किया ने किया कॅरेन्सचे अधिकृत स्केचेस प्रसिद्ध केले; बोल्ड, प्रीमियम आणि अत्याधुनिक मनोरंजन वाहन

किया कॅरेन्स (Kia Carens) कंपनीचे नवीन डिझाइन तत्वज्ञान 'ऑपोजिट्स युनायटेड' भारतात आणते. बोल्ड डिझाईन निसर्ग आणि मानवतेमध्ये आढळलेल्या विरोधाभासांमधून प्रेरणा घेते. डिझाईन तत्वज्ञान पाच बळकट खांबांवर आधारित आहे.

  • किया केरेन्स कंपनीच्या प्रशंसित डिझाइन तत्त्वज्ञान 'अपोझिट्स युनायटेड' मूर्त रूप देते
  • बोल्ड आणि साहसी एक्सटेरियर डिझाईनने मोहक आणि प्रीमियम केबिन तयार होते, आधुनिक भारतीय कुटुंबांसाठी कॅरेन्स आदर्श  बनते
  • किया कडून भारतामध्ये चालू झालेले कॅरेन्स हे चवथे प्रॉडक्ट आहे

मुंबई : किया (Kia) इंडियाने किया कॅरेन्सचे (Kia Carens) स्केचेस उघड केले, जी 16 डिसेंबर, 2021 ला कंपनीच्या जागतिक प्रीमियरसाठी कंपनीचे अत्यंत अपेक्षित असलेले प्रॉडक्ट आहे. आरामदायी इंटेरियर, स्मार्ट कनेक्टिव्हीटी फिचर्स, बोल्ड एक्सटेरियर आणि बसणाऱ्यांसाठी उत्तम जागा ज्यामध्ये तीसऱ्या रांगेचा सुद्धा समावेश आहे. त्या सर्वांसह, किया कॅरेन्स भारतात मनोरंजनात्मक वाहनांचा एक नवीन वर्ग तयार करण्यासाठी सज्ज आहे. किया कॅरेन्सची रचना ज्यांना एकत्र प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे अशा आधुनिक भारतीय कुटुंबांच्या विकसित, अपूर्ण गरजा लक्षात घेऊन केली गेली आहे.

किया कॅरेन्स (Kia Carens) कंपनीचे नवीन डिझाइन तत्वज्ञान ‘ऑपोजिट्स युनायटेड’ भारतात आणते. बोल्ड डिझाईन निसर्ग आणि मानवतेमध्ये आढळलेल्या विरोधाभासांमधून प्रेरणा घेते. डिझाईन तत्वज्ञान पाच बळकट खांबांवर आधारित आहे. निसर्गासाठी बोल्ड, कारणासाठी आनंद, प्रगतीसाठी शक्ती, जीवनासाठी तंत्रज्ञान, आणि शांततेसाठी तणाव. कॅरेन्सचे डिझाईन ‘निसर्गासाठी बोल्ड’ या थीमवर आधारित आहे आणि ब्रँडच्या नवीन डिझाईन कलाकडे जोडले जातांना निसर्गाच्या परिपूर्णतेला आणि साधेपणाला समर्पित करते.

किया केरेन्स (Kia Carens) कंपनीचे अनोखे आणि शक्तिशाली डिझाइन समोर आणते, जी तिच्या व्यक्तिरेखेत तारूण्य दर्शवते बाह्य भागामध्ये हाय-टेक स्टाइलिंग तपशीलांचा समावेश आहे, ज्यामध्ये समोरील कियाचे अद्वितीय टायगर फेस डिझाइन, उल्लेखनीयपणे हायलाइट केलेले इनटेक ग्रिल, एलईडी हेडलॅम्प आणि डेटाइम रनिंग लाइट्स (DRLs) यांचा समावेश आहे, जे सर्व मिळून एक मजबूत आणि प्रभावी लुक देतात. SUV सारखी साइड प्रोफाईल मस्क्यूलर भूमिका घेते आणि पुढे वाहनाची मजबूत पण परिष्कृत शैली अधोरेखित करते.

भारतातील गतिशील जीवनशैलीच्या गरजा आणि दैनंदिन वापरातील प्राधान्ये पूर्ण करण्यासाठी इंटीरियर डिझाइन केले आहे. हाय-टेक रॅपराउंड डॅश डिझाईन रुंद आणि आलिशान केबिनची छाप देत भविष्याभिमुख प्रतिमा दर्शवते दारांवर लावलेले क्रोम गार्निश एकंदर प्रीमियम फील वाढवते. 10.25-इंच ऑडिओ व्हिडिओ नेव्हिगेशन टेलीमॅटिक्स (AVNT) डॅशच्या मध्यभागी स्थित आहे, जो आधुनिक अनुभव देतो.

किया डिझाइन सेंटरचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख करिम हबिब म्हणाले, “किया केरेन्स (Kia Carens) आमच्या नवीनतम डिझाइन तत्त्वज्ञान ‘ऑपोजिट्स युनायटेड’ ला पूर्णपणे मूर्त रूप देते, आणि ते अत्याधुनिक व्यक्तिमत्त्व आणि अद्वितीय सौंदर्यशास्त्रासह स्पोर्टीनेसची यशस्वीरित्या जोडणी करते. “आजच्या ग्राहकांना त्यांच्या तीन-रो व्हेईकल मधून काय हवे त्यावर किया कॅरेन्स खरा प्रभाव टाकते.”

किया कॅरेन्स (Kia Carens) 16 डिसेंबर ला गुरूग्राम भारत येथे पदार्पण करणार आहे. किया कॅरेन्सचे जागतिक प्रीमियर पुढील ठिकाणी डिजीटल पद्धतीने बघितले जाऊ शकते.