जागतिक जल दिन २०२१ निमित्त निसान इंडिया तर्फे ‘फ्री फोम वॉश सर्व्हिस’; या तंत्राच्या सहाय्याने प्रतिदिन सुमारे ८६,४०० लिटर पाण्याची बचत करण्याचे उद्दिष्ट

निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, शाश्वत गतीशीलतेच्या प्रती आमची वचनबद्धता अधोरेखित करीत निसान इंडिया सतत उद्योगात उत्तम सेवा आणि आपल्या स्थानिक समुदायाला दीर्घावधीत लाभ देण्याचे काम करत आहे.

  • फोम वॉश तंत्रामुळे ४५ टक्के पाण्याचा वापर कमी होतो आणि कार्सची चमक ३८ टक्क्यांनी वाढते
  • चेन्नईमधील उत्पादन प्रकल्पातही २०५ लाख लिटर पाण्याची बचत होत आहे

मुंबई : २२ मार्च रोजी साजरा केला जात असलेल्या जागतिक जल दिनानिमित्त निसान भारतातील सर्व निसान आणि डॅटसन सेवा केंद्रांवर आपल्या ग्राहकांना ‘फ्री फोम वॉश सेवा’ प्रदान करत आहे. एका दिवसात सरासरी १२०० वाहनांचे फोम वॉश करून, या नाविन्यपूर्ण तंत्राच्या सहाय्याने प्रतिदिन सुमारे ८६,४०० लिटर पाण्याची बचत करण्याचे उद्दिष्ट आहे.

लोकांचे जीवन समृद्ध करण्याच्या कॉर्पोरेट व्हिजनच्या मार्गदर्शनाखाली, निसान इंडियाच्या इको-फ्रेंडली तंत्रामध्ये प्रति कारसाठी ४५ टक्के कमी पाण्याची आवश्यकता भासते. या तुलनेत पारंपारिक कार वॉशसाठी १६२ लिटर पाण्याचा वापर होतो. यामुळे वेळेची बचत होते आणि कार्सची चमक ३८ टक्क्यांनी वाढते. निसानने फोम-वॉश तंत्राची सुरुवात २०१४ मध्ये केली होती आणि यामुळे निसान इंडियाला १. ५ करोड लिटर पाण्याची बचत करण्यास मदत मिळाली आहे.

निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, शाश्वत गतीशीलतेच्या प्रती आमची वचनबद्धता अधोरेखित करीत निसान इंडिया सतत उद्योगात उत्तम सेवा आणि आपल्या स्थानिक समुदायाला दीर्घावधीत लाभ देण्याचे काम करत आहे. आमची डोअर स्टेप सेवा ग्राहकांना ‘ड्राय वॉश हा पर्यायही उपलब्ध करून देत आहे , ज्यामुळे १०० टक्के पाण्याची बचत होते. एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक म्हणून आम्ही केवळ पाण्याचे संवर्धन करीत नाही तर आमच्या ग्राहकांच्या अनमोल वेळची बचत करत आहोत.

चेन्नई स्थित ओरागडम येथील रेनॉल्ट-निसान अलायन्स प्लांटदेखील आसपासच्या खेड्यांना फायदा व्हावा यासाठी जलसंधारण कार्यक्रमात सक्रियपणे भाग घेत आहे. रेनो-निसान ऑटोमोटिव्ह इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक बिजू बालेंद्रन यांनी सांगितले कि, नॅशनल अ‍ॅग्रो फाऊंडेशनच्या भागीदारीत, जवळच्या गावातल्या सखोल तलावाच्या तटबंदीवर आम्ही ५०० रोपे लावली आहेत, ज्याने सुंदरता आणि लँडस्केप पुनर्संचयित केले आहे.

आमच्या तलावाच्या खोलीकरणाच्या उपक्रमामुळे केवळ पाण्याची साठवण क्षमता २०५ लाख लिटरनेच वाढली नाही तर स्थानिक शेतीच्या कामांसाठी पाण्याचे मुख्य स्त्रोत असलेल्या विहिरींमध्ये भूगर्भातील पाण्याची पातळी आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता देखील वाढली आहे.

रेनॉल्ट-निसान अलायन्स प्लांट आपले कर्मचारी आणि कंत्राटदारांना पाणी बचतीच्या तंत्रावर प्रशिक्षण देते. या प्रकल्पात १.६ लाख किलोलिटर रेन वॉटर स्टोरेज क्षमतेसह तीन रेन वॉटर हार्वेस्टिंग तलावांची निर्मिती केली गेली आहे ज्यामुळे ८० दिवसांपर्यंतच्या पाण्याची गरज भागवू शकेल. दरवर्षी, रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधांच्या माध्यमातून प्लांट आपल्या ताज्या पाण्याच्या आवश्यक गरजेच्या ७५ % पेक्षा जास्त बचत करते.