आता खिशात पैसेच पैसे खुळखुळणार : सर्वसामान्यांना परवडणारी स्कूटर मार्केटमध्ये दाखल! किलोमीटरचा खर्च पाहून तात्काळ बुकिंगसाठी तुम्हीही पुढे सरसावाल

इलेक्ट्रिक स्कूटर भाड्याने देणारी कंपनी EBikeGo ने घोषणा केली आहे की ती पुढील 12 महिन्यांत संपूर्ण भारतात किमान एक लाख EV (इलेक्ट्रिक व्हेइकल) चार्जर बसवणार आहे. कंपनीने आधीच आपले इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) असलेले चार्जर मुंबईत बसवणे सुरू केले आहे.

    मुंबई : महागाईच्या या जमान्यात जर तुम्हाला कोणी २५ पैसे प्रती किलोमीटरने चालणारी गाडी खरेदी करण्यास सांगितल्यास तुम्ही काय कराल बरं ?.. आहे ना खिशात पैसे खुळखुळणारी बातमी.

    सध्या पेट्रोल 110 रुपयांच्या पार गेले आहे डिजेलचे ही असेच काहीसे झाले आहे; म्हणून इलेक्ट्रिकल व्हेइकल्सचा चांगलाच ट्रेंड सुरू झालाय.

    मोठ-मोठ्या कंपन्यांनी आपलं लक्ष EV गाड्यांवर केंद्रीत केलं आहे. चारचाकी गाड्यांसोबत आता स्कूटरही इलेक्ट्रिकल झाल्या आहेत आणि प्रदूषण कमी होत आहे.

    इलेक्ट्रिक स्कूटर भाड्याने देणारी कंपनी EBikeGo ने घोषणा केली आहे की ती पुढील 12 महिन्यांत संपूर्ण भारतात किमान एक लाख EV (इलेक्ट्रिक व्हेइकल) चार्जर बसवणार आहे. कंपनीने आधीच आपले इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) असलेले चार्जर मुंबईत बसवणे सुरू केले आहे.

    यासह, ही कंपनी दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू, इंदूर, पुणे आणि अमृतसर या सहा शहरांमध्ये असे चार्जर बसवणार असल्याची घोषणा केली आहे.

    कंपनी लवकरच आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर येत्या काही महिन्यांत विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. eBikeGo ने अलीकडेच भारतीय बाजारपेठेत G1 आणि G1+ या दोन प्रकारांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे.

    स्कूटरची किंमत सर्वसामान्य लोकांना परवडणारच

    ही इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्याची किंमत खूपच कमी असल्याचा कंपनीचा दावा आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्याची किंमत फक्त 25 पैसे प्रति किलोमीटर असेल असे कंपनीचे म्हणणे आहे.

    म्हणजेच, या ई-स्कूटरच्या सहाय्याने ग्राहक एका रुपयात 4 किमी, 40 रुपयांमध्ये 160 किमी आणि 100 रुपयांमध्ये 400 किमी अंतर कापू शकतात.