स भारतातील वाढत्‍या सुपरबाइकिंग विभागाच्‍या गरजांची पूर्तता करतील.

डिझाइनर व उच्‍च दर्जाच्‍या टायर्ससाठी ओळखला जाणारा व्रडेस्‍टाइन ब्रॅण्‍ड (Vredestine brand) प्रवासी वाहन (Passengers Vehicles) विभागामध्‍ये १५ इंच ते २० इंच आकाराच्‍या टायर्ससह भारतामध्‍ये प्रवेश करत आहे. व्रडेस्‍टाइन अल्‍ट्राक वोर्टी मर्सिडीज, बीएमडब्‍ल्‍यू (BMW), ऑडी (Audi), लँड रोव्‍हर (Land Rover) व वोल्‍वो (Valvo) यांसारख्‍या प्रिमिअम लक्‍झरी सेदान्‍सच्‍या गरजांची पूर्तता करेल. तसेच व्रडेस्‍टाइन अल्‍ट्राक होंडा सिटी, मारूती सुझुकी सियाझ व बलेनो यांसारख्‍या प्रिमिअम हॅचबॅक व सेदान्‍सच्‍या गरजांची पूर्तता करेल.

व्रडेस्‍टाइनमधील दुचाकी टायर्स सेण्‍टोरो एनएस व एसटी मोटरसायकल्‍सच्‍या संपूर्ण स्‍पोर्ट टूरिंग व सुपर स्‍पोर्टस् श्रेणीच्‍या गरजांची पूर्तता करतील, जसे बीएमडब्‍ल्‍यू, ड्युकाती, ॲप्रिलिया, थ्रम्‍प, कावासाकी, सुझुकी, होंडा व यामाहा.

भारतामध्‍ये व्रडेस्‍टाइन ब्रॅण्‍डच्‍या लाँचबाबत बोलताना अपोलो टायर्स लिमिटेडचे उपाध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक नीरज कंवर म्‍हणाले, ”भारतातील कार्सच्‍या प्रिमिअम व लक्‍झरी विभागाप्रती, तसेच सुपरबाइकिंग विभागाप्रती मागणी प्रचंड वाढताना दिसण्‍यात आली आहे. यामुळे आम्‍हाला भारतीय ग्राहकांसाठी हा १०० वर्षांहून अधिक काळ जुना ब्रॅण्‍ड व्रडेस्‍टाइन लाँच करण्‍यास प्रोत्‍साहन मिळाले आहे. व्रडेस्‍टाइन हा प्रिमिअम स्‍टाइलिंग व अल्‍ट्रा हाय परफॉर्मन्‍सशी संलग्‍न आहे आणि लक्‍झरी कार्स व सुपरबाइक्‍सचे मालक याच दोन महत्त्वपूर्ण घटकांना अधिक प्राधान्‍य देतात. मला विश्‍वास आहे की, स्‍थानिक आंतरराष्‍ट्रीय ब्रॅण्‍ड व्रडेस्‍टाइनसह आम्‍ही भारतातील लक्‍झरी विभागामधील अग्रणी कंपनी बनू.”

व्रडेस्‍टाइनमधील प्रवासी वाहन श्रेणीमध्‍ये प्रख्‍यात ऑटोमोबाइल डिझाइनर जियोर्जेटो गिउगियारो यांनी सिग्‍नेचर लुकची भर केली आहे. तसेच प्रसिद्ध इटालियन डिझाइन हाऊस फ्रॅस्‍कॉईल डिझाइनने दुचाकी श्रेणी डिझाइन केली आहे. भारतीय बाजारपेठेत सादर करण्‍यात आलेल्‍या टायर्सची युरोप व भागातील प्रमुख ट्रॅक्‍सवर चाचणी घेण्‍यात आली आहे आणि या टायर्सनी युरोप व युएसमधील विविध ऑटोमोटिव्‍ह मॅगझीन चाचण्‍यांमध्‍ये अग्रणी स्‍थान देखील संपादित केले आहे.

लाँचबाबत बोलताना अपोलो टायर्स लिमिटेडचे एशिया पॅसिफिक, मिडल ईस्‍ट व आफ्रिका (एपीएमईए) येथील अध्‍यक्ष सतिश शर्मा म्‍हणाले, ”व्रडेस्‍टाइन ब्रॅण्‍डचे सादरीकरण निश्चितच भारतातील प्रवासी वाहन व दुचाकी विभागांमधील आमच्‍या ऑफरिंग्‍ज अधिक प्रबळ करेल. नुकतेच भारत सरकारने टायर्सच्‍या आयातीवर लादलेल्‍या निर्बंधांमुळे आम्‍हाला उच्‍चस्‍तरीय कार्स व मोटरसायकल्‍ससाठी भारतामध्‍ये व्रडेस्‍टाइन ब्रॅण्‍ड सादर करण्‍यास प्रबळ व्‍यवसाय प्रोत्साहन दिले. आमच्‍या आर ॲण्‍ड डी टीम्‍सनी भारतीय स्थितींमध्‍ये सर्वोत्तम सुरक्षितता व ड्रायव्हिंग अनुभव देण्‍यासाठी हे टायर्स सानुकूल केले आहेत.”

अपोलो टायर्स त्‍यांच्‍या व्‍यवसाय सहयोगींच्‍या, विशेषत: प्रिमिअम टियर १ काऊंटर्सच्‍या विद्यमान नेटवर्कचा वापर करत व्रडेस्‍टाइन ब्रॅण्‍डच्‍या टायर्सची विक्री करेल. अधिक पुढे जात, कंपनी व्रडेस्‍टाइन ब्रॅण्‍डसाठी स्‍पेशल काऊंटर्स स्‍थापित करण्‍याला प्राधान्‍य देईल. भारतामध्‍ये नवीन प्रवेश करणारा ब्रॅण्‍ड व्रडेस्‍टाइनला देशभरातील अपोलो टायर्सचे प्रशिक्षित आणि प्रबळ विक्री व सेवा नेटवर्क उपलब्‍ध होण्‍याचा फायदा आहे.

व्रडेस्‍टाइन प्रामुख्‍याने युरोप व यूएसमधील रिप्‍लेसमेंट बाजारपेठेमध्‍ये कार्यरत राहिला आहे. नुकतेच कंपनीने ऑडी, व्‍हीडल्‍यू, सीट व फोर्ड यांसारख्‍या युरोपियन ओईंना व्रडेस्‍टाइन टायर्सचा पुरवठा सुरू केला. तसेच भारतामध्‍ये अपोलो टायर्स सुरूवातीला रिप्‍लेसमेंट बाजारपेठेत व्रडेस्‍टाइन ब्रॅण्‍डच्‍या टायर्स विक्री करणार आहे. तसेच कंपनी ओई फिटमेंट म्‍हणून व्रडेस्‍टाइन अल्‍ट्रा हाय परफॉर्मन्‍स टायर्स असण्‍यासाठी जागतिक ओईएमसोबत असलेल्‍या सहयोगाचा लाभ घेईल.

व्रडेस्‍टाइनचा टायर्स विश्‍वामध्‍ये संपन्‍न वारसा आहे. १९०९ मध्‍ये नेदरलँड्स येथे स्‍थापना करण्‍यात आलेल्‍या कंपनीला दशकांपासून प्रिमिअम टायर ब्रॅण्‍ड म्‍हणून आंतरराष्‍ट्रीय मान्‍यता मिळाली आहे. आज, व्रडेस्‍टाइन वैशिष्‍ट्यपूर्ण टायर ब्रॅण्‍ड आहे, ज्‍याचे श्रेय सुरू असलेला नवोन्‍मेष्‍कारावरील भर, उच्‍च-कार्यक्षम तंत्रज्ञानामधील गुंतवणूका आणि आकर्षक डिझाइन्‍सना जाते. २००९ मध्‍ये अपोलो टायर्स लिमिटेडने व्रडेस्‍टाइनला संपादित केले.

जियोर्जेटो आणि फ्रॅस्‍कॉईल डिझाइनसोबत सहयोग

९० च्‍या दशकाच्‍या उत्तरार्धात व्रडेस्‍टाइनने प्रख्‍यात इटालियन ऑटोमोटिव्‍ह डिझाइनर जियोर्जेटो गिउगियारोसोबत सहयोग केला. १९९९ मध्‍ये त्‍यांना प्रवासी कार टायर्ससाठी जागतिक ऑटोमोटिव्‍ह मीडियाने ‘कार डिझाइनर ऑफ दि सेंच्युरी’ म्‍हणून नामांकित केले. इटालियन डिझाइनरच्‍या या सिग्‍नेचरमधून डिझाइनर टायर्स म्‍हणून व्रडेस्‍टाइनला मान्‍यता मिळाली, जे उच्‍च दर्जासोबत अजूनही अद्वितीय विक्री तत्त्व आहे. तसेच कंपनीने काही वर्षांपूर्वी त्‍यांच्‍या दुचाकी टायर्ससाठी प्रसिद्ध फ्रॅस्‍कॉईल डिझाइनसोबत देखील सहयोग केला.