फोटो सौजन्य: Freepik
पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. या दिवसात आपल्याला निसर्गाचे मनमोहक रूप पाहायला मिळत असते. एरवी उन्हाळ्यात सुकलेल्या झाडांच्या पानांना पावसाळ्यात नवी पालवी फुटते आणि सुकलेली जंगलं पुन्हा एकदा हिरवीरगार होतात. हीच हिरवाई अनुभवण्यासाठी शहरातील पर्यटक मग लॉन्ग ट्रिपचे प्लॅन बनवत असतात. त्यातही जर तुमच्याकडे स्वतःची बाईक असेल तर मग फिरण्याचा प्लॅन होणारच. पण अनेकदा पावसळ्यात बाईक स्टार्ट होत नसल्याची समस्या उद्भवत असते.
पावसाळ्यात बाईक सुरू न होण्याच्या समस्येला अनेकांना सामोरे जावे लागते. या समस्येमागे बाईकच्या इलेक्ट्रिकल सिस्टीममधील हस्तक्षेप किंवा इतर कारणे असू शकतात. अशावेळी बाईकस्वराची चांगलीच तारांबळ उडते. म्हणून आज आपण जाणून घेऊया की पावसात बाईक स्टार्ट न झाल्यास काय करावे.
हे देखील वाचा: पावसाळ्यात बाईकस्वारांनी काय काळजी घ्यावी?
बाईकचा स्पार्क प्लग पावसात ओला होतो, त्यामुळे बाईक सुरू होत नाही. अशावेळी स्पार्क प्लेग स्वच्छ केले पाहिजे. यासह, तुम्ही स्पार्क प्लगच्या इलेक्ट्रोडमधील अंतर देखील तपासले पाहिजे. जर स्पार्क प्लेग खराब झाला असेल तर तो त्वरित बदला.
काहीवेळा पावसात बाईक उभी असताना पावसाचे पाणी इग्निशन स्विचमध्ये जाते, त्यामुळे बाईकपर्यंत करंट पोहोचत नाही. त्यामुळे ती स्टार्ट होण्यास समस्या उद्भवते. म्हणूनच इग्निशन स्विच चांगले तपासा आणि कोरडे करा.
पावसात, बॅटरीचे कनेक्शन ढीले होऊ शकते किंवा बॅटरी डिस्चार्ज होऊ शकते. बॅटरी टर्मिनल्स स्वच्छ आणि घट्ट करा. जर तुमची बॅटरी कमकुवत असेल तर ती पहिली चार्ज करा. त्याच वेळी, जर बॅटरी पुन्हा पुन्हा डिस्चार्ज होत असेल तर ती मेकॅनिककडून बदलून घ्या.
पावसाळ्यात फ्युएलच्या टाकीत किंवा कार्बोरेटरमध्ये पाणी शिरते, त्यामुळे फ्युएल योग्य प्रकारे बाईकमध्ये पोहोचत नाही. तुम्हाला असे वाटत असल्यास, फ्युएल लाइन व्यवस्थित तपासा आणि पाणी काढून टाकण्याचा प्रयत्न करा. यासोबतच फ्युएल फिल्टरमध्ये घाण किंवा पाणी शिरले आहे की नाही हे देखील चेक करा.
अनेकवेळा पावसात बाईक पार्क केल्यावर त्याच्या सायलेन्सरमध्ये पाणी साचते, त्यामुळे बाईक सुरू होत नाही. अशा स्थितीत सायलेन्सरमधून बाईक थोडीशी वाकवून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करा.
अनेक वेळा थंडीत किंवा पावसात दुचाकी सुरू होत नाही. अशा स्थितीत दुचाकीचा चोक वापरा. चोक खेचा आणि नंतर बाईक सुरू करण्याचा प्रयत्न करा.
वर नमूद केलेल्या सर्व उपायांनंतरही तुमची बाईक सुरू होत नसेल, तर तुमची बाईक मेकॅनिककडून तपासून घ्या.