aston martin

अ‍ॅस्टन मार्टिन DB12 ला सुपर टूरर देखील म्हटले जाऊ शकते.नवीन DB12 मध्ये 4.0 लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिन आहे, जे 671bhp पॉवर आणि 800Nm टॉर्क जनरेट करते.

    भारतीय ऑटो मार्केटमध्ये Aston Martin ने आपली नवीन सुपरकार DB12 लॉन्च केली आहे. अ‍ॅस्टन मार्टिन रेंजमधील ही फ्लॅगशिप जीटी आहे. DB12 ला सुपर टूरर देखील म्हटले जाऊ शकते.नवीन DB12 मध्ये 4.0 लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिन आहे, जे 671bhp पॉवर आणि 800Nm टॉर्क जनरेट करते. हे जुन्या मॉडेल DB11 पेक्षा अधिक पॉवरफुल आहे. इंजिनला स्टँडर्ड म्हणून 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. यात इलेक्ट्रॉनिक रीअर डिफरेंशियल (ई-डिफ) देखील आहे.

    DB12 मध्ये मोठी मेटल ग्रील देण्यात आली आहे. यात नवीन एलईडी लाईट आणि 21-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. याचे इंटीरियर लक्झरी आणि नवीन तंत्रज्ञानाने डिझाइन केले आहे. यात 10.25-इंच स्क्रीनसह नवीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी वायरलेस Apple कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करते.

    DB12 ची किंमत
    यात स्टँडर्ड म्हणून 390 वॅट 11 स्पीकर ऑडिओ सिस्टम आहे. तर Bowers & Wilkins पर्याय देखील उपलब्ध आहे. GT असल्याने DB12 पुरेशी बूट स्पेस देते. ही सुपरकार अतिशय आरामदायक आहे.
    अ‍ॅस्टन मार्टिन तुम्हाला तुमच्या आवडीनुसार विविध कस्टमायझेशन पर्याय देखील देते. याची एक्स-शोरूम किंमत 4.59 कोटी रुपये आहे. सध्या, अ‍ॅस्टन मार्टिन देशात डीबीएक्स विकत आहे.