बजाज ऑटोने लाँच केल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या दोन नवीन पल्सर २५०

क्वार्टर लिटर (250 सीसी) स्पोर्ट्स श्रेणीत पॉवर, परफॉरमन्स आणि शैलीच्या पुढील पिढीचा अंतर्भाव केला आहे. पल्सर 250 (New Pulsar 250) चे पदार्पण तरुण भारतीय रायडरमधील बदल दर्शवित आहे, ज्याला स्पोर्टी वर्ण असलेली मोटरसायकल (Motor Bike) आणि त्याचबरोबर रोजच्या वापराच्या दृष्टीनेही उफयुक्त असलेली बाईक (Bike) हवी आहे.

  • रोमांचची नवी लहर केली बहाल, पुढील पिढीसाठी एक नवीन कल निर्माण करणारी आहे

पिंपरी : भारतीय स्पोर्ट्स मोटरसायकल मार्केटमधील आपले २० वर्षांचे अग्रणी स्थान साजरे करण्यासाठी बजाज ऑटोने (Bajaj Auto) एकदम नवी पल्सर 250 लाँच (New Pulsar 250) केली असून कंपनीचे एमडी राजीव बजाज यांनी एका पत्रकार परिषदेत याची अधिकृत घोषणा केली आहे.

या अंतर्गत क्वार्टर लिटर (250 सीसी) स्पोर्ट्स श्रेणीत पॉवर, परफॉरमन्स आणि शैलीच्या पुढील पिढीचा अंतर्भाव केला आहे. पल्सर 250 (New Pulsar 250) चे पदार्पण तरुण भारतीय रायडरमधील बदल दर्शवित आहे, ज्याला स्पोर्टी वर्ण असलेली मोटरसायकल (Motor Bike) आणि त्याचबरोबर रोजच्या वापराच्या दृष्टीनेही उफयुक्त असलेली बाईक (Bike) हवी आहे.

पल्सर 250ने या दोन्ही मागण्यांची पूर्तता केली आहे आणि आपल्या ‘पॉवर ऑन टॅप’ (Power On Tap) अष्टपैलूत्वाने संतुलन साधले आहे. या क्वार्टर लिटरने लोकप्रिय पल्सर पोर्टफोलियो अजून उंचीवर नेला आहे जो दोन दशकांपूर्वी झालेल्या लाँचनंतर. 125 सीसी पासून 220 सीसी पर्यंत विस्तारला आहे. दोन दशकांपूर्वी पल्सरच्या जन्माने भारतात स्पोर्ट्स मोटरसायकलिंगची सुरुवात झाली. आज २० वर्षांनंतर ही श्रेणी परिपक्व होताना दिसत असून, पल्सर ही स्पोर्ट्स बाइकिंगची ओळख झाली आहे आणि नव्या पल्सर 250 (New Pulsar 250) च्या लाँचसह ही बाइक पुन्हा एकदा भारतातील स्पोर्ट्स बाइकिंग क्षेत्रात अमूलाग्र बदल घडविण्यास सज्ज झाली आहे.

रोजच्या रायडिंगमध्ये विशुद्ध रोमांचाचा अनुभव देण्याच्या एकमेव उद्दिष्टाने नवी पल्सर 250 साकारण्यात आली आहे व नव्या शतकात प्रवेश केल्यावर स्पोर्ट मोटरसायकलिंगला आपलेसे करणाऱ्या पिढीच्या भावनांचा मान राखला गेला आहे. ही #Pulsarmaniacs ची अशी पिढी होती, ज्यांनी रेड लाइन आणि फ्री-रेव्हिंगसारख्या शब्दांना अर्थ दिला; प्युअर परफॉरमन्सवर लक्ष केंद्रीत करून, लक्ष विचलित करणाऱ्या इतर सर्व घटकांना बाजूला सारत रोडशी जोडल्या जाण्याच्या वृत्तीला दिलेली ही एक मानवंदना आहे.

या क्वार्टर लिटर वाहनाची आकर्षक बांधणी पाहून नजर खिळून राहते. स्कल्प्चरल प्युरिटीच्या डिझाइन तत्वाच्या माध्यमातून हे साध्य करण्यात आले आहे, जे बाइकचा पुढील भाग आणि भक्कम टाकी यांच्या एकत्रीकरणामध्ये दिसून येते. या वाहनाच्या मध्यभागी सुलभ-पण-शक्तीशाली सिंगल सिलिंडर इंजिन आहे जे संपूर्ण रेव्ह बँडमध्ये सातत्यपूर्ण पॉवर प्रदान करते, आणि ‘द मोस्ट थ्रिल पर सीसी’ म्हणजे ‘दर सीसीमागे सर्वाधिक रोमांच’ हे पल्सरच्या पॅकेजिंगचे वचन पूर्ण करते.

फॉर्म आणि डिझाइन

पल्सर 250 (New Pulsar 250) च्या डिझाइन भाषेमध्ये तीक्ष्ण युनिबॉडी जेस्चर सह आवश्यक अश्या प्रमाणात आधुनिक एअरोडायनामिक डिझाइनची अनुभूती येते. भक्कम दिसणारी टाकी आणि त्याचबरोबर स्लीक स्टायलिश वेस्ट सेक्शन थेट मागील आसनापर्यंत जात असून त्यामुळे ही बाईक विलक्षण आकर्षक दिसते. त्याचप्रमाणे या बाइकला सॅटिन ग्रे फिनिशमध्ये अधिक स्पोर्टी, अधिक थ्रोटी आणि स्टायलिश एक्झॉस्ट दिलेला आहे. बेली पॅन, फ्रंट फेअरिंग आणि फ्रंट फेंडर असे फ्लोटिंग बॉडी पॅनल्स आणि जाड टायर्स यामुळे नव्या पल्सरला परिपूर्ण आकर्षक प्रोफाइल प्राप्त होते.

नवी स्पोर्ट्स टेक थीम नव्याने विकसित करण्यात आलेल्या मेटॅलिक ड्युअल रंगांच्या डायनामिक परस्परक्रिया बाइकची स्कल्प्चरल शुद्धता दर्शवते, जी बाइकच्या पुढच्या काउलवर सिंग्युलर फर्स्ट लुक तयार करतात. एका नजरेत ॲग्रेसिव्ह पण सुटसुटीत पुढील भाग, भक्कम टाकी आणि एकरूप झालेला काउल दिसून येतो त्यामुळे हे वाहन एक शिल्पच भासते. पुढील भागापासून मागील भागापर्यंत वाढत जाणाऱ्या लाइटनिंग टोनमुळे पल्सर 250 प्रत्येक दृष्टीने ताजी दिसते. टोन ऑन टोन ट्रीटमेंटमुळे कॉन्टूर लाइन अधिकच आकर्षक दिसते.

बाजूच्या कव्हर्सवर आणि टाकीच्या बाजूच्या इनर्सवर असलेला सॅटिन ब्लॅक फिनिशेस आणि टाकी व सीट काउलवर असलेला मेटॅलिक ग्लॉस यामुळे हे दोन्ही रंग उठून दिसतात. इंजिनचे कव्हर डीप कॉपर रंगाचे फिनिश आहे, जेणेकरून नजर खिळून राहील आणि सायबेरिअन सिल्व्हर रंगातील पिव्होट प्लेट आणि फ्लोटिंग बेली पॅनमुळे ही बाइक खूपच रुबाबदार दिसते.

परफॉरमन्स

150 सीसीची सर्वात दमदार बाइक असण्यापासून ते DTS-i सह आपला स्वतःचा मापदंड मोडत ॲड्रेनालाइन चालना देणारी NS200 च्या पॉवरससह पल्सर ही कायमच सर्वात वेगवान राहिली आहे. आता या बाइकच्या सर्वात मोठ्या अवतारात पल्सर 250 (New Pulsar 250) ने फ्री-रेव्हिंग, अखंड पॉवर क्वार्टर लिटर श्रेणीत आणली आहे. 250 सीसी BS6 DTS-i ऑइल कूल्ड इंजिन २४.५ PS ची स्मूथ, अव्हेलेबल-थ्रू-द-बँड पॉवर आणि २१.५Nm चा अत्युच्च टॉर्क प्रदान करते, ज्याने अधिक चांगला पिकअप मिळतो आणि सुरुवातीचा अनोखा १० सेकंदांचा ॲड्रेनलिन रश अधिक चढतो. त्याचप्रमाणे भरीव मिड-रेंज आणि निंबल फुटेड सहज करता येण्याजोगे डिझाइन असल्यामुळे दैनंदिन रायडिंग परफॉरमन्समध्ये वृद्धी होते.

फीचर्स

  • अधिक श्वेत उजेड अनुभवासाठी रिव्हर्स- बूमरँग एलईडी डीआरएल्ससह एलईडी प्रोजेक्टर युनिटपॉड हेडलॅम्प्स आणि सुधारित सुरक्षेसाठी एकसमान व अचूक बीम पॅटर्न.
  • मोनो शॉक सस्पेन्शन – नवे मोनो शॉक युनिट आरामदायीपणाच्या बाबतीत तडजोड न करता पिनपॉइंट हँडलिंग प्रदान करते
  • असिस्ट आणि स्लिपर क्लच – सहज क्लच पुलसहीत आत्मविश्वासपूर्ण ॲग्रेसिव्ह डाऊनशिफ्ट करता येऊ शकते.
  • इन्फिनिटी डिस्प्लेसह नवीन डिजिटल कन्सोल; टॅकोमीटर नीडल हा बॅज ऑफ थ्रिल तसाच ठेवत परफॉरमन्स मोटरसायकलिंगच्या सुवर्णयुगाचे स्वागत.
  • यूएसबी मोबाइल चार्जिंग – जे पल्सर मेनिॲक्स नेहमी प्रवासात असतात त्यांच्यासाठी टाकीच्या फ्लॅपजवळ सुविधाजनक ठिकाणी देण्यात आले आहे
  • गिअर स्थिती निदर्शक – परिपूर्ण गिअर शिफ्ट साध्य करण्यात आत्मविश्वास व अचूकतेसाठी
  • डिस्टन्स टू एम्प्टी रीडआउट – अधिक चांगल्या इंधन नियोजनासाठी इन्फिनिटी कन्सोलमध्ये समाविष्ट
  • खात्रीदायक ब्रेकिंग – पुढील बाजूस 300 मिमी आणि मागील बाजूस 230 मिमी आकाराने मोठा डिस्क ब्रेक व प्रगत एबीएस तंत्रज्ञानासह.
  • मजबूत पकड – कोणत्याही प्रकारच्या भूभागावर अधिक चांगल्या पकडीसाठी १००/८० -१७ F आणि १३०/१७ -१७R आकाराच्या मोठ्या टायर सह

या लाँचबद्दल बोलताना बजाज ऑटोचे कार्यकारी संचालक राकेश शर्मा म्हणाले, “बरोबर दोन दशकांपूर्वी २८ ऑक्टोबर २००१ रोजी बजाज ऑटोने पहिली पल्सर लाँच करून आणि भारतात मोटरसायकलिंगमध्ये कायमस्वरुपी बदल घडवून आणला. त्यानंतर पल्सरच्या पुढील आवृत्त्या लाँच झाल्या ज्यांनी भारतात आणि जागतिक पातळीवर नवे मापदंड स्थापित केले आणि ५० देशांमध्ये पल्सर हा सर्वात लोकप्रिय मोटरसायकलिंग ब्रँड झाला. आज दोन नवीन पल्सर 250 लाँच करत पल्सरने हा मापदंड पुन्हा एकदा उंचावला आहे. या दोन अप्रतिमपणे घडविलेल्या बाइकमुळे पल्सरमेनीयाक्सना प्रचंड आनंद होईल आणि पल्सर ब्रँडकडे व बाइकिंगच्या क्वार्टर लिटर श्रेणीकडे अधिक रायडर्स आकर्षित होतील, अशी आम्हाला खात्री आहे.

रु.१,३८,००० (पल्सर N250) आणि रु.१,४०,००० (पल्सर F250) या आकर्षक किमतीत (एक्स-शोरूम, दिल्ली) उपलब्ध असलेली पल्सर 250 ही बाइक टेक्नो ग्रे आणि रेसिंग रेड या दोन रोमांचक रंगांमध्ये उपलब्ध आहे.