रेनो इंडिया’च्या ‘वर्कशॉप ऑन व्हिल्स-लाईट’ उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील अस्तित्वाला बळकटी

मागील काही वर्षांपासून रेनोच्या (Renault) वतीने भारतात विक्री आणि नेटवर्क विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढवला आहे आणि त्यामुळे ग्राहक संख्येत वाढ होण्यासाठी मोठी मदत झाली. ज्यामुळे रेनो ब्रँड ग्रामीण भाग तसेच अपकंट्री मार्केटमध्येही चांगल्याप्रकारे पोहोचला आहे.

  मुंबई : वर्कशॉप ऑन व्हील्स (WOW) 2016 मध्ये लाँच झाल्यावर मिळालेल्या यशानंतर ग्रामीण आणि दुर्गम भागातील ग्राहकांना गुंतागुंत-मुक्त मालकी अनुभव उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात, भारतामधील आपल्या कामकाजाचे दहावे वर्ष साजरे करणाऱ्या रेनोने (Renault) नवीन ‘वर्कशॉप ऑन व्हील्स-लाईट’ (Workshop On Wheels Lite) उपक्रम सादर केला. हे दुचाकीवरील सर्व महत्त्वाची अवजारे आणि तंत्रज्ञान-युक्त मोबाईल वर्कशॉप असून याठिकाणी रेनो वाहनांशी निगडीत सर्व लहान-लहान सेवा, दुरुस्त्या आणि संबंधित कामे चालतील.

  मागील काही वर्षांपासून रेनोच्या (Renault) वतीने भारतात विक्री आणि नेटवर्क विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढवला आहे आणि त्यामुळे ग्राहक संख्येत वाढ होण्यासाठी मोठी मदत झाली. ज्यामुळे रेनो ब्रँड ग्रामीण भाग तसेच अपकंट्री मार्केटमध्येही चांगल्याप्रकारे पोहोचला आहे. ग्रामीण भागातील, अगदी दुर्गम भागात राहणाऱ्या आपल्या ग्राहकांना सेवा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने रेनो’च्या वतीने 2016 मध्ये ‘वर्कशॉप ऑन व्हील्स’ (WOW) लाँच करण्यात आले. ‘वर्कशॉप ऑन व्हील्स’ हे देखील मोबाईल वर्कशॉप असून ते चार-चाकीत सुरू असेल, इथे सर्व देखभाल सेवा आणि दुरुस्ती कामे करण्यात येतील. सुमारे 90% वर्कशॉप कामकाज याठिकाणी पूर्ण होऊ शकणार आहे.

  ‘वर्कशॉप ऑन व्हील्स लाईट’च्या माध्यमातून सुमारे 530 टचपॉईंटवर बळकट सेवा जाळ्याला चालना मिळेल, ज्यामध्ये देशभरातील 250 हून अधिक (वर्कशॉप ऑन व्हील्स) आणि (वर्कशॉप ऑन वर्क लाईट) ठिकाणांचा समावेश राहील.

  मागील वर्षभरापासून रेनो इंडियाच्या वतीने नाविन्यपूर्ण आणि व्यापक धोरणांना चालना देत ग्रामीण बाजारांसह लहान शहरे आणि नगरांत आपले अस्तित्व वाढवत चांगला जम बसवला आहे. रेनो इंडियाने VISTAAR (विस्तार) हे नवीन कॅम्पेन सुरू केले असून जिथे विक्रेता टीम नियुक्त करून 630 पेक्षा अधिक विशेष विक्री सल्लागार म्हणजे रेसिडेंट डिलर सेल्स एक्झिक्युटिव्ह ग्रामीण बाजारातील ग्राहकांपर्यंत पोहोचतील. रेनोच्या वतीने अलीकडे सीएससी ग्रामीण ई-स्टोअर, सीएससी ई-गव्हर्ननन्स सर्विसेस इंडिया लिमिटेड (सीएससी-एसपीव्ही)च्या उपकंपनी समवेत भागीदारी केली आहे. याचा भाग म्हणून, रेनो इंडियाची अग्रगण्य उत्पादन श्रेणी सीएससी ग्रामीण ईस्टोअरवर सूचीबद्ध आहे आणि महत्त्वाकांक्षी विलेज-लेव्हल एंटरप्रीन्यूअर (व्हीएलई’ज)च्या साथीने पात्र ग्राहकांपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  नाविन्यपूर्णतेवर आधारीत ‘रूरल फ्लोट’ हे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल असून त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांच्या अधिक जवळ जाऊन रेनो वाहन मालकी अनुभव उपलब्ध करून देणे शक्य होईल. ‘रूरल फ्लोट’ समवेत नव्याने लॉन्च करण्यात आलेली सब-फोर मीटर कॉम्पॅक्ट एसयुव्ही, रेनो काईगर ग्रामीण बाजारातील पात्र ग्राहकांपर्यंत सादर करणे शक्य झाले आहे. सुमारे 13 राज्यांमधील 233 नगरांत 23,000 ग्राहकांना सेवा देणाऱ्या रेनोने 2700 टेस्ट ड्राईव्हची सुविधा दिली आहे.

  भारतात एकत्रित आपल्या उत्पादन श्रेणी विस्तार धोरणासमवेत विक्रीला चालना देत रेनोच्या वतीने भारतामधील आपल्या संपर्कजाळ्यात लक्षणीय वाढ केली आहे. तसेच काही अभिनव आणि आद्य उपक्रम सादर करत ग्राहकांचा अतूट बंध रेनो ब्रँड समवेत राहील याची खातरजमा केली आहे.