
उडणारी कार आता स्वप्नच ठरणार नाही. अमेरिकेतील फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने फ्लाइंग कारला परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे काही अन्य कंपन्यांनीही याबाबत वेगान काम सुरू केले आहे. आता भारतात विनाटा एयरोमोबिलिटी कंपनीचे नावही या यादीत समाविष्ट झाले आहे. देशात पहिल्या हायब्रीड फ्लाइंग कारचे मॉडेल तयार झाले आहे. चेन्नईतील ही कंपनी हायब्रीड फ्लाईंग कारची निर्मिती करीत आहे. कंपनीने प्रथमच या कारचे पहिले मॉडेल नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना दाखिवले. त्यानंतर शिंदे यांनी आशियातील पहिली फ्लाईंग कार लवकरच तयार होणार असल्याची माहिती दिली. या कारचा वापर प्रवासाव्यतिरिक्त वैद्यकीय आपत्कालीन सेवांसाठीही केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिल्ली : उडणारी कार आता स्वप्नच ठरणार नाही. अमेरिकेतील फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने फ्लाइंग कारला परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे काही अन्य कंपन्यांनीही याबाबत वेगान काम सुरू केले आहे. आता भारतात विनाटा एयरोमोबिलिटी कंपनीचे नावही या यादीत समाविष्ट झाले आहे. देशात पहिल्या हायब्रीड फ्लाइंग कारचे मॉडेल तयार झाले आहे. चेन्नईतील ही कंपनी हायब्रीड फ्लाईंग कारची निर्मिती करीत आहे. कंपनीने प्रथमच या कारचे पहिले मॉडेल नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना दाखिवले. त्यानंतर शिंदे यांनी आशियातील पहिली फ्लाईंग कार लवकरच तयार होणार असल्याची माहिती दिली. या कारचा वापर प्रवासाव्यतिरिक्त वैद्यकीय आपत्कालीन सेवांसाठीही केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
किमतीबाबत गुप्तता
कंपनीने त्यांच्या यूट्यूब वाहिनीवर 36 सेकंदाचा एक व्हीडिओ सादर ेकरला आहे. त्यानुसार या कारचे 5 ऑक्टोबर रोजी लंडनमध्ये सादरीकरण केले जाणार आहे. तथापि या कारच्या किमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सादरीकरणावेळीच किंमत जाहीर होण्याची शक्यता आहे.
दोन प्रवाशांची सुविधा
विनाटा एयरोमोबिलिटीची प्रस्तावित कार बुलेट ट्रेनसारखी दिसते. खाली बाजूस कारसारखे चेसिस दिले असून त्यात चाके लावली आहेत. याच भागाला फ्लाईंग विंग्सने जोडले आहे. यासाठी एक पिलर दिला असून त्यात वर-खाली विंग्स आहेत. कारच्या चारही बाजूंनी पिलरही आहेत. कारमध्ये चारही बाजूंनी काळ्या काचेचा वाप करण्यात आला आहे.
वैशिष्ट्ये
हायब्रीड एका सामान्य कारसारखीच असते. या कारमध्ये दोन इंजिनचा वापर केला जातो. पेट्रोल-डिझेल इंजिनसह इलेक्ट्रीक मोटरही असते.
या तंत्रज्ञानाला हायब्रीड असे म्हटले जाते. अधिकांश कंपन्या आता अशाच कारच्या निर्मितीवर भर देत आहेत.
पहिली हायब्रीड फ्लाईंग कारची प्रतिकृती तयार झाली असून आशियातील ही पहिलीच हायब्रीड कार ठरेल. ज्यावेळी ही कार प्रत्यक्षात समोर येईल त्यावेळी दळणवळणासह वैद्यकीय सुविधांसाठीही या कारचा वापर करणे शक्य होईल.
- ज्योतिरादित्य शिंदे, नागरी उड्डयन मंत्री