३१ डिसेंबरपूर्वी चारचाकी वाहनांची करा खरेदी, नवीन वर्षात वाहनांच्या किंमतीबाबत होंडा कंपनीचा मोठा निर्णय

होंडाच्या (Honda Car Company) आधीच काही कार कंपन्यांनी जानेवारी २०२१ पासून विविध मॉडेल्सच्या (Models) किंमतीत वाढ होणार असल्याची घोषणा केली आहे. गेल्या आठवड्यात रेनॉ इंडियाने (Reno India) जानेवारीपासून सर्व वाहनांच्या (Price) किंमतीत २८००० रुपयांपर्यंत वाढ करणार असल्याचं जाहीर केलं.

जानेवारी २०२१ पासून होंडाने (Honda) वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याची योजना आखली आहे. याबाबत कंपनीच्या सर्व डिलर्सना (Dealers)  सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र नेमकी किती वाढ होणार याबाबत अद्याप कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. कोणत्या मॉडेल्सच्या (Models)  किंमतीत किती रुपये वाढ झाली आहे याची माहिती देण्यासाठी कंपनीकडून जानेवारी २०२१ मध्ये सर्व मॉडेल्सच्या नव्या किंमतीची (New Price) यादी जाहीर केली जाईल.

होंडाच्या आधीच काही कार कंपन्यांनी जानेवारी २०२१ पासून विविध मॉडेल्सच्या किंमतीत वाढ होणार असल्याची घोषणा केली आहे. गेल्या आठवड्यात रेनॉ इंडियाने जानेवारीपासून सर्व वाहनांच्या किंमतीत २८००० रुपयांपर्यंत वाढ करणार असल्याचं जाहीर केलं. याशिवाय, मारुती सुझुकी, फोर्ड इंडिया आणि महिंद्रा अँड महिंद्रानेही कच्च्या मालाच्या व गाड्यांच्या पार्ट्सच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे वाहनांच्या किंमती वाढवल्या.

कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने वाहनांच्या इनपूट कॉस्टमध्ये होत असलेला खर्च भरुन काढण्यासाठी किंमतीत वाढ होत असल्याचं होंडाच्या डिलरकडून सांगण्यात आलं आहे. देशातील आघाडीची टू-व्हिलर कंपनी हीरो मोटोकॉर्पनेही आपल्या वाहनांच्या किंमतीत १ जानेवारी २०२१ पासून १५०० रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे.

होंडाकडे कॉम्पॅक्ट सिडान अमेझपासून महागडी एसयूव्ही सीआर-व्हीसारख्या गाड्या आहेत. अमेझची बेसिक किंमत ६.१७ लाख रुपये, तर सीआरव्हीची बेसिक किंमत २८.७१ लाख रुपये आहे. याशिवाय होंडा सिटी, सिविक, जॅझ, डब्लयूआरव्ही यांसारख्या अन्य अनेक लोकप्रिय कार कंपनीकडे आहेत.