Jugaad Mini Ford of 1930s model after Jugaad Gypsy; Abandoned experiment of Sangli Man

सांगलीच्या आणखी एका अवलियाने जुगाड गाडीचा भन्नाट प्रयोग केला आहे.अवघ्या 30 हजार रुपयात भंगारातील साहित्य आणि दुचाकीचा इंजन असा जुगाड करत 1930 सालाच्या मिनी फोर्ड गाडीचे मॉडेल बनवले आहे.आठवी पास असणारया अशोक आवटी या मॅकेनिकल कारागिराने ही ओल्ड मॉडेल जुगाड गाडी बनवली आहे( Jugaad Mini Ford of 1930s model after Jugaad Gypsy; Abandoned experiment of Sangli Man).

  सांगली:  सांगलीच्या आणखी एका अवलियाने जुगाड गाडीचा भन्नाट प्रयोग केला आहे.अवघ्या 30 हजार रुपयात भंगारातील साहित्य आणि दुचाकीचा इंजन असा जुगाड करत 1930 सालाच्या मिनी फोर्ड गाडीचे मॉडेल बनवले आहे.आठवी पास असणारया अशोक आवटी या मॅकेनिकल कारागिराने ही ओल्ड मॉडेल जुगाड गाडी बनवली आहे( Jugaad Mini Ford of 1930s model after Jugaad Gypsy; Abandoned experiment of Sangli Man).

  नुकतेच देवराष्ट्रे येथील फेब्रिकेशन व्यवसायिक असणाऱ्या दत्तात्रय लोहार यांनी जुगाड जिप्सी गाडी बनवली होती, त्याचा चर्चा सुरू असताना आता आणखी एक जुगाड गाडी सांगलीत तयार झाली आहे. सांगली शहरातल्या काकानगर या ठिकाणी राहणाऱ्या अशोक आवटी मेकॅनिकल कारागिराने आपल्या कल्पक बुद्धीने चक्क चार चाकी गाडी बनवली आहे.

  आवटे यांचे ट्रॅक्टर आणि दुचाकीचा गॅरेज आहे.2019 च्या लॉकडाऊनच्या काळामध्ये युट्युबवर त्यांनी काही व्हिडिओ बघितले आणि आपल्या लहान मुलांना काही तर वेगळे पण चार चाकी गाडी बनवता येईल,का यासाठी प्रयत्न सुरू केला.आणि तब्बल अडीच वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि परिश्रमानंतर एक भन्नाट चार चाकी गाडी बनवली आहे आणि ही अगदी हुबेहूब 1930 सालच्या फोर्ड गाडी प्रमाणे तयार केली आहे.

  विशेष म्हणजे भंगारातील आणि दुचाकी व रिक्षाचे साहित्यातुन ती गाडी साकारली आहे,या गाडीची इंजन हे एमएटी दुचाकीचे आहे.गाडी सुरू करण्यासाठी रिक्षा प्रमाणे हँडल आहे,आणि रिव्हर्स गिअरसाठी या गाडीला रिक्षाचा गिअरबॉक्स बसवला आहे.स्टेरिंग हा छोट्या ट्रॅक्टरचा आहे,तर चाके ही एमएटी दुचाकीचे आहेत.आणि तीन गियर असणारी ही चार चाकी फोर्ड गाडी,प्रति लिटर 30 किलोमीटर इतके मायलेज देते.

  चार व्यक्ती या गाडीमध्ये बसू शकतात,हेडलाईट अशा सर्व गोष्टी डाळिंब मधील अशोक आवटी यांनी कल्पकतेने बसवल्या आहेत. आणि आता आवटी यांची हे भन्नाट 130 मॉडेलच्या फोर्ड गाडी प्रमाण हुबेहूब तयार झाली आहे.  आता ती रस्त्यावर धावू लागली असून येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष ही मिनी फोर्ड गाडी वेधत आहे.नुकताच देवराष्ट्रे येथील फेब्रिकेशन व्यवसाय करणारे दत्तात्रेय लोहार यांनी अशाच पद्धतीची भंगारातील साहित्य आणि दुचाकीचा इंजन याच्या माध्यमातून जुगाड जिप्सी तयार केली आहे.

  याची दखल अगदी आनंद महिंद्रा यांनी देखील घेतली त्यामुळे ही गाडी सध्या चर्चेत आहे, असे असताना सांगलीतल्या एका अशोक आवटी यांनीही एक जुगाड चार चाकी गाडी बनवली आहे.

  हे सुद्धा वाचा
  • 2022