BMW ने भारतात लाँच केली M 1000 RR, जाणून घ्या आकर्षक फीचर्सवाल्या बाइकची किंमत

बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाने गुरुवारी एका निवेदनात म्हटलं की, ही गाडी भारतात बीएमडब्ल्यूच्या डिलरशीपच्या माध्यमातून गुरुवारपासून बुक करता येणार आहे.

  नवी दिल्ली : जर्मनीची ऑटोमोटिव कंपनी बीएमडब्ल्यू (BMW) ने गुरुवारी भारतात आपली प्रिमियम मोटरसायकल एम1000 आरआर (M 1000 RR) सादर केली, जिची शोरूम किंमत 42 लाख रुपयांपासून सुरू होते.

  बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाने गुरुवारी एका निवेदनात म्हटलं की, ही गाडी भारतात बीएमडब्ल्यूच्या डिलरशीपच्या माध्यमातून गुरुवारपासून बुक करता येणार आहे.

  View this post on Instagram

  A post shared by BMWMotorrad_IN (@bmwmotorrad_in)

  ही मोटरसायकल दोन प्रकारात बीएमडब्ल्यू एम 1000 आरआर (किंमत 42 लाख रुपये) आणि बीएमडब्ल्यू एम 1000 आरआर कंप्टीशन (किंमत 45 लाख रुपये) मध्ये उपलब्ध आहे.

  बीएमडब्ल्यू एम 1000 आरआर एक 999 सीसी, 4-सिलेंडर इन-लाइन इंजिनद्वारे संचालित होते आणि 3.1 सेकंदात 0-100 किमी अंतर पार करते.