
किआ कॅरेन्स, तीच्या बोल्ड डिझाइन आणि अग्रेसर वैशिष्ट्यांसह, प्रेक्षकांवर कायमचा प्रभाव टाकते. त्याची डायनॅमिक आणि ठळक भूमिका तिच्या इंटेरियर डिझाइनमध्ये अष्टपैलुत्वाचा समावेश करताना SUV सारखी रस्त्यावर उपस्थिती देते.
- किआ कॅरेन्स आधुनिक भारतीय कुटुंबांना नवकल्पकता देते
- पुनर्परिभाषित अष्टपैलुत्व, उत्तम आणि नवीन प्रकारचे डिझाइन आणि अग्रेसर वैशिष्ट्ये
- किआ कनेक्टसह अत्याधुनिक कनेक्टिविटी, ओव्हर-द-एयर त्रासमुक्त अपडेट्सची वैशिष्ट्ये
- अती सुरक्षित सुरक्षा पॅकेजसह ड्रायव्हर सहाय्य
नवी दिल्ली : किआ (Kia) कॉरपोरेशनने आज भारतामध्ये जागतिक प्रीमिअर कार्यक्रमादरम्यान कॅरेन्सची (Carens) सुरूवात केली. रिक्रिएशनल व्हेइकल (RV) हे किआचे भारतात बनलेले जागतिक प्रॉडक्ट आहे जे कौटुंबिक प्रवाशांना अत्याधुनिकता आणि एकाच पॅकेजमध्ये SUV चा स्पोर्टीनेस देते.
आधुनिक भारतीय कुटुंबासाठी डिझाईन केलेली किआ कॅरेन्स (Kia Carens) ही तिच्या वर्गवारीतील सर्वात लांब व्हीलबेस सह आरामदायी आणि प्रशस्त थ्री-रो सीटर गाडी आहे. या कारमध्ये पहिल्यांदाच भारतामध्ये अती सुरक्षित सुरक्षा पॅकेज आहे जे सर्व ट्रीममध्ये प्रमाणित आहे ज्यामध्ये सहा एअरबॅग आहेत ज्यामुळे ती भारतामधील सर्वात सुरक्षित गाडी बनली आहे. किआ कॅरेन्स ही कनेक्टेड कार सुद्धा आहे ज्यामध्ये अग्रेसर वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे उद्योगामध्ये नवीन बेंचमार्क निर्माण करते.
किआ कॉरपोरेशनचे अध्यक्ष आणि सीईओ सुंग साँग म्हणाले “तीच्या बोल्ड डिझाइन, अत्याधुनिक फिचर्स, आणि उद्योगातील अग्रेसर सुरक्षा सिस्टीम यांमुळे किआ कॅरेन्स पूर्ण नवीन क्षेत्र निर्माण करण्यासाठी आणि कौटुंबिक गाडीसाठी उदयोगातील बेंचमार्क तयार करण्यासाठी तयार आहे.” ते पुढे म्हणाले, “भारतामध्ये कॅरेन्सची सुरूवात करण्याबद्दल किआ विशेष उत्साही आहे, जेथे नवीन कल्पना आणि नवकल्पकता आकार घेतात. किआ कॅरेन्स आधुनिक कुटुंबांना त्यांच्या दैनंदिन आणि विश्रांती जीवन दोन्हींमध्ये अर्थपूर्ण अनुभव देईल याचा आम्हाला विश्वास आहे.”
किआ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ टी-जिन पार्क म्हणाले, “भारत हा वैविध्यपूर्ण आहे, आणि येथील लोकांचे प्राधान्य वेगवेगळे आहे. कॅरेन्सचा विकास करत असताना आम्ही अनलॉक करण्याचा प्रयत्न करतो हा फार आकर्षक दृष्टीक्षेप आहे. ती सुरक्षित आहे, भरपूर फिचर्स त्यामध्ये आहे, डिझाइन उत्तम आहे, आणि आरामदायी आणि क्लासी आहे; तीच्यामध्ये एखाद्या आधुनिक भारतीय कुटूंबाला तीच्या गाडीमध्ये जे काही हवे असते ते सर्वकाही आहे. कॅरेन्स ही सर्वच पैलूने किआ कडून असलेली आणखीन एक वास्तव ग्राहक केंद्रित ऑफर आहे. गाडीची रचना पूर्णपणे कुटूंबासाठी नवक्रांतीक आणि पुनर्परिभाषित पद्धतीने करण्यात आली आहे, ही गाडी म्हणजे आमच्या विवेकी भारतीय ग्राहकांसाठी समर्पित गेम-चेंजिंग प्रॉडक्ट आहे.”
किआ कॅरेन्स 2022 च्या पहिल्या त्रैमासीकात भारतामध्ये तसेच निवडक मार्केटमध्ये उपलब्ध होईल.
ठळक वैशिष्ट्ये
किआ कॅरेन्स, तीच्या बोल्ड डिझाइन आणि अग्रेसर वैशिष्ट्यांसह, प्रेक्षकांवर कायमचा प्रभाव टाकते. त्याची डायनॅमिक आणि ठळक भूमिका तिच्या इंटेरियर डिझाइनमध्ये अष्टपैलुत्वाचा समावेश करताना SUV सारखी रस्त्यावर उपस्थिती देते.
किआ कॅरेन्स 7DCT आणि 6AT सह अनेक ट्रान्समिशन पर्यायांसह पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पॉवर ट्रेन्स ऑफर करून आपल्या ग्राहकांना उत्साहित करते. आश्रयदात्यांसाठी जीवन सोपे बनवणाऱ्या अनेक व्यावहारिक वैशिष्ट्यांसह ही कार सुसज्ज आहे. नेक्स्ट जनरेशन किआ कनेक्ट ऍपसारखे कनेक्टिव्हीटी फिचर्स, कसेही बसता येणारा पर्याय, स्लाइडींग प्रकारचा सीट अंडर ट्रे, रिट्रॅक्टेबल सीटबॅक टेबल, रियर डोअर स्पॉट लँप आणि थर्ड रो मध्ये बॉटल आणि गॅजेट होल्डर यांसारखे फिचर्स यामुळे कॅरेन्स अक्षरशः ऑटोमोटिव्ह व्यावहारिकता पुन्हा परिभाषित करते.
किआ कॅरेन्समध्ये विविध अग्रेसर फिचर्स आहेत, ज्यामुळे ती भारतामधील विद्यमान कौटुंबिक प्रवास्यांना एक धार देते. शिवाय, कार थ्री-रो सीटर क्षेत्रामध्ये खूप आवश्यक उत्साह आणते. यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे:
१. नेक्स्ट जनरेशन किआ कनेक्टसह 26.03 सेमी (10.25”) एचडी टचस्क्रीन नेव्हीगेशन
२. BOSE प्रीमियम साऊंड सिस्टीम 8 स्पीकर सह
३. केबिन सराऊंड 64 कलर एम्बीएन्ट मूड लाइटींग
४. विषाणू आणि जीवाणूंपासून संरक्षणासह स्मार्ट शुद्ध एयर प्युरीफायर
५. अती सुरक्षित सुरक्षा प्रमाणीत पॅकेज – (6 एयरबॅग, ESC+VSM+HAC+DBC+ABS+BAS, सर्व ट्रीममध्ये सर्व प्रमाणीत व्हील डिस्क ब्रेक्स)
६. व्हेंटीलेटेड फ्रंट सीट
७. एम्बीएन्ट मूड लाइटींग सह लिंक असलेले मल्टी ड्राईव्ह मोड्स (स्पोर्ट/इको/नॉर्मल)
८. दुसऱ्या ओळीतील सीट “एक टच सोपे इलेक्ट्रीक टंबल ”
९. स्काय लाईट सनरूफ
१०. वर्गवारीतील सर्वात लांब व्हीलबेस असलेली मोठी केबीन स्पेस
डिझाईन
किआ केरेन्सच्या एक्सटेरियरमध्ये कंपनीच्या नवीनतम डिझाइन तत्त्वज्ञान ‘ऑपोजिट्स युनायटेड’ ला मूर्त रूप दिले आहे. SUV सारखे एक्सटेरियर डिझाइन किआ कॅरेन्सचा आत्मविश्वास आणि नावीन्य दर्शवते. तीच्या बोल्ड बाजूच्या प्रोफाईलमधील एजी कॅरेक्टर लाईन्स आणि रिच व्हॉल्यूम यांमुळे कॅरेन्सला स्पोर्टी परंतु अत्याधुनिक लूक मिळतो. केरेन्सची आधुनिक आणि उच्च-तंत्रज्ञानाचे डिझाइन लक्षवेधी वैशिष्ट्ये आणि अद्वितीय सौंदर्यासह हजारो वर्षांसाठी आहे. हेडलॅम्पमधील DRL किआच्या नवीन सिग्नेचर लाइटिंग संकल्पना-‘द स्टार मॅप’ वर आधारित आहे. अप्पर ग्रीलमध्ये हॉरीझाँटल क्रोम गार्नीश आणि लोवर बंपरमधील फ्रेम-प्रकारचे क्रोम गार्नीश आकर्षक वाघाचा चेहराच एकप्रकारे निर्माण करतो. SUV-सारखी साईड प्रोफाईल, पुश बॅक ए-पिलरसह हाय फ्रंटएंड, आणि इष्टतम ग्राऊंड क्लियरंससह स्ट्रेट रूफलाईन यांमुळे तीला सक्षम रिक्रीएशनल व्हेइकल बनवते.
कार तीच्या स्लिम DLO ग्राफिकसह आकर्षक आणि गतिमान दिसत असताना, ती बहु-सीटर व्हेइकल म्हणून मोठी हेडरूम देखील देते. मागील भागात, दणकट क्षेत्रात काँबीनेशन लँपमुळे कॅरेन्सला रूंद आणि बळकट लूक मिळते. स्टार मॅप LED तीला अत्याधुनिक अनुभव देतो आणि थ्री-डायमेंशनल क्रोम गार्नीश तीच्यामध्ये स्पोर्टी लूक आणते. किआ कॅरेन्समध्ये तीन नवीन रंग आले आहेत – एझुराईट मिनरल्सने प्रेरित मायस्टेरियस इंपेरियल ब्लू, निराळ्या लूकसाठी लो सॅच्युरेशन मॉस ब्राऊन, आणि मेटल पार्टीकलसह स्पार्कलींग सिल्व्हर जो पेंटला नवीन चैतन्य देतो.
किआ कॅरेन्सचे इंटेरियर ‘कारणासाठी आनंद’ या डिझाइन पिलरवर आधारित आहे – जे उबदार आणि आरामदायी सौंदर्याच्या एकत्रीकरणातून आनंद निर्माण करतो. किआ कॅरेन्सवर, भरपूर विचारपूर्वक स्टाइलींग तपशील असल्याने हे घटक एकत्रितपणे जाणवतात. या संबंधित, भारतीय कुटूंबांच्या आवश्यकता आणि जीवनशैली यांवर किआने फार संशोधन केले होते.
अत्याधुनिक इंटेरियरचे फिचर्स म्हणजे त्यामध्ये मनमोहक रंग, सर्व बसणाऱ्यांचे सामान व्यवस्थीत बसेल अशी स्टोरेज जागा यांचा समावेश आहे. डॅशबोर्डमध्ये रूंद हाय-ग्लॉस काळे पॅनल आहे जे एकूणच डिझाइनवर भर देते, तर डोअर ट्रीम्स स्टायलीश दिसतो आणि स्टोरेज जागेची निराळे डिझाइन सुद्धा त्यामध्ये आहे. एयरप्लेन सीटने प्रेरित, कॅरेन्समधल्या सर्व तीनही सीट ओळी सुंदर पद्धतीने मटेरियल, पॅटर्न आणि रंग जुळवून सौंदर्य आणि आराम दोन्ही देतात. सेंटर स्वीचची रचना निराळेपणाने केलेली आहे जेणेकरून ते कॅरेन्सने ऑफर केलेल्या स्मार्ट अनुभवावर प्रकाश टाकतील. दुसऱ्या ओळीमध्ये भरपूर फंक्शन आहेत, इंटीग्रेटेड कप होल्डर आणि टेक गॅजेटसाठी जागा यांसह सीटच्या मागच्या भागात मागे होणारे टेबल्स आहेत, ज्यामुळे निश्चीतपणे आनंददायी प्रवास अनुभव मिळतो. किआ कॅरेन्सचे इंटेरियर विविध गरजांसाठी विविध स्टोरेज जागा निर्माण करून वास्तवीक अनुभव देते आणि ते लहान असूनही मौल्यवान सोयीस्कर फिचर्स देते.
कारच्या विविध एक्सटेरियर आणि इंटेरियर डिझाईनच्या पैलूंमध्ये हे समाविष्ट आहे:
१. स्टार मॅप DRL सह क्रॉन जेवेल हेडलँप्स
२. स्टार मॅप एलईडी टेल लँप
३. R-16 – 40.62 (16”) ड्वेल टोन क्रीस्टल कट अलॉय व्हील्स
४. दोन टोन साईड डोअर गार्नीश
५. डायमंड नरलिंग पॅटर्नसह क्रोम रियर बंपर गार्नीश
६. रियर स्किड प्लेट – ब्लॅक प्रीमियम हाय ग्लॉस
७. हाय-ग्लॉस ब्लॅक साईड कव्हरसह इंटीग्रेटेड रियर स्पॉइलर
८. रियर सेंटर फेशिया रिफ्लेक्टर – कनेक्टेड प्रकारचे
९. प्रीमियम रन अराऊंड सिल्व्हर गार्नीश सह सिंग विंग प्रकारचे एयर व्हेंट्स डिझाइन
१०. निराळे काळे हाय ग्लॉस डॅशबोर्ड
सुरक्षा वैशिष्ट्ये
किआ कॅरेन्स ही खरी कौटुंबिक कार आहे, जी अनेक सक्रिय सुरक्षा वैशिष्ट्ये ऑफर करते. अती सुरक्षित सुरक्षा पॅकेज असलेले हे भारतामधील पहिलेच मॉडेल आहे. कॅरेन्सच्या सर्व ट्रीममध्ये प्रमाणीत सहा एयरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलीटी कंट्रोल (ESC), व्हेइकल स्टॅबिलीटी मॅनेजमेंट (VSM), हिल असीस्ट कंट्रोल (HAC), डाऊनहिल ब्रेक कंट्रोल (DBC), ब्रेक असीस्ट सिस्टीम (BAS), हायलाइन TPMS आणि ऑल व्हील डिस्क ब्रेक्स यांचा समावेश आहे. ESC कारला कर्षणाच्या नुकसानापासून वाचवते, HAC आणि DBC ड्रायव्हरला उंच आणि खोल रस्त्यावर ड्राईव्ह करायला आत्मविश्वास देतात. या व्यतिरीक्त, ड्रायव्हर अचानक ब्रेक दाबतो किंवा वळण घेतो त्यावेळी गाडीत बसलेल्यांना स्थिरता देऊन VSM त्यांच्या सुरक्षेची खात्री करतो, कंपनी फ्रंट पार्कींग सेंसर, हायलाईन TPMS, रेन-सेंसींग वायपर या सुविधा सुद्धा देते ज्यामुळे ड्रायव्हरला सर्व वेळी आत्मविश्वास मिळतो आणि ते रस्त्याच्या पुढील स्थितीवर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकतात.
किआ कनेक्ट
कॅरेन्स सह, कनेक्टेड कार प्लॅटफॉर्मला किआ कनेक्ट ऍपच्या नेक्स्ट जनरेशन सह पूर्ण सुधारणा मिळते, ज्याचा बदल UVO सिस्टीममध्ये झाला आहे. किआ कनेक्ट आता होस्ट अपडेटेड आहे आणि त्यात अतिरीक्त सुरक्षा आणि सोयीसह आकर्षक फिचर्स आहेत. किआ कनेक्टचे एक मोठे अपडेट म्हणजे OTA (ओव्हर दि एयर) मॅप आणि सिस्टीम अपडेट्सची सुधारणा, जी आता किआ वर्कशॉपला भेट न देता पूर्णपणे सॉफ्टवेअर अपडेट करू शकते. कॅरेन्समध्ये 60+ कनेक्टेड कार फिचर्स आहेत आणि सर्वात आकर्षक म्हणजे व्हेइकलचे AVNT आता दहा स्थानिक भाषांमध्ये सपोर्ट करणार आहे.
जागा आणि सोयीस्करपणा
किआ कॅरेन्स प्रत्यक्षात पुनर्परिभाषित करते आणि इंटेरियरमधील जागा आणि सोयीस्करपणा या फिचर्ससह नवीन मानक तयार करते. मोठी केबीन जागा मोठी तीसऱ्या ओळीतील लेगरूम तयार करते जी सर्वोत्तम कारच्या व्हीलबेस लांबीमुळे तयार होते. दुसऱ्या ओळीतील वन टच इझी इलेक्ट्रीक टंबल मुळे कारमधील आश्रयदात्यांचे आत जाणे आणि बाहेर जाणे सहज सोपे होते. दुसऱ्या ओळीमध्ये टेकून बसण्याचे आणि स्लाईड फंक्शन भरपूर आरामासाठी दिलेले आहे. भरपूर जागा आणि टेकून बसण्याच्या वैशिष्ट्यासह, तीसऱ्या ओळीतील सीट सुद्धा अधिकतम कार्बो जागेची खात्री करण्यासाठी बूटमध्ये फ्लॅट केल्या जाऊ शकतात.
कुटूंबाला प्रत्यक्ष सोय देण्यासाठी किआ कॅरेन्सची रचना करण्यात आली आहे. केबिनमध्ये असलेले 64 कलर एंबिएन्ट मूड लाइटींग पूर्णवेळ उत्तम वातावरण निर्मीती करतात. हवेशीर समोरील सीट आणि तीन ड्राईव्ह मोड्स ज्यांची नावे आहे स्पोर्ट्स, इको आणि नॉर्मल त्या त्रासमुक्त प्रवासाचा अनुभव देतात. कॅरेन्सचा एक सर्वोत्तम पैलू म्हणजे इंटेरियरमध्ये पुरेशा जागेचे व्यवस्थापन, ज्यामुळे कारमध्ये भरपूर जागा होऊ शकतते. कारमध्ये कूलींग कप होल्डर्स, कप आणि गॅजेट माऊंट असलेले रिट्रॅक्टेबल सीट बॅक टेबल, स्लाइडींग प्रकारचा सीटच्या खालचा ट्रे, सहज ढकलल्या जाणारा मागे होणारा कप होल्डर आणि स्लाइडींग ट्रे, अधिकतम सोयीस्करपणासाठी उत्तम एयर फ्रेशनर माऊंटींग सिस्टीम सुद्धा आहे. खरेतर, किआ कॅरेन्समध्ये सोयीस्करपणाची यादीच आहे, जसे की:
१. कप होल्डरसर दुसऱ्या ओळीतील सीटला मागे फोल्ड होणारा आर्मरेस्ट
२. पॅडल शिफ्टर
३. रूफ प्लश 2ऱ्या आणि 3ऱ्या ओळीतील डिफ्युज एसी व्हेंट्स
४. कुलिंग फंक्शनसह स्मार्टफोन वायरलेस चार्जर
५. किआ लोगो प्रोजेक्शनसह मागील दाराला स्पॉट लँप
६. मागील दाराला सनशेड पडदे
७. 5 USB C प्रकारचे इंटरफेस
८. इल्युमिनेश सह बोर्डींग असिस्ट करणारे हँडल
किआ कॅरेन्सबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी, कृपया वर्ल्ड प्रीमिअर व्हिडियो पहा