ईव्ही ऑटोमोबाईल ब्रँड ‘ईव्हीट्रिक मोटर्स’ची घोषणा

ईव्हीट्रिक मोटर्सने टप्प्याटप्प्याने सुमारे १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी वापरकर्त्यांना इलेक्ट्रिक स्कूटर, सायकली, इलेक्ट्रिक बाइक्स, इलेक्ट्रिक ३ व्हीलरसह उत्कृष्ट ईव्ही ऑफरिंग्ज प्रदान करण्याच्या दिशेने काम करेल.

  मुंबई : पीएपीएल या भारत-स्थित ऑटोमेशन कंपनीने, इलेक्ट्रिक वाहनाच्या क्षेत्रात, नवीन उपक्रम ईव्हीट्रिक मोटर्स सुरू केला आहे. पीएपीएल ही लाइन ऑटोमेशन उपकरण, कन्व्हेयर्स, रोबोट्स, यांत्रिकी / नियंत्रण डिझाइन आणि सिम्युलेशनच्या आरंभिक उत्पादकांपैकी एक आहे.

  या १००% भारतीय इलेक्ट्रिक ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग व्हेंचरची सुरुवात, ‘मेक इन इंडिया’वर लक्ष केंद्रित करून करण्यात आली आहे. ईव्हीट्रिक मोटर्सने टप्प्याटप्प्याने सुमारे १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी वापरकर्त्यांना इलेक्ट्रिक स्कूटर, सायकली, इलेक्ट्रिक बाइक्स, इलेक्ट्रिक ३ व्हीलरसह उत्कृष्ट ईव्ही ऑफरिंग्ज प्रदान करण्याच्या दिशेने काम करेल.

  ज्या क्षेत्रात एकाधिक प्रवेशकर्त्यांची उपस्थिती आहे अशा सद्य परिस्थितीचा विचार करता, स्थानिकीकरणाची पातळी अद्याप कमी आहे. ई-मोबिलिटी मिशनला चालना देता यावी म्हणून, भारतीय उत्पादकांना या क्षेत्रात प्रवेश करावा लागेल.

  ईव्हीट्रिकचे व्यवस्थापकीय संचालक आणि संस्थापक मनोज पाटील यांनी सांगितले की “सरकार ॲडॉप्शन आणि स्थानिकरण या दोन्ही बाबतीत, भारतामध्ये ईव्हीला प्रोत्साहन देण्यासाठी अविरत प्रयत्न करत आहे. तथापि, ॲडॉप्शनला गती देण्यासाठी, अनुभवाची आणि पायाभूत सुविधांची नितांत आवश्यकता आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील ऑटोमेशन आणि मॅन्युफॅक्चरिंगमधील तिच्या दशकाचा अनुभवासह, पीएपीएलद्वारे मोठ्या प्रमाणात योगदान दिले जाऊ शकते. ईव्हीट्रिक येथे आमचे लक्ष्य आहे की, भारतीय ग्राहकांना स्पर्धात्मक किंमतीवर अधिक चांगली उत्पादने उपलब्ध करुन द्यावीत आणि ई-मोबिलिटी स्वप्नास हातभार लावण्यासाठी स्थानिकीकरणाला प्रोत्साहन दिले जावे.

  या ब्रँडने आपल्या उत्पादन सुविधेची स्थापना चाकण-पुणे येथे केली आहे आणि गुणवत्तेची आणि वेळेची कार्यक्षमता राखण्यासाठी उच्च-दर्जाची ऑटोमेशन प्रक्रिया राबविली आहेत. निर्मितीच्या या कारखान्याद्वारे दर वर्षी १.५ लाख युनिट्सची क्षमता देऊ केली आहे. ईव्हीट्रिकने अगोदरच ऑनबोर्डिंग डीलर्सची सुरुवात केली आहे आणि तिच्या प्रारंभिक विस्तार योजनेचा एक भाग म्हणून, आर्थिक वर्ष २०२१-२२च्या अखेरीस महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, कर्नाटक, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आपले उत्पादन सुरु करण्याचा तिने निर्धार केला आहे.

  भारतीय ग्राहकांच्या गरजा चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी व त्यासह इनलाइन डिझाइन करण्यासाठी, या ब्रँडने एक इन-हाऊस संशोधन आणि विकास टीम स्थापन केली आहे.

  EV Automobile brand Evitric Motors announced