बाजारात येणार नवीन CNG बाईक; जाणून घ्या फिचर

आता लवकरच कंपनी नवीन बाईक बाजारात आणणार आहे जी चालवण्यासाठी पेट्रोलची गरज नाही.

    सध्या पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पेट्रोलवर चालणारी गाडी प्रत्येकाच्या खिशाला परवडणारी राहिलेली नाही. दुचाकीसाठी बाजारामध्ये अनेक पर्याय आता उपलब्ध आहेत. यामध्ये नवनवीन फिचर देखील आहेत. मात्र या गाड्या खर्च वाढवणाऱ्या आहेत. तसेच दुचाकीतून निघणाऱ्या उत्सर्जनामुळे पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे. आता बजाजने या दोन्हीवर उपाय शोधला आहे. आता लवकरच कंपनी नवीन बाईक बाजारात आणणार आहे जी चालवण्यासाठी पेट्रोलची गरज नाही. या बाईकमध्ये पेट्रोलची टाकी असेल पण ही बाईक पूर्णपणे सीएनजीवरही धावणार आहे.

    बजाज कंपनीकडून लवकरच सीएनजी दुचाकी गाडी लॉन्च करण्यात येणार आहे. बजाज ऑटो 5-6 सीएनजी बाईक्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, त्यापैकी तीन मॉडेल्स या वर्षाच्या अखेरीस आणि उर्वरित मॉडेल पुढील वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च केले जाऊ शकतात. बजाज ही बाईक येत्या १८ जून रोजी लॉन्च करणार आहे. त्याची किंमत 80-85 हजार रुपये दरम्यान असू शकते. कंपनीने दर महिन्याला २० हजार सीएनजी बाईक विकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

    मीडिया रिपोर्टनुसार, बजाज करुन नवीन आणण्यात येणाऱ्या या सीएनजी दुचाकीसाठी अनेकजण उत्सुक आहेत. बजाजच्या या नवीन सीएनजी बाइकची किंमत पेट्रोलवर चालणाऱ्या बाइकच्या तुलनेत निम्म्याने कमी होईल. म्हणजेच ही बाईक तुमच्या खिशाला परवडणारी असणार आहे. सीएनजी बाईक नवीन नावाने बाजारामध्ये येईल आणि ती सध्याच्या मॉडेलपेक्षा पूर्णपणे वेगळी असेल. बजाजची नवीन सीएनजी बाईक चाचणी देखील झाली आहे. मात्र अद्याप डिझाईन समोर आलेले नाही.

    कंपनीच्या दाव्यानुसार, 70 हजार रुपयांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर मिळणार आहे.  पण एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये सीएनजी बाइक्स येणार नाहीत. सीएनजी बाईकमध्ये डिस्क ब्रेक, लांब सीट, अलॉय व्हील्स दिले जाऊ शकतात आणि पूर्णपणे डिजिटल क्लस्टर, सिंगल-चॅनल एबीएसचा समावेश होण्याची शक्यता आहे.