पेट्रोल-डिझेल कार Electric करण्याचा पर्याय, इंधन किटच्या जागी ई-मोटर आणि बॅटरी लावणार, दरवर्षी एका लाखांची होणार बचत

दिल्लीत सध्या ३८ लाख जुन्या कार आहेत. त्यातील ३५ लाख पेट्रोल तर ३ लाक कार डिझेलवरील आहेत. नॅशनल ग्रीन ट्रिब्युटने (National Green Tribute) १० वर्षांहून जुन्या डिझेल कार आणि १५ वर्षांहून जुन्या पेट्रोल कार्सना दिल्लीत पूर्णपणे बंदी घातली आहे.

    नवी दिल्ली : ही बातमी दिल्लीची असली तरी येत्या काळात ही संपूर्ण देशावर परिणाम करु शकणारी आहे. १० वर्ष जुन्या असलेल्या डिझेल कार्सना, Electric मध्ये रुपांतरित करण्याची परवानगी दिल्ली सरकारने (Delhi Government) दिली आहे. म्हणजेच जुनी गाडी तुम्हाला भंगारात देण्याची गरज पडणार नाही. डिझेल कारचे इलेक्ट्रिक कारमध्ये रुपांतरित करण्याच्या खर्चात दिल्ली सरकार सबसिडीही (Subsidy) देणार आहे.

    दिल्लीत सध्या ३८ लाख जुन्या कार आहेत. त्यातील ३५ लाख पेट्रोल तर ३ लाक कार डिझेलवरील आहेत. नॅशनल ग्रीन ट्रिब्युटने (National Green Tribute) १० वर्षांहून जुन्या डिझेल कार आणि १५ वर्षांहून जुन्या पेट्रोल कार्सना दिल्लीत पूर्णपणे बंदी घातली आहे. अशा स्थितीत डिझेल गाड्या इलेक्ट्रिकवर करण्याचा पर्याय दिल्ली सरकारने खुला केला आहे.

    डिझेल कार इलेक्ट्रिक करण्यासाठी साधारण ४ ते ५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. पण यातील कंपन्यांची संख्या वाढली तर तर यासाठीचा खर्चही कमी होईल. सध्या सरकार किती सबसिडी देईल हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.

    इंधनाच्या कार इलेक्ट्रिकमध्ये रुपांतरित करणाऱ्या कंपन्या सध्या हैदराबादेत आहेत. ईट्रायो, ऑर्थवेएमएस अशी या दोन कंपन्यांची नावे आहेत. या कंपन्या कोणत्याही कार्सना इलेक्ट्रिकमध्ये बदलून देतात.