Harley Davidson च्या ‘या’ बाइकवर मिळणार ६५ हजारांची सूट

दुचाकी वाहन निर्मिती क्षेत्रातील नावाजलेल्या कंपन्यांपैकी एक असलेली कंपनी अर्थात अमेरिकेतील हार्ले डेव्हिडसन. महागड्या आणि अलिशान दुचाकी विकणाऱ्या या कंपनीची ख्याती आहे. कंपनीने कोरोनामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आणि जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने नवीन योजना आणली आहे.

मुंबई : दुचाकी वाहन निर्मिती क्षेत्रातील नावाजलेल्या कंपन्यांपैकी एक असलेली कंपनी अर्थात अमेरिकेतील हार्ले डेव्हिडसन. महागड्या आणि अलिशान दुचाकी विकणाऱ्या या कंपनीची ख्याती आहे. कंपनीने कोरोनामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आणि जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने नवीन योजना आणली आहे. याच योजनेअंतर्गत कंपनीने आपल्या एन्ट्री लेव्हलच्या स्ट्रीट ७५० या दुचाकीवर घसघशीत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे स्ट्रीट ७५० ची किंमत ६५ हजारांनी कमी झाली आहे. यामुळे आता हार्ले डेव्हिडसनची स्ट्रीट ७५० ही भारतातील सर्वात स्वस्त बाईक ५ लाख ३४ हजारांऐवजी ४ लाख ६९ हजारांना उपलब्ध होणार आहे.

अशी आहे स्ट्रीट ७५०?

>> स्ट्रीट ७५०लिमिटेड एडिशन बाइक
>> ७४९ सीसी लिक्वीड-कूल्ड इंजिन
>>या इंजिनमुळे ३७५० एरएमपी वर ६० एनएम पीक टॉर्क निर्माण होतो.
>> इंजिनला सहा स्पीड गिअरबॉक्स 
>> सस्पेन्शन: बाइकच्या पुढील चाकाला टेलोस्कोपिक फोर्क्स
>> आणि मागच्या चाकाला ट्विन शॉक अ‍ॅब्जॉर्बर्स
>> डिस्क ब्रेक आणि ड्यूअल चॅनेस एबीएस तंत्रज्ञान
>> स्ट्रीट ७५० ब्लॅक, ग्रे, व्हाइट आणि ऑरेंज अशा चार रंगांमध्ये उपलब्ध

स्ट्रीट रॉडवरही सूट

यापूर्वी हार्ले डेव्हिडसनने स्ट्रीट रॉडची BS6 मानांकन असलेल्या इंजिनच्या किंमतीमध्ये कापात केली होती. ही बाईक आता पाच लाख ९९ हजार रुपयांना उपलब्ध आहे. या बाईकच्या किंमतीमध्ये ५६ हजार ५०० रुपयांची सूट देण्यात आली आहे. आधी ही बाइक ६ लाख ५५ हजारांना उपलब्ध होती.

स्ट्रीट ७५० आणि स्ट्रीट रॉडवरील या ऑफर भारतातील सर्व डिलरशीप्सकडे उपलब्ध आहेत. टोकन म्हणून दहा हजार रुपये देऊन ही बाईक बुक करता येईल.