फोटो सौजन्य: Freepik
आपली स्वतःची कार घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. जेव्हा हे स्वप्न पूर्ण होते ते अनेकांचा आनंद गगनात मावत नसतो. मग कालांतराने कारची सर्व्हिसिंग करण्याची गरज भासते. आपण सर्वेच जाणतो, कारची पहिली सर्व्हिस कंपनीकडून मोफत असते. पण अतिरिक्त सर्व्हिसच्या नावाखाली तुमच्या खिशातून जास्तीचे पैसे वसूल केले जाऊ शकतात. अशावेळी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी ठाऊक असणे फार गरजेचे आहे.
प्रत्येक कारची सर्व्हिसिंग वेळेवर होणे फार गरजेचे आहे. जर तुम्ही योग्य वेळी कारची सर्व्हिसिंग नाही केली तर मग तिच्यात तुम्हाला खराबी आढळू शकते. कारच्या पहिल्या सर्व्हिस दरम्यान जास्तीत जास्त लक्ष देणे आवश्यक आहे, कारण बऱ्याच लोकांना पहिल्या सर्व्हिसच्या प्रक्रियेबद्दल जास्त ठाऊक नसते. चला जाणून घेऊया, पहिल्या कार सर्व्हिस दरम्यान कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
तुम्ही तुमच्या कारचे मॅन्युअल नीट काळजीपूर्वक वाचले पाहिजे जेणेकरून पहिल्या सर्व्हिस दरम्यान कारमध्ये कोणत्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत हे तुम्हाला कळेल. मॅन्युअलमध्ये दिलेल्या सर्व्हिसिंगची यादी मेकॅनिक सोबत तपासा. जेणेकरून तुम्हाला समजेल की सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत की नाही.
कारच्या पहिल्या सर्व्हिसच्या वेळी, इंजिन ऑइल, ब्रेक फ्लुइड, कूलंट आणि पॉवर स्टीयरिंग फ्लुइड यांसारखे फ्लुइड्स तपासा. विशेषतः इंजिन ऑइल बदलण्याची खात्री करा, कारण ते इंजिनची कार्यक्षमता सुधारते. यासोबतच एअर फिल्टर आणि ऑइल फिल्टर बदलल्यानंतर ते व्यवस्थित स्वच्छ झाले आहे की नाही ते नीट तपासून घ्या.
कार सर्व्हिसिंग दरम्यान, ब्रेक, टायर, बॅटरी, लाइट्स आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची नीट तपासणी करा. ब्रेकमध्ये काही समस्या असल्यास, ते दुरुस्त करा. टायरची स्थिती आणि हवेचा दाब तपासा. बॅटरी व्यवस्थित चार्ज होत आहे की नाही. त्यावर गंज तर नाही ना. या सर्व गोष्टी जाणून घ्या. कारचे हेडलाइट्स, टेल लाइट्स, इंडिकेटर आणि आतील दिवे व्यवस्थित काम करत आहेत की नाही ते तपासा. यासह, वायपर ब्लेड आणि विंडशील्ड वॉशर सिस्टम देखील तपासा.
पहिल्या सर्व्हिस दरम्यान, कारचे अंडरकॅरेज आणि सस्पेंशन तपासा. अंडरकॅरेजमध्ये काही गळती, नुकसान किंवा सस्पेंशन संबंधित समस्या असल्यास मेकॅनिकल कळवा. सस्पेंशन चांगले असल्यास कारची कार्यक्षमता सुधारते आणि तुमचा प्रवास आरामदायी होतो.
जेव्हा कार सर्व्हिस केली जाते तेव्हा त्याचे बिल काळजीपूर्वक वाचा. बिलमध्ये कोणतेही अतिरिक्त फीस समाविष्ट नसल्याची खात्री करा. कार सर्व्हिस केल्यानंतर टेस्ट ड्राइव्ह घ्या. यामुळे तुम्हाला कार व्यवस्थित काम करत आहे की नाही याची माहिती मिळेल.