आज लाँच होणार येझदी अॅडव्हेंचर बाईक, रॉयल एनफिल्डला देणार टक्कर

येझदी बाइक्स 1960 च्या उत्तरार्धात भारतात बाजारात आल्या, त्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत त्यांची निर्मिती सुरू राहिली. येझदी रेंज ही अशीच एक अष्टपैलू बाइक होती ज्यामध्ये रोडकिंग, क्लासिक, सीएल II, मोनार्क इत्यादी बाइक्सचा समावेश असायचा. भारतात येझदी बाइक्सची एक वेगळीच क्रेझ आहे, अनेकदा बॉलिवूड चित्रपटांमध्ये मोठ्या कलाकारांनी पाहिलेली आहे.

    1970 च्या दशकातील तरुणांची क्लासिक जावा बाइक, येझदी पुन्हा एकदा धमाल करायला सज्ज झाली आहे. महिंद्राच्या मदतीने त्याचे नवीन मॉडेल ‘येझदी रोड किंग’ आज लॉन्च होणार आहे. येझदी रोडकिंगमध्ये 334cc सिंगल सिलेंडर इंजिन मिळू शकते. जावा पेराकमध्ये हे दिसून आले आहे. हे इंजिन 30 bhp कमाल पॉवर आणि 32.74 Nm पीक टॉर्क जनरेट करेल. यामध्ये ग्राहकाला 6-स्पीड गिअरबॉक्स मिळू शकतो. एवढेच नाही तर या मोटरसायकलला समोर 21-इंच स्पोक व्हील आणि मागील बाजूस 17-इंच व्हील मिळेल. दोन्ही बाजूला डिस्क ब्रेकही असतील. या गाडीची किंमत 1.60 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

    येझदी बाइक्स 1960 च्या उत्तरार्धात भारतात बाजारात आल्या, त्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत त्यांची निर्मिती सुरू राहिली. येझदी रेंज ही अशीच एक अष्टपैलू बाइक होती ज्यामध्ये रोडकिंग, क्लासिक, सीएल II, मोनार्क इत्यादी बाइक्सचा समावेश असायचा. भारतात येझदी बाइक्सची एक वेगळीच क्रेझ आहे, अनेकदा बॉलिवूड चित्रपटांमध्ये मोठ्या कलाकारांनी पाहिलेली आहे.

    ही बाईक लाँच केल्यानंतर त्याची थेट आणि टक्कर स्पर्धा रॉयल एनफिल्डच्या ऑफ-रोड बाईक Royal Enfield 350 (रु. 2 लाख) शी होऊ शकते.

    क्लासिक लीजेंड्सने पूर्वीचा झेक ब्रँड – जावा पुन्हा एकदा लोकांमध्ये आणून भारताला एक नवीन ओळख दिली आहे, एवढेच नाही तर कंपनीने यूके स्थित BSA मोटरसायकल ब्रँडचा देखील त्यात समावेश केला आहे. कंपनीने नवीन मोटरसायकलच्या वैशिष्ट्यांशी संबंधित इतर माहिती शेअर केलेली नसली तरी जुन्या आणि नवीन येझदी बाइक्समध्ये काही समानता दिसून येतात.