ऑटोमॅटिक कार खरेदी करण्याचा विचार करत आहात का? जाणून घ्या फायदे अन् तोटे

ऑटोमॅटिक कार खरेदी करण्यापूर्वी त्याचे काही फायदे आणि तोटे आज आपण जाणून घेणार आहोत.

  सध्या बाजारामध्ये अनेक प्रकारच्या गाड्या उपलब्ध आहेत. नवनवीन फीचरसह अत्याधुनिक इंजिन त्याचबरोबर आकर्षक रंग आणि डिझाईन देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे वाहन खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहेत. यामध्ये ऑटोमॅटिक सुविधा असलेल्या गाडी खरेदी करणाऱ्यांचा अनेकांचा कल आहे. तुम्हाला देखील स्वयंचलित कार खरेदी करण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ऑटोमॅटिक कार खरेदी करण्यापूर्वी त्याचे काही फायदे आणि तोटे आज आपण जाणून घेणार आहोत.

  ऑटोमॅटिक कारचे फायदे

  • ड्रायव्हिंग: मॅन्युअल कारपेक्षा ऑटोमॅटिक कारमध्ये तुम्हाला क्लच आणि गियर वारंवार बदलण्याची गरज नाही. हाच सर्वात मोठा ऑटोमॅटिक कारचा फायदा आहे. यामुळे तुम्हाला ट्रॅफिकमध्ये सतत गियर बदलत राहण्याची गरज नाही. ट्रॅफिकमध्ये देखील ड्रायव्हिंग करणे सोपे होते.

   

  • अधिक लक्ष: स्वयंचलित कार चालवताना, डावा हात मोकळा राहतो, तर मॅन्युअल कारमध्ये, डावा हात गियरवर ठेवावा लागतो कारण अचानक गिअर बदलण्याची आवश्यकता असू शकते. ऑटोमॅटिकमध्ये डावा हात मोकळा असल्यामुळे, तुम्ही चांगल्या नियंत्रणासाठी स्टिअरिंगवर दोन्ही हातांनी गाडी चालवू शकता आणि गिअर बदलण्याची कोणतीही अडचण नाही, ज्यामुळे वाहन चालविण्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले जाते.

   

  • शिकणे आवश्यक आहे: मॅन्युअल कार चालवण्यासाठी, एखाद्याला कार शिकण्यासाठी कार शिक्षक विचारावे लागतेच. कारण गिअर कधी बदलायचा आणि क्लच कधी दाबायचा हे जाणून घेण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि भरपूर सराव आवश्यक आहे. त्याच वेळी, स्वयंचलित कार चालवणे म्हणजे गीअर्सशिवाय स्कूटर चालविण्यासारखे आहे. तुम्हाला फक्त रेस करायची आहे आणि ब्रेक दाबायचा आहे, बाकीची कार आपोआप करते.

   

  • कमी थकवा: गीअर आणि क्लच पुन्हा पुन्हा दाबण्याची गरज नाही, त्यामुळे लांबचा प्रवास करतानाही मॅन्युअल कारच्या तुलनेत कमी थकवा येतो. त्यामुळे तुम्ही अगदी एन्जॉय करत ड्राईव्ह करु शकता.

  ऑटोमॅटिक कारचे तोटे

  • देखभाल: मॅन्युअल कारच्या तुलनेत, स्वयंचलित कारच्या देखभालीसाठी अधिक पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे ही गाडी तुमच्या खिशाला कात्री लावणारी ठरु शकते.
  • किंमत: कमी किमतीत मॅन्युअल कार खरेदी करत आहात. पण ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या व्हेरियंटसाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. त्यामुळे खर्च वाढणार आहे.