PMPML ला मिळणार Olectra-Evey Trans च्या इलेक्ट्रिक बसेसचा नवा ताफा

प्रवाशांच्या सुखसोयीसाठी १२ मीटर लांबीच्या या वातानुकूलित बसेसमध्ये इलेक्ट्रॉनिक्स नियंत्रित एअर सस्पेंशन आहे. बसण्यासाठी ३३ आसने + व्हीलचेयर + चालक अशी सोय आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे व्हीलचेअर, आपत्कालीन बटन, मोबाइल चार्जिंगसाठी युएसबी सॉकेट्स बसवण्यात आली आहेत.

    पुणे : इलेक्ट्रिक बस उत्पादनातील अग्रणी, ऑलेक्ट्रा (Olectra) ग्रीनटेक आणि इव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड (EVEY) ने पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ला इलेक्ट्रिक बसेसचा नवा लॉट वितरित करण्यास सुरुवात केली. कंपनीला जानेवारी २०२१ मध्ये पीएमपीएमएलकडून ३५० इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर मिळाली आहे. हा आदेश १२ वर्षांच्या कालावधीसाठी (GCC) / OPEX मॉडेल आधारावर आहे. या ३५० बसेस १२ मीटर लांबीच्या असून या बसेसचा पुरवठा, संचालन आणि देखभाल यासाठी हा करार आहे.

    या प्रसंगी के.व्ही. प्रदीप, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड यांनी सांगितले, “ पीएमपीएमएल आणि सीआयआरटी यांनी पहिल्या लॉटची तपासणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे आणि पुणे महानगराला १२ मीटर लांबीच्या इलेक्ट्रिक बसेस वितरित करण्यास सुरुवात केली आहे. परिवहन महामंडळ (PMPML) कडे OGL याआधीच १५० बसेस चालवत आहे. इलेक्ट्रिक बसेसचा हा ताफा सध्याच्या ताफ्यात जोडला जाईल. OGL/EVEY ट्रान्स संघांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे”.

    प्रवाशांच्या सुखसोयीसाठी १२ मीटर लांबीच्या या वातानुकूलित बसेसमध्ये इलेक्ट्रॉनिक्स नियंत्रित एअर सस्पेंशन आहे. बसण्यासाठी ३३ आसने + व्हीलचेयर + चालक अशी सोय आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे व्हीलचेअर, आपत्कालीन बटन, मोबाइल चार्जिंगसाठी युएसबी सॉकेट्स बसवण्यात आली आहेत.

    बसमध्ये बसवलेल्या लिथियम-आयन बॅटरीमूळे एका चार्ज मध्ये जवळ जवळ २०० किमी .पेक्षा अधिक अंतर ऑलेक्ट्रा कापू शकते. या अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसमध्ये रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम आहे ज्यामुळे ब्रेक लावल्यावर तयार होणाऱ्या उर्जेचा विनीयोग बस परिचालनात केला जातो. हाय-पॉवर चार्जिंग सिस्टम बॅटरीला २-५ तासांच्या दरम्यान पूर्ण रीचार्ज करते. या बसला पुढे आणि मागे दोन्ही ब्रेक्स हे डिस्क ब्रेक्स असल्याने अतिशय सुरक्षित प्रवासाची खात्री याद्वारे मिळते.