उन्हाळ्यात बर्फासारखा थंडावा हवा असेल तर एसीमधील ‘ही’ खास सेटिंग वापरून पाहा

ड्राय मोड हे एअर कंडिशनर (AC) मधील एकखास वैशिष्ट्य आहे. यामुळे खोलीमधील अतिरिक्त आर्द्रता काढून खोलीला थंड आणि कोरडे ठेवता येत.

  उन्हाळा (Summer) ऋतू सुरु झाल्यानंतर सगळीकडे प्रचंड गरमी वाढली आहे. वाढत्या गर्मीला सगळेच कंटाळलेले आहेत. अशावेळी घरात किंवा ऑफिसमध्ये एसी असल्यानंतर काही वेळासाठी थंडावा मिळतो. पण अनेकदा एसी मधील काही मोड आपल्याला माहित नसतात. एसीमधील अशाच एका सेटिंग बदल आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. एसीचा हा मोड चालू केल्यानंतर घरात किंवा ऑफिसमध्ये बर्फासारखा थंडावा जाणवेल. ड्राय मोड हे एअर कंडिशनर (AC) मधील एक खास वैशिष्ट्य आहे. यामुळे खोलीमधील अतिरिक्त आर्द्रता काढून खोलीला थंड आणि कोरडे ठेवता येत. विशेषता या मोडचा वापर पावसाळ्यात केला जातो. हवेतील आद्रतेचे प्रमाण जास्त असलेल्या भागात हे उपयुक्त आहे.

  ड्राय मोडचे कार्य:

  • ड्राय मोड चालू केल्यानंतर खोलीचे तापमान कमी होते.
  • जेव्हा उबदार आणि दमट हवा थंड कॉइलवर आदळते तेव्हा त्यातील पाण्याची वाफ घन स्वरूपात होते आणि पाण्याचे थेंब बदलून जातात.
  • एसीच्या आतमध्ये पाणी जमा झाल्यानंतर त्या पाण्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. पाईपद्वारे पाणी बाहेर वाहून येते.
  • ड्राय मोड चालू केल्यानंतर खोलीतील आर्द्रता कमी होते, ज्यामुळे हवा थंडझाल्यानंतर आनंददायी वाटते.

  ड्राय मोडचे फायदे:

  • उन्हाळ्यात ज्या व्यक्तींना उष्णतेचा किंवा गर्मीचा त्रास होत असेल अशांसाठी हा एसीमधील हा मोड अतिशय उपयोगी आहे.
  • जास्त आर्द्रतेमुळे ऍलर्जी आणि दमा यांसारख्या श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात. ड्राय मोड ओलावा कमी करून या समस्यांपासून वाचण्यासाठी उपयुक्त आहे.
  • आर्द्रता वाढल्यानंतर भिंती आणि छतावर बुरशी वाढू शकते. त्यामुळे ड्राय मोड ओलावा कमी करून या समस्या टाळण्यास मदत करतो.
  • एसीचा ड्राय मोड चालू केल्यानंतर खोली सुकवण्यास मदत होते. त्यामुळे कपडे देखील लवकर सुकतात.

  ड्राय मोड कधी वापरावा:

  हवेतील आद्रतेची पातळी जास्त असल्यानंतर ड्राय मोड वापरल्यावर बरेच फायदे होतात. हायग्रोमीटर वापरून हवेतील आर्द्रता पातळी 60% पेक्षा जास्त असल्यास, आपण ड्राय मोड वापरू शकतो. जर तुम्ही दमट उष्णतेच्या त्रासाने त्रस्त असाल तर ड्राय मोड खोलीला थंड आणि आनंददायी बनवू शकतो. पावसाळ्यात हवेतील आर्द्रता जास्त असल्यास किंवा कोणत्याही ऋतूमध्ये ड्राय मोड आपण वापरू शकतो.