
४७% इच्छुकांचा असा विश्वास आहे की, पारंपारिक पर्यायांच्या तुलनेत, ईव्हीएस मुळे, प्रति मैल खर्चात लक्षणीय घट येते. ५६% इच्छुकांनी सांगितले की, त्यांना पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या जबाबदार बदलाचा भाग व्हायचे आहे आणि त्यांना नवीन तंत्रज्ञानामध्ये रस आहे.
- एको यूगव्ह ईव्ही (ACKO YouGov EV) अहवाल
- २०३० पर्यंत देश पायाभूत दृष्ट्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी तयार होईल
- ६६% भारतीयांनी व्यक्त केला विश्वास
मुंबई : भारतातील इलेक्ट्रिक वाहनांचे (Indian Electrical Vehicles) भविष्य उज्ज्वल (Bright Future) आहे! बहुसंख्य भारतीय ग्राहक म्हणजे, ५७% भारतीय ग्राहक, इलेक्ट्रिक वाहनां [ईव्हीएस (EVs)]द्वारे देऊ करण्यात येणाऱ्या व्यावहारिक फायद्यांमुळे ईव्हीएसमध्ये गुंतवणूक करू इच्छितात, तर ५६% ग्राहकांना एक ईव्ही (Ev) खरेदी करण्याची इच्छा आहे, कारण ते पर्यावरणासाठी अनुकूल आहेत. भारतातील टेक-फर्स्ट इन्शुरन्स कंपनी, आणि यूगव्ह ईव्ही इंडिया (YouGov India) यांनी लाँच केलेल्या ताज्या अहवालातील हे काही प्रमुख निष्कर्ष आहेत.
अहवालात, २८ ते ४० वयोगटातील, नवीन ग्राहक वर्गीकरण प्रणाली (एनसीसीएस) अ आणि ब कुटुंबातील अशा १०८० उत्तरदात्यांचे सर्वेक्षण केले गेले आहे, जे एकतर इलेक्ट्रिक वाहनाचे मालक होते किंवा पुढील बारा महिन्यांत एखादे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा विचार करत होते.
ग्राहकांचा विश्वास आहे की, भविष्य इलेक्ट्रिक आहे
बहुसंख्य उत्तरदात्यांचा म्हणजे, ६०% उत्तरदात्यांचा असा विश्वास आहे की, भारतातील सध्याची सार्वजनिक पायाभूत सुविधा, इलेक्ट्रिक वाहनांना सहाय्य पुरवण्यासाठी सुसज्ज नाही आणि त्यासाठी मोठ्या सुधारणांची गरज आहे, भविष्यासाठी खूप आशावाद बाळगला गेला आहे. सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, ८९% प्रतिसादकर्त्यांना वाटते की, भारत, २०३० पर्यंत ईव्हीएस साठी पायाभूत सुविधांनी सुसज्ज असेल. खरे पाहता, ६६% उत्तरदात्यांचा असा विश्वास आहे की, ईव्हीएस, पेट्रोल आणि डिझेल कारला मागे टाकतील आणि शेवटी त्यामुळे पैसे वाचवता येऊ शकतील.
ईव्ही का?
४४% इच्छुकांना ईव्हीमध्ये गुंतवणूक करायची आहे, कारण त्यांना त्या वाहनाद्वारे देऊ करण्यात येणारी लवचिकता पसंत पडली आहे. याव्यतिरिक्त, त्यांचा असा विश्वास आहे की, हायब्रिड किंवा फुल इलेक्ट्रिक पर्यायांच्या उपलब्धतेमुळे, त्यांना दोन्ही क्षेत्रापासून सर्वोत्तम फायदा होईल.
४७% इच्छुकांचा असा विश्वास आहे की, पारंपारिक पर्यायांच्या तुलनेत, ईव्हीएस मुळे, प्रति मैल खर्चात लक्षणीय घट येते. ५६% इच्छुकांनी सांगितले की, त्यांना पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या जबाबदार बदलाचा भाग व्हायचे आहे आणि त्यांना नवीन तंत्रज्ञानामध्ये रस आहे.
येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, जेव्हा ईव्ही च्या मालकांचा विचार केला जातो, तेव्हा पर्यावरणासाठी काहीतरी चांगले करण्याची गरज, इच्छुकांच्या पसंतीच्या व्यावहारिकतेला मागे टाकते. उदाहरणार्थ, ईव्हीच्या मालकांपैकी ६३% जणांनी सांगितले की, त्यांच्याद्वारे ईव्हीची निवड हा, कार्बन फूटप्रिंट कमी करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
इच्छुकांपैकी, ६२% लोकांना इंधनाच्या वाढत्या किमतींबद्दल चिंता आहे आणि त्यापैकी ५७% लोकांना नवीन तंत्रज्ञानामध्ये स्वारस्य आहेत. ५१% लोकांनी सांगितले की, पेट्रोल आणि डिझेल कारच्या तुलनेत, ईव्ही वापरण्याचा खर्च कमी आहे. खरे पाहता, ४८% मालकांनी सांगितले की, ईव्हीएस, पारंपारिक कारपेक्षा प्रति मैल अधिक किफायतशीर आहेत.
मग लोकांना, ईव्ही मध्ये गुंतवणूक करण्यापासून काय रोखत आहे?
अहवालातच सर्व उत्तरे आहेत. चार्जिंगची तरतुदींची उपलब्धता नसणे ही, सर्वात मोठी चिंतेची बाब आहे, त्यानंतर सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा होत राहते.
४०% इच्छुक, निवासी जागांमध्ये आणि त्यांच्या आसपास चार्जिंग सुविधा नसल्याबद्दल चिंतित आहेत. वाहन पूर्णपणे चार्ज करण्यासाठी लागणारा वेळ याबाबत अधिक स्पष्टतेची गरज त्यांनी व्यक्त केली. याव्यतिरिक्त, ४०% इच्छुकांनी ईव्ही द्वारे आग पकडण्याच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली आहे, जिच्याबद्दल सर्व वर्तमानपत्रांमध्ये बातम्या छपून येत आहेत.
चिंतेच्या इतर कारणांमध्ये, बॅटरी बदलण्याची किंमत आणि त्याची किती वारंवार गरज भासेल, या बाबींचा सामवेश आहे, कारण बॅटरीवरील खर्च हा, ईव्ही वरील प्राथमिक खर्चांपैकी एक आहे. त्यांना ईव्ही मध्ये लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या योग्यतेबद्दल देखील चिंता आहे.
शिवाय, ४१% ईव्ही मालकांचा असा विश्वास आहे की, ईव्ही चार्ज होण्यासाठी खूप वेळ लागतो आणि ४०% मालक निवासी संकुलांमध्ये चार्जिंगच्या तरतुदी नसल्यामुळे चिंतेत आहेत.
४९% ईव्ही कार मालकांचा असाही विश्वास आहे की, बॅटरी बदलण्याची किंमत हा, ईव्ही वरील मालकीचा एक महत्त्वाचा भाग आहे. चिंतेची एक स्पष्ट बाब म्हणजे, ४३% ईव्ही मालकांचा असा विश्वास आहे की, त्यांच्या वाहनांचा ड्रायव्हिंगचा अनुभव आणि कामगिरी, पारंपारिक वाहनांच्या तुलनेत योग्य नाही.
“भारत ही, जगातील चौथी सर्वात मोठी कार बाजारपेठ आहे. इलेक्ट्रिक वाहने, ग्राहकांसाठी प्राथमिक पर्याय बनण्याच्या शर्यतीत असल्याने, आम्हाला त्यांचा ईव्ही वरचा दृष्टीकोन समजून घ्यायचा होता. आम्ही यूगव्ह इंडिया सोबत काम केले आणि ईव्हीएस बद्दल ग्राहकांची मते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, अशा उत्तरदात्यांशी बोललो, जे एकतर सध्याचे मालक आहेत किंवा आगामी वर्षात ईव्हीएस खरेदी करू इच्छिणारे लोक आहेत. परिणामी, आम्हाला भारतातील इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्याच्या मुख्य चिंता आणि अडथळे, ईव्ही मालकांना, उत्पादक आणि इच्छुकांना काय जाणून घ्यायचे आहे, ईव्ही-विशिष्ट विमा पॉलिसींसाठीची गरज आणि ईव्ही च्या आसपासची सुरक्षितता या बाबी अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकलो आहोत,” एको (ECKO)च्या मोटर अंडररायटिंग विभागाचे वरिष्ठ संचालक, अनिमेश दास म्हणाले.
अहवालात, ईव्हीशी संबंधित ज्ञानामधील अनेक उणीवांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
उदाहरणार्थ, चिंताजनक गोष्ट म्हणजे, ६३% उत्तरदात्यांना ही बाब माहित नाही की, ईव्ही ला लागलेली आग विझवण्यासाठी वाळू हा सर्वात सोयीचा उपाय आहे. बॅटरीच्या आयुष्याबाबत ज्ञानामध्ये देखील उणीवा आहेत. उदाहरणार्थ, ६६% लोक असे गृहीत धरतात की, बॅटरीचे आयुष्य फक्त २ ते ५ वर्षांपर्यंत असते. चांगली बातमी
अशी आहे की, १० पैकी ८ जण योग्यरित्या ओळखतात की, ईव्हीच्या बॅटरीच्या लाइफमध्ये चार्जिंगच्या वर्तनाची भूमिका महत्वाची आहे.
ईव्हीच्या मालकीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे विमा, आणि ईव्ही च्या वाढत्या लोकप्रियतेसह, सानुकूलित विमा उत्पादनांची मागणी देखील वाढली आहे. ७९% उत्तरदात्यांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या ईव्ही साठी सानुकूलित विमा उपाय हवा आहे आणि ६७% लोक, त्यासाठी प्रीमियम भरण्यास तयार आहेत. तथापि, ५३% लोकांनी सांगितले की, ईव्ही- विशिष्ट विमा उत्पादने प्रदान करणार्या विश्वसनीय भागीदारांची कमतरता आहे.
जेव्हा एखादी पॉलिसी खरेदी करण्याचा विषय येतो, तेव्हा ईव्ही च्या इच्छुकांनी आणि मालकांनी ऑनलाइन विमा प्रदात्यांचा पर्याय निवडला आहे. ५९% इच्छुकांना एको (ACKO) सारख्या ऑनलाइन कंपनीकडून पॉलिसी खरेदी करायची आहे.
अहवालातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ईव्हीशी संबंधित आणि ईव्हीशी संबंधित विविध पैलूंबद्दल जागरूकता निर्माण करण्याची तातडीची गरज आहे. ही बाब स्पष्ट आहे की, भारतीय लोक, ईव्हीएसबद्दल उत्साहित आहेत आणि ते कबूल करतात की ईव्हीएस, गतिशीलतेचे भविष्य आहे – परंतु बाजारातील माहितीचा अभाव आणि संवादातील उणीवेमुळे ती मागे पडली आहेत.
संपूर्ण अहवाल वाचण्यासाठी: आता डाउनलोड करा