किआ कॅरेन्स ट्रिम डिटेल्स झाले उघड : प्रमाण म्हणून 6 एअरबॅग, 66 कनेक्टेड कार फिचर्स, 3 पॉवरट्रेन्स आणि 3 ट्रान्समीशन पर्याय

नेक्स्ट जनरेशन किआ कनेक्ट 26.03 सेमी (10.25") एचडी टचस्क्रीन नेव्हीगेशन, बोस प्रीमियम साऊंड सिस्टीम 8 स्पीकर सह, व्हायरस आणि बॅक्टेरिया सुरक्षा असलेले स्मार्ट प्युअर एयर प्युरिफायर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, 2 ऱ्या रो ला सीट वन टच इझी इलेक्ट्रीक टंबल आणि स्कायलाईट सनप्रुफ हे काही नवीन वैशिष्ट्य आहेत. किआ कॅरेन्स तीन पॉवरट्रेन पर्यायासह उपलब्ध आहे

    मुंबई : किआ इंडियाने, आज तीच्या सुरूवातीच्या आधीच किआ कॅरेन्सचे ट्रिम डिटेल्स आणि टेक्नीकल विवरण उघड केले. व्हेइकलची बुकिंग 14 जानेवारी 2022 पासून चालू होत आहे. 3-रो रीक्रिएशनल व्हेइकल, किआ कॅरेन्स 5 ट्रिम लेवलमध्ये ऑफर देईल – प्रीमियम, प्रेस्टीज, प्रेस्टीज प्लस, लक्झरी आणि लक्झरी प्लस, जे विविध पॉवरट्रेन आणि सीटिंग पर्यायांसह एकत्रित. सर्व 5 ट्रिम लेवल प्रमाण म्हणून दणक 10 उच्च-सुरक्षा पॅकेजची ऑफर देईल, ज्यामुळे कौटुंबीक प्रवासासाठी किआ कॅरेन्सचा प्रवास सुरक्षित होतो.

    पुढे, व्हेइकलमध्ये सर्वोत्तम फिचर्स येतात जसेकी, नेक्स्ट जनरेशन किआ कनेक्ट 26.03 सेमी (10.25″) एचडी टचस्क्रीन नेव्हीगेशन, बोस प्रीमियम साऊंड सिस्टीम 8 स्पीकर सह, व्हायरस आणि बॅक्टेरिया सुरक्षा असलेले स्मार्ट प्युअर एयर प्युरिफायर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, 2 ऱ्या रो ला सीट वन टच इझी इलेक्ट्रीक टंबल आणि स्कायलाईट सनप्रुफ हे काही नवीन वैशिष्ट्य आहेत. किआ कॅरेन्स तीन पॉवरट्रेन पर्यायासह उपलब्ध आहे – स्मार्टस्ट्रीम 1.5 पेट्रोल, स्मार्टस्ट्रीम 1.4 T-GDi पेट्रोल आणि 1.5 CRDi VGT डिझेल.

    पुढे, ग्राहकांना तीन ट्रान्समीशन पर्यायांमधून निवड करण्याचा सुद्धा पर्याय असेल. – 6MT, 7DCT आणि 6AT. प्रीमियम ते लक्झरी ट्रिम मध्ये व्हेइकल सात सीटर पर्याय देईल, तर लक्झरी प्लस ट्रिममध्ये 6 आणि 7 सीटर असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतील.

    किआ कॅरेन्स विकासाला दोन मोठ्या ग्राहक अपेक्षांनी मार्गदर्शन केले होते – फ्युचरिस्टीक आणि बोल्ड एक्सटेरियर आणि प्रेरणादायी इंटेरियर जे नवीन वयातील भारतीय कुटूंबांसाठी प्रशस्त, प्रीमियम, प्लश आणि फार प्रॅक्टीकल आहेत.

    किआ कॅरेन्स, टेक्नॉलॉजीकल पद्धतीने अत्याधुनिक व्हेइकल स्मार्ट आणि सोयीस्कर फिचर्सची सुविधा देते. व्हेइकल नेक्स्ट जनरेशन किआ कनेक्टसह सुधारित कनेक्टेड कार सुविधांची सोय सुद्धा देईल. ‘किआ कनेक्ट’ नेव्हीगेशन, रीमोट कंट्रोल, व्हेइकल मॅनेजमेंट, सुरक्षा आणि रक्षण आणि सोयीस्करपणा या अंतर्गत 66 कनेक्टेड फिचर्स देईल. विशेष म्हणजे, एकूण 66 फिचर्सपैकी 11 हे किआ कॅरेन्स ग्राहकांसाठी विशेष असतील, ज्यामध्ये अंतिम ठिकाणाचे मार्गदर्शन, सर्वर आधारित राऊटिंग मार्गदर्शन, रीमोट सीट व्हेंटिलेशन कंट्रोल, प्रो-ऍक्टीव व्हेइकल स्टेटस इलर्ट इत्यादी. ओव्हर द एअर मॅप अपडेट्स व्यतिरिक्त, किआ कॅरेन्स ग्राहकांना सॉफ्टवेअर अपग्रेड्ससाठी किआ फॅसिलीटीला प्रत्यक्ष भेट न देता ओव्हर दि एयर (OTA) सिस्टीम अपडेट्स मिळतात.

    किआ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO टी-जिन पार्क म्हणाले, “किआने नेहमीच भारतीय ग्राहकांसाठी व्यवस्थित विचार करून प्रॉडक्ट तयार करून भारतामधील गतिशीलतेत क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. किआ कॅरेन्स सह, विस्तारित भारतीय कुटुंबांच्या विकसित गरजा खऱ्या अर्थाने पूर्ण करून आम्हाला 3 रोच्या फॅमिली मूव्हर सेगमेंटमधील गरजांची तफावत दूर करायची आहे. आम्हाला कॅरेन्स बद्दल विश्वास आहे की, तीची वास्तव आणि सोयीस्कर फिचर्स मधून आराम देण्यासाठी रचना केलेली आहे, जी प्रवास्यांना प्रवासाचा निराळा अनुभव देणार आहे. आम्हाला आशा आहे की आमचे विवेकी ग्राहक आमच्या नवीनतम ऑफरची स्तुती करतील आणि भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगात बेंचमार्क स्थापित करणार्‍या आमच्या सर्व प्रॉडक्ट प्रमाणेच आवेशाने आणि उत्साहाने प्रतिसाद देतील.”

    3 रो व्हेइकलच्या आधुनिकीकरणाचे योग्य एकत्रीकरण आणि SUV ची स्टाईल आणि स्पोर्टीनेस यांमुळे किआ कॅरेन्स दोन्ही जगतात सर्वोत्तम आहे. किआ कॅरेन्स तीच्या वर्गवारीत सर्वात लांब व्हीलबेस असणारी व्हेइकल आहे आणि या सेगमेंटमधील आधीच्या व्हेइकलपेक्षा स्पर्धेने उच्च आहे. 2780 मीमी व्हीलबेस मुळे तिसऱ्या रो मध्ये सुद्धा प्रवासाचा आरामदायीच अनुभव येतो.

    ठळक वैशिष्ट्ये :

    ⇔किआ कॅरेन्स 5 ट्रिममध्ये सुविधा देईल – प्रीमियम, प्रेस्टीज, प्रेस्टीज प्लस, लक्झरी आणि लक्झरी प्लस
    ⇔ ESC आणि VSM सह दणकट 10 उच्च- सुरक्षा पॅकेज अंतर्गत 9 अतिरीक्त सुरक्षा फिचर्स सह सर्व ट्रिममध्ये 6 एअरबॅग्स प्रमाण
    ⇔ 3 पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध – स्मार्टट्रीम 1.5 पेट्रोल, स्मार्टट्रीम 1.4 T-GDi पेट्रोल आणि 3 ट्रान्समीशन पर्याय सह 1.5 CRDi VGT डिझेल – 6MT, 7DCT आणि 6AT
    ⇔ किआ कनेक्टच्या नेक्स्ट जनरेशन सह 66 कनेक्टेड कार फीचर्स
    ⇔ 6 आणि 7 सीटींग पर्यायांमध्ये उपलब्ध
    ⇔ वर्गात सर्वात लांब व्हीलबेस – तीच्या वर्गातील बऱ्याच व्हेइकलपेक्षा उच्च स्तराची आहे
    ⇔ 14 जानेवारी 2022 पासून बुकिंगची सुरूवात