टाटा मोटर्स कंपनीची ‘ही’ कार बनली आयपीएल २०२०ची सहयोगी

अल्ट्रोझ ही कार २०१८ च्या आयपीएलमध्ये टाटा मोटर्सने त्यांची नेक्सॉन (Nexon) आणि २०१९ आयपीएल मध्ये हॅरियर  (Harrier) या कार्स अधिकृत सहयोगी म्हणून दिल्या होत्या. आयपीएल २०२० (IPL 2020)  स्पर्धेत सर्वाधिक स्ट्राईक रेट असणाऱ्या फलंदाजाला ही कार बक्षीस दिली जाणार आहे.

 नवी दिल्ली: टाटा मोटर्स कंपनीची (Tata Motors)  अल्ट्रोझ   (Altroz) ड्रीमवन आयपीएल २०२० साठी सहयोगी कार बनल्याची अधिकृत घोषणा सोमवारी करण्यात आली आहे. अल्ट्रोझ ही कार २०१८ च्या आयपीएलमध्ये टाटा मोटर्सने त्यांची नेक्सॉन (Nexon) आणि २०१९ आयपीएल मध्ये हॅरियर  (Harrier) या कार्स अधिकृत सहयोगी म्हणून दिल्या होत्या. आयपीएल २०२० (IPL 2020)  स्पर्धेत सर्वाधिक स्ट्राईक रेट असणाऱ्या फलंदाजाला ही कार बक्षीस दिली जाणार आहे.

आयपीएल २०२० स्पर्धा दुबईत तीन विविध ठिकाणी होणार आहेत. या स्पर्धेत अल्ट्रोझ सुपर स्ट्रायकर अवार्ड सुद्धा दिली जाणार आहे. प्रत्येक सामन्यात बेस्ट स्ट्राईक रेट असलेल्या खेळाडूला अल्ट्रोझ सुपर स्ट्राईक ट्रॉफीसह १ लाख रूपये बक्षीस दिले जाणार आहे. तसेच फँन्ससाठी सुद्धा अल्ट्रोझ सुपर स्ट्राईकर मोबाईल गेम असून त्यांना सुपर स्ट्राईकर बनायची संधी मिळणार आहे.

आयपीएल हा आमच्यासाठी महोत्सव असून देशातील जनतेसाठी सुद्धा तो पण उत्सव आहे. आमची अल्ट्रोझ सर्व बाबतीत गोल्ड स्टँडर्ड ठरली आहे. असे टाटा मोटर्सचे प्रवासी वाहन विभाग प्रमुख विवेक श्रीवस्त यांनी सांगितले.