होंडा कार्स इंडियाने भारतात गाठला २ दशलक्ष उत्‍पादनाचा टप्‍पा

एचसीआयएलने डिसेंबर १९९७ मध्ये भारतातील ग्राहकांसाठी प्रीमियम आणि जागतिक दर्जाची उत्पादने देण्यावर लक्ष केंद्रित करून उत्पादन कार्य सुरू केले. २ दशलक्षवी कारच्‍या टप्‍प्‍यामधून भारत सरकारच्या "मेक इन इंडिया" दृष्टीकोनाप्रती होंडाची कटिबद्धता दिसून येते.

  • राजस्‍थानमधील त्‍यांच्‍या तापुकारा प्‍लांटमधून २,०००,०००वी मेड इन इंडिया कार सादर

मुंबई : होंडा कार्स इंडिया लि. (HCIL) या भारतातील अग्रगण्‍य प्रीमियम कार्सच्‍या उत्‍पादक कंपनीने आज घोषणा केली की, कंपनीने भारतातील होंडा कार्सच्‍या (Honda Cars) एकूण उत्‍पादनामध्‍ये २ दशलक्ष युनिटचा टप्‍पा गाठला आहे(A milestone of 2 million units has been reached in total production). तापुकारा, राजस्‍थानमधील कंपनीच्‍या अत्‍याधुनिक प्‍लांट येथील असेम्‍ब्‍ली लाइनमधून सादर करण्‍यात आलेली कंपनीची प्रिमिअम सेदान होंडा सिटी २ दशलक्षवी मेड इन इंडिया होंडा कार (Made in India Honda Car) आहे.

एचसीआयएलने डिसेंबर १९९७ मध्ये भारतातील ग्राहकांसाठी प्रीमियम आणि जागतिक दर्जाची उत्पादने देण्यावर लक्ष केंद्रित करून उत्पादन कार्य सुरू केले. २ दशलक्षवी कारच्‍या टप्‍प्‍यामधून भारत सरकारच्या “मेक इन इंडिया” दृष्टीकोनाप्रती होंडाची कटिबद्धता दिसून येते.

याप्रसंगी बोलताना होंडा कार्स इंडिया लि.चे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी ताकुया त्‍सुमुरा म्‍हणाले, “भारतात २ दशलक्ष उत्पादनाचा ऐतिहासिक टप्पा हा गेल्या २५ वर्षांपासून ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाप्रती होंडाच्या कटिबद्धतेला सादर करतो. आम्ही आमचे सर्व ग्राहक, डीलर भागीदार व पुरवठादार भागीदारांचे आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि होंडाला देशातील एक लोकप्रिय व विश्वासार्ह ब्रॅण्‍ड बनवल्याबद्दल मनापासून आभार मानतो. भारतातील आमचे अत्याधुनिक उत्पादन कार्यसंचालन देशांतर्गत व निर्यात बाजारपेठेत पुरवठ्यासाठी ऑटोमोबाईल्स आणि जागतिक दर्जाच्या मानकांचे घटक तयार करण्यासाठी सुसज्ज आहेत. आम्ही दैनंदिन जीवनात मूल्‍याची भर करणाऱ्या आमच्या सर्व ग्राहकांना प्रीमियम व विनासायास मालकी अनुभवासाठी सर्वात प्रगत, अत्याधुनिक तंत्रज्ञान उत्पादने प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहोत.’’ ते पुढे म्‍हणाले, “होंडामध्‍ये आमचा समाजाला अपेक्षित असलेली कंपनी बनवण्‍याचे कॉर्पोरेट ध्‍येय आहे. याच भावनेसह आमचा विश्‍वास आहे की, आमच्‍या प्रयत्‍नांचा प्रदेश व स्‍थानिक समुदायाच्‍या सामाजिक-आर्थिक विकासाकरिता फायदा होईल.’’

होंडाच्या मॉडेल्सनी गेल्या काही वर्षांमध्ये कंपनीच्या जागतिक डीएनएला दाखवले आहे, जे भारतीय ग्राहकांच्या गरजा आणि आवश्‍यकता पूर्ण करण्यासाठी उत्तम प्रकारे तयार केलेले आहेत. कंपनीच्या उत्पादन लाइनअपमध्ये प्रीमियम सेदान होंडा सिटी ई-एचईव्ही, होंडा सिटी, फॅमिली सेदान होंडा अमेझ, प्रीमियम हॅचबॅक होंडा जॅझ आणि स्पोर्टी होंडा डब्‍ल्‍यूआर-व्‍ही यांचा समावेश आहे.

एचसीआयएल ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी भारतात ऑटोमोबाइल्‍सची निर्मिती करते. भारत देखील परिपूर्ण वाहने व घटकांसाठी होंडाकरिता प्रमुख निर्यात बाजारपेठ आहे. कंपनी सध्‍या जगभरातील १६ बाजारपेठांना मेड इन इंडिया होंडा सिटी व होंडा अमेझ निर्यात करते.

कंपनीने भारतात कार्यसंलचानांना सुरूवात केल्‍यापासून एकूण १०,००० कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे.

होंडा कार्स इंडियाचे तापुकारा, जिल्‍हा अलवर, राजस्‍थान येथील अत्‍याधुनिक उत्‍पादन केंद्र ४५० एकर जागेवर पसरलेले आहे आणि प्रतिवर्ष १८०,००० वाहन उत्‍पादन क्षमता आहे. हे केंद्र एकीकृत उत्‍पादन युनिट आहे, ज्‍यामध्‍ये फोर्जिंग, प्रेस शॉप, पॉवरट्रेन शॉप, वेल्ड शॉप, पेंट शॉप, प्लॅस्टिक मोल्डिंग, इंजिन असेम्‍ब्‍ली, फ्रेम असेम्‍ब्‍ली आणि इंजिन टेस्टिंग सुविधा अशा सर्व कार्यसंचालनांचा समावेश आहे. या प्‍लांटमध्‍ये होंडाच्‍या जागतिक कार्यसंचालनांमधून एकत्रित सर्वोत्तम उत्‍पादन क्षमता व पद्धतींचे संयोजन समाविष्‍ट आहे. हे केंद्र उच्च दर्जाचे, सर्वोत्तम एर्गोनॉमिक्स, सुधारित ऑपरेशनल कार्यक्षमता व सुरक्षितता प्राप्त करण्यासाठी इष्टतम ऑटोमेशन, नवीनतम उपकरणे आणि सर्वोत्तम लेआउटचा वापर करते. हा प्‍लांट पर्यावरणाचे संवर्धन आणि ऊर्जा व इतर नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्यावर लक्ष केंद्रित करतो.

होंडा कार्स इंडिया ग्राहक अनुभवाला महत्व देते आणि भारतातील २४२ हून अधिक शहरांमध्‍ये असलेल्‍या आपल्‍या ३३० डिलरशिप सुविधांच्‍या माध्‍यमातून प्रत्‍येक ग्राहकाला सर्वोत्तम सेवा देण्‍याचा प्रयत्‍न करते.

या सुवर्ण टप्‍प्‍याला साजरे करणाऱ्या इव्‍हेण्‍टमध्‍ये होंडाच्‍या प्रादेशिक कार्यालयामधील वरिष्‍ठ प्रमुख उपस्थित होते, जसे एशियन होंडा मोटर कं. लि.चे कार्यकारी उपाध्‍यक्ष हिरोशी तोकुटाके व एशियन होंडा मोटर कं. लि.चे संचालक कात्‍सुहिरो कनेडा आणि एचसीएल व्‍यवस्‍थापन टीम.