पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींनी वैतागला आहात मग ही स्कूटर घ्या अन् टेन्शन दूर करा; अवघ्या २० पैशांत धावणार १ किमी

अशाच कठीण प्रसंगात दिल्ली (Delhi) च्या आयआयटीने (IIT Delhi) २० पैशांवर चालणारी स्कूटर (Scooter) आणली आहे. जिचा लोक जवळच जाण्यासाठी अगदी सहज वापरु शकतील. ही स्कूटर २० पैशांत १ किलोमीटर चालेल (Scooter will run 1 kilometer for 20 paise). इंक्युबेटर स्टार्टअप गेलियोस मोबिलिटी कंपनी (Incubator startup Gelios Mobility Company)ची ही स्कूटर सर्वसामान्य माणसांसाठी अगदीच बजेटमध्ये आहे.

    पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol And Desiel) च्या वाढत्या किंमतींनी सर्वसामान्यांची झोप उडविली आहे. प्रत्येक जण सातत्याने वाढणाऱ्या इंधनाच्या किंमतींनी हताश आणि चिंताग्रस्त आहेत. कारण इंधनाच्या किंमतींमुळे सर्वसामान्यांचं बजेट गडगडलं आहे. अशातच लोकं आता असे पर्याय शोधू लागले आहेत ज्यामुळे त्यांच्या खिशावर ताण येणार नाही. तर सर्वसामान्य जनतेची चिंता लक्षात घेता अनेक कंपन्यांनी (Companies) इलेक्ट्रिक कार (Electric Car) आणि बाइक (Electric Bikes) बाजारात आणायला सुरुवात केली आहे.

    अशाच कठीण प्रसंगात दिल्ली (Delhi) च्या आयआयटीने (IIT Delhi) २० पैशांवर चालणारी स्कूटर (Scooter) आणली आहे. जिचा लोक जवळच जाण्यासाठी अगदी सहज वापरु शकतील. ही स्कूटर २० पैशांत १ किलोमीटर चालेल (Scooter will run 1 kilometer for 20 paise). इंक्युबेटर स्टार्टअप गेलियोस मोबिलिटी कंपनी (Incubator startup Gelios Mobility Company)ची ही स्कूटर सर्वसामान्य माणसांसाठी अगदीच बजेटमध्ये आहे.

    कंपनीने इंक्युबेटेड स्टार्टप गेलियोस मोबिलिटी स्कूटरचं नाव अशासाठी ठेवलं आहे कारण जसं की या स्कूटरचं नाव होप स्कूटर (Hope Scooter) तसंच लोकांसाठी खरोखरंच ही एक आशा आहे. काही शहरामध्ये पेट्रोलचे भाव ९०च्याही पुढे गेले आहेत, अशातच होप स्कूटरने २० पैशांत प्रवास करणं सोपं आहे, होप स्कूटर घरातील कोणत्याही चार्जरने (Hope Scooter Is Chargeable) चार्ज होऊ शकते. स्कूटर ट्रॅफिकमध्ये सहजपणे निघून जाते, ही स्कूटर तासाला २५ किमीचे अंतर पार करते. ही स्कूटर चालविण्यासाठी कोणत्याही लायसन्सची गरज लागणार नाही. ही स्कूटर ई वाहन (E vehicle) श्रेणीत मोडते.

    ही स्कूटर बाजारात आल्यानंतर कंपनी रस्त्याच्या कडेला हिला चार्ज करण्यासाठी चार्जिंग हबही उभारणार आहे. होप स्कूटर अत्यंत कमी वजन आणि मजबूत अशी तिची रचना आहे. स्कूटरच्या बॅटरीला ५० ते ७५ किमीचे अंतर कापण्यासाठी तयार करण्यात आली आहे. होप स्कूटरची मार्केटमध्ये किंमत ४६,९९९ रुपयांपासून सुरू होईल. सोबतच ही वाढते प्रदूषण ध्यानात घेऊनच तयार करण्यात आली आहे, जी वातावरणासाठीही पूरक आहे. स्कूटर होप उत्तम पार्किंगसाठी रिव्हर्स मोड टेक्नॉलॉजी तयार करण्यात आली आहे, याच्या मदतीने स्कूटर कोणत्याही ठिकाणी पार्क करता येऊ शकते. ३ वर्षांपूर्वी गेलियोस मोबिलिटी की ने होपची निर्मिती केली आहे, स्कूटरची बॅटरी बदलण्याची सुविधाही कंपनीतर्फे देण्यात येणार आहे.