Tree scooter climbing a tree in just 30 seconds! The invention of the gardener of Mangalore

कर्नाटक येथील मंगळुरू शहरात राहणारे गणपती भट्ट यांनी अनोखी स्कूटर तयार केली आहे. ही स्कूटर आपल्याला पुढे नाही तर वर घेऊन जाते. या स्कूटरचे नाव ‘ट्री स्कूटर’ आहे. अवघ्या 30 सेकंदांत सुपारीच्या उंच झाडावर सरसर चढत जाते. नव्या आणि अनोख्या वाहनांबद्दल आपण ऐकतो. वाहनांना मॉडिफाय करून नवीन आविष्कार साकारले जातात. त्याची चर्चाही होते. त्यामध्ये आता ‘ट्री स्कूटर’ची भर पडली आहे(Tree scooter climbing a tree in just 30 seconds! The invention of the gardener of Mangalore).

    मंगळुरू : कर्नाटक येथील मंगळुरू शहरात राहणारे गणपती भट्ट यांनी अनोखी स्कूटर तयार केली आहे. ही स्कूटर आपल्याला पुढे नाही तर वर घेऊन जाते. या स्कूटरचे नाव ‘ट्री स्कूटर’ आहे. अवघ्या 30 सेकंदांत सुपारीच्या उंच झाडावर सरसर चढत जाते. नव्या आणि अनोख्या वाहनांबद्दल आपण ऐकतो. वाहनांना मॉडिफाय करून नवीन आविष्कार साकारले जातात. त्याची चर्चाही होते. त्यामध्ये आता ‘ट्री स्कूटर’ची भर पडली आहे(Tree Scooter Climbing On Tree in just 30 seconds! The invention of the gardener of Mangalore).

    या स्कूटरची खासियत म्हणजे ती सामान्य लोकांच्या कामाची नसली तरी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. ट्री स्कूटरमुळे कष्ट आणि मजुरीवरील खर्च कमी होतो.

    अवघ्या 30 सेकंदात चढता येते

    गणपती भट्ट यांची बाग आहे. बागेत सुपारीची झाडे आहेत. सुपारी काढण्यासाठी ते स्वत: झाडावर चढतात. त्यांना 60-70 फूट उंच पोफळीवर चढावे लागते. हे कष्टाचे तसेच धोकादायक काम आहे. विशेषतः पावसाळ्यात जास्त धोका असतो. झाडावर चढताना पाय घसरण्याचा धोका असतो. स्वतःच्या त्रासातून गणपती यांनी स्कूटर बनवली. त्यावर बसून ते झाडावर चढतात. अवघ्या तीस सेकंदात ते झाडावर चढून सुपारी काढतात.

    अशी आहे रचना

    ट्री स्कूटरचा आविष्कार गणपती भट्ट यांनी घरातच साकारला आहे. त्यामध्ये लहान मोटर लावली आहे आणि एक सीट आहे. दोन्ही चाके एकमेकांच्या जवळ आहेत. त्यामुळे झाडावर घट्ट पकड बसते. याशिवाय सीट बेल्टदेखील आहे. स्कूटरच्या हॅण्डलला ब्रेक आणि क्लच लीव्हर आहे. ट्री स्कूटरवर बसून जेव्हा एक्सलरेटर फिरवले जाते, तेव्हा टायर फिरते. झाडावर दोन्ही बाजूंनी पकड ठेवून सहजरीत्या चढता येते.

    2000 झाडांवर यशस्वी परीक्षण

    भट्ट यांनी सांगितले की, त्यांनी सुमारे 2000 झाडांवर ट्री स्कूटर चालवून परीक्षण केले होते. त्यांना माहीत होते की ही स्कूटर मऊ आणि आर्द्रता असलेल्या पृष्ठभागावर चालणार नाही. यासाठी स्कूटर खरेदी करणाऱ्यांना ते तशी कल्पना देतात. सिंगापूर, दक्षिण आफ्रिका व थायलँडच्या कंपन्यांनी त्यांना स्कूटर बनविण्यासाठी संपर्क साधला होता, पण त्यांनी स्पष्ट नकार दिला.

    आतापर्यंत 300 स्कूटरची विक्री

    2014 रोजी गणपती यांनी स्कूटरचे काम सुरू केले. साधारण 40 लाख रुपये खर्चून ट्री स्कूटर साकारली. एका स्कूटरची किंमत 62 हजार रुपये आहे. त्यांनी आतापर्यंत 300 स्कूटर विकल्या आहेत. शेतकऱ्यांना ते सवलत देतात. वाढते वय आणि स्वस्त मजूर मिळत नसल्याने त्यांनी हा प्रयोग केला आणि यशस्वी करून दाखवला.