निस्सान इंडियातर्फे निस्सान मॅग्नाईटच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी ‘निस्सान सर्कल प्रोग्राम’ सादर

ज्या ग्राहकांकडे निस्सान मॅग्नाईट किंवा KICKS मॉडेल्स आहे किंवा ज्यांनी बुक केली आहे असे ग्राहक निस्सान इंडियाच्या वेबसाइटवर या उपक्रमात स्वत:ची नोंदणी करू शकतात. निस्सान सर्कल प्रोग्राममध्ये नोंदणी केलेल्या सर्व ग्राहकांसाठी दरमहा खास ऑफर्स असतील आणि त्यातून त्यांना रीवॉर्ड पॉईंट्स जिंकण्याची संधी मिळेल. हे रीवॉर्ड पॉईंट्स अशुअर्ड ग्रॅटिफिकेशनमध्ये बदलता येतील.

  • निस्सान सर्कल प्रोग्रामच्या सदस्यांना अशुअर्ड रीवॉर्ड पॉईंट्स, दर महिन्याला खास ऑफर्स
  • ग्राहकांना पॉईंट्स जिंकता येतील, ते अशुअर्ड ग्रॅटिफिकेशनमध्ये बदलता येतील
  • इतरांना रेफरन्स देणाऱ्या ग्राहकांकासाठी अतिरिक्त बोनस

नवी दिल्ली : निस्सान इंडियाने (Nissan India) निस्सान मॅग्नाईटचा (Nissan Magnite) पहिला वर्धापन दिन (First Anniversary) साजरा करताना आपल्या ग्राहकांसाठी ‘निस्सान सर्कल प्रोग्राम’ (Nissan Circle Program) सादर केला आहे. सातत्याने ग्राहककेंद्राभिमुखता जपणाऱ्या या निस्सान सर्कल प्रोग्राममुळे ग्राहकांना ब्रँडसोबत जोडले जाणे शक्य होईल आणि परिणामी ब्रँडसोबत त्यांचे एक दृढ नाते प्रस्थापित होईल.

ज्या ग्राहकांकडे निस्सान मॅग्नाईट किंवा KICKS मॉडेल्स आहे किंवा ज्यांनी बुक केली आहे असे ग्राहक निस्सान इंडियाच्या वेबसाइटवर या उपक्रमात स्वत:ची नोंदणी करू शकतात. निस्सान सर्कल प्रोग्राममध्ये नोंदणी केलेल्या सर्व ग्राहकांसाठी दरमहा खास ऑफर्स असतील आणि त्यातून त्यांना रीवॉर्ड पॉईंट्स जिंकण्याची संधी मिळेल. हे रीवॉर्ड पॉईंट्स अशुअर्ड ग्रॅटिफिकेशनमध्ये बदलता येतील. निस्सान सर्कल प्रोग्राममध्ये नोंदणी केलेल्या ग्राहकांना निस्सान वेबसाइटवरील रीवॉर्ड स्टोअरच्या माध्यमातून हे अशुअर्ड ग्रॅटिफिकेशन रीडिम करता येतील. ट्रॅव्हल, फूड ॲण्ड बेव्हरेजेस, अपीरल, इलेक्ट्रॉनिक्स आणि अशा इतर अनेक विभागांमधील खास निवडक ब्रँड्सच्या यादीतून ग्राहकांना यात व्हाऊचर्स निवडता येतील.

ग्राहकांना त्यांचे रिवॉर्ड पॉईंट्स पेटीएम कॅशमध्येही बदलता येतील आणि त्यातून फक्त निस्सान डीलरशीपमध्ये त्यांना निस्सान ज्येन्युइन ॲक्सेसरीज आणि व्हॅल्यू ॲडेड सर्विसेस विकत घेता येतील. मित्रमंडळी किंवा कुटुंबियांना निस्सानची शिफारस करणाऱ्या ग्राहकांना निस्सान वेबसाइटवर संपर्क माहिती भरून अतिरिक्त रेफरल बोनसही जिंकता येईल. निस्सान सर्कल प्रोग्रामच्या ग्राहकांना त्यांनी शिफारस केलेले वाहन डिलिव्हर झाल्यानंतर हे पॉईंट्स रीडिम करता येतील आणि क्रेडिट केल्यानंतर एक वर्षभर हे पॉईंट्स वापरता येतील.

“ग्राहककेंद्राभिमुखता हाच आमच्या सर्व कार्यचलनाचा गाभा आहे आणि निस्सान मॅग्नाईटचा पहिला वर्धापन दिन साजरा करताना निस्सान सर्कल प्रोग्राम सादर करताना आम्हाला फार आनंद होत आहे कारण निस्सानसोबतच्या विविध लाभ मिळवून देणाऱ्या या प्रवासात सातत्याने ग्राहकांशी जोडले जाणे या आमच्या बांधिलकीचे एक प्रतिक म्हणजे हा उपक्रम,” असे निस्सान मोटर इंडिया लि.चे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तवर म्हणाले.

नव्या निस्सान मॅग्नाईटमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. यात सर्वोत्कृष्ट आणि या विभागातील सर्वात कमी देखभालीचा खर्च म्हणजेच ३० पैसे/किमी (५०००० किमी. साठी) इतका आहे. २ वर्षांची (५०००० किमी) वॉरंटी आणि अगदी कमी खर्चात ती ५ वर्षांपर्यंत (१००,०००) वाढवता येत असल्याने मन:शांतीही लाभते. निस्सान ग्राहकांना Nissan Service Hub किंवा Nissan Connect च्या माध्यमातून सर्विस बुक करता येते शिवाय निस्सान सर्विस कॉस्ट कॅलक्युलेटरच्या माध्यमातून ऑनलाइनच खर्चही जाणून घेता येतो. त्यामुळे १५०० हून अधिक* शहरांमध्ये उपलब्ध निस्सानच्या २४/७ रोडसाइड असिस्टंसच्या प्रक्रियेत पारदर्शकता जपली जाते.

आपल्या ग्राहकांचे आरोग्य आणि सुरक्षेला केंद्रस्थानी ठेवत निस्सान डीलरशीपमध्ये निस्सान आणि डॅटसून कार्ससाठी ‘डोअरस्टेप सेवेची सुविधा’ आणि ‘पिक आणि ड्रॉप ऑफ’सेवाही उपलब्ध आहेत. त्यामुळे जंतूसंसर्गाचा धोका कमी होतो शिवाय ग्राहकांच्या वेळापत्रकातही फारशी ढवळाढवळ केली जात नाही. तर, ‘निस्सान एक्स्प्रेस सर्विस’मध्ये फक्त ९० मिनिटांमध्ये जलद आणि सर्वसमावेशक सेवानुभव दिला जातो.

त्याचप्रमाणे, निस्सान इंडियाने आपल्या Shop@Home या डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून निस्सान मॅग्नाईट ग्राहकांसाठी या क्षेत्रातील या प्रकारची पहिलीच नाविन्यपूर्ण व्हर्च्युअल सेल्स ॲडव्हायझर सेवा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे गाडी विकत घेण्याचा ग्राहकांचा अनुभव अधिक समृद्ध होतो.

व्हर्च्युअल सेल्स ॲडव्हायझर निस्सान ग्राहकांना रीअल टाइम पर्सनलाइज्ड पद्धतीने उत्पादनाबद्दल माहिती देत संवाद साधतात. त्यातून गाडीबद्दलची माहिती दिली जाते, उत्पादन आणि गाडीच्या मालकीच्या संदर्भातील शंकांची, प्रश्नांची उत्तरे दिली जातात, वेगवेगळ्या व्हेरिएंटबद्दल मार्गदर्शन केले जाते, आर्थिक आणि एक्सचेंज व्हॅल्यूचे पर्याय दिले जातात, व्हर्च्युअल टेस्ट ड्राइव्ह दिली जाते शिवाय ऑनलाइन पद्धतीने गाडी बुकही करता येते. या व्यासपीठावर ग्राहकांना अथपासून इतिपर्यंत सगळी माहिती आणि व्यवहारात साह्य केले जाते. त्यामुळे माहितीवर आधारित खरेदीचा निर्णय घेण्यात ग्राहकांना साह्य केले जाते.

ग्राहकांना अथपासून इतिपर्यंतचा डिजिटल संपर्करहित गाडी खरेदी करण्याचा अनुभव Shop@Home या डिजिटल व्यासपीठावर अधिक वृद्धिंगत होतो. व्हर्च्युअल शोरूम आणि व्हर्च्युअल टेस्ट ड्राइव्हच्या माध्यमातून अधिक सुंदर अनुभ शक्य होतो, हे व्यासपीठ अगदी सहजरित्या तुमची कार पर्सनलाइज करण्याचा पर्याय पुरवते, सध्याच्या गाडीची एक्सचेंज व्हॅल्यू काय असेल याचा अंदाज घेते, ती ठरवते, ईएमआय पयार्यांमध्ये तुलना करते आणि ग्राहकांची पर्सनलाइज्ड कार बुक करण्याआधी कर्जासाठी अर्ज करते.

निस्सान इंडियातर्फे सबस्क्रिप्शन प्लॅनही दिला जातो. यात ग्राहकांना ‘व्हाईट प्लेट’ आणि ‘बाय बॅक ऑप्शन’ असे गाडी खरेदी करण्याचे पर्याय दिल्ली एनसीआर, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये दिले जातात. हा प्लॅन झीरो डाऊन पेमेंट, झीरो इन्शुरन्स कॉस्ट, झीरो मेंटन्सस कॉस्टमध्ये मिळतो.

निस्सान इंडियाकडील निस्सान आणि डॅटसन उत्पादनांची संपूर्ण श्रेणी कँटिन स्टोअर डिपार्टमेंट्समध्ये (सीएसडी) उपलब्ध आहे. सैन्यदलातील अधिकाऱ्यांना देशभरातील सीएसडी डेपोच्या माध्यमातून आता सर्व सीएसडी मान्यताप्राप्त पात्र सवलती आणि ऑफर्सचा लाभ घेता येईल.