
सध्या सीएनजी (CNG) संचालित व्यावसायिक वाहनांचे मालक (CV Owners) इंधन खर्चावर जवळपास ३५ टक्क्यांची बचत (Savings) करत आहेत. इंधन खर्चासंदर्भातील या लक्षणीय बचतीसह आता सीव्ही मालकांना 'MGL Hat-Trick Scheme' अंतर्गत जवळपास ४०,००० रूपये अनुदानाच्या माध्यमातून प्रोत्साहित करण्यात येईल.
मुंबई : महानगर गॅस लिमिटेड (MGL) या भारतातील आघाडीच्या नैसर्गिक वायू वितरण कंपनीने व्यावसायिक वाहन (CV) विभागामध्ये सीएनजीच्या वापराला चालना देण्यासाठी प्रोत्साहनदायी योजना ‘एमजीएल हॅट-ट्रिक योजना’ सुरू केली आहे.
सध्या सीएनजी (CNG) संचालित व्यावसायिक वाहनांचे मालक (CV Owners) इंधन खर्चावर जवळपास ३५ टक्क्यांची बचत (Savings) करत आहेत. इंधन खर्चासंदर्भातील या लक्षणीय बचतीसह आता सीव्ही मालकांना ‘MGL Hat-Trick Scheme’ अंतर्गत जवळपास ४०,००० रूपये अनुदानाच्या माध्यमातून प्रोत्साहित करण्यात येईल. ही योजना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वनुसार ३१ जानेवारी २०२२ या योजना कालावधीदरम्यान नवीन सीएनजी सीव्ही खरेदी करणाऱ्या किंवा विद्यमान सीव्हीला सीएनजीमध्ये बदलणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी लागू असेल.
हे प्रोत्साहन प्री-लोडेड एमजीएल इंधन कार्डच्या रूपात देण्यात येईल. हे कार्ड कोणत्याही विशेषीकृत एमजीएल सीएनजी स्टेशन्सवर सीएनजी खरेदीसाठी वापरता येऊ शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सबमिट करत योजनेसाठी नोंदणी करावी लागेल. अर्ज डाऊनलोड करण्यासाठी ग्राहक एमजीएल वेबसाइट www.mahanagargas.com ला भेट देऊ शकतात आणि कोणत्याही चौकशीसाठी एमजीएल कस्टमर केअर ०२२-६८६७५४०० / ६१५६४५०० या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
सीएनजी व्यावसायिक वाहनांसाठी ‘एमजीएल हॅट-ट्रिक योजना’ सुरू करण्याच्या एमजीएलच्या या उपक्रमाबाबत बोलताना व्यवस्थापकीय संचालक संजीब दत्त म्हणाले, ”एमजीएल नेहमीच आपल्या सर्व भागधारकांसाठी मूल्य निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करते आणि हा उपक्रम व्यावसायिक वाहन विभागामध्ये सीएनजी वापराला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. यामुळे हरित इंधनाच्या वापराला चालना देण्याप्रती लक्षणीय योगदान देण्यासोबत मुंबईतील व आसपासच्या भागांमधील प्रदूषण कमी होण्यामध्ये मदत होईल.”