मालकीचा अनुभव सुधारण्यासाठी किआ इंडियाने सुरू केले इंटिग्रेटेड कम्युनिकेशन अप्लिकेशन ‘मायकिआ’

  • विक्री, सर्व्हिस, ग्राहक रीवार्ड्स आणि इतर महत्वपूर्ण वैशिष्ट्यांसह विविध लाभ देणारे उद्योगातील पहिला उपक्रम

मुंबई : देशातील सर्वात जलद वाढणारी कार निर्माती किआ इंडियाने (KIA) ग्राहकांचा मालकी अनुभव सुधारण्यासाठी आणि इतर महत्वपूर्ण वैशिष्ट्यांसह विक्री, सर्व्हिस, ग्राहक रीवार्ड्स यांसह विविध लाभ देण्यासाठी इंटिग्रेटेड कस्टमर कम्युनिकेशन ॲप्लिकेशन ‘मायकिआ’ (mykia) चा परिचय करून दिला आहे. मायकिआ ॲपच्या मदतीने, ग्राहक त्यांच्या कार मालकी प्रवासाच्या प्रत्येक पैलूची काळजी घेऊ शकतात.

तिच्या विक्री फिचरमध्ये टेस्ट ड्राईव्ह साठी विनंती करणे, कोट मिळवणे, डिजी-कनेक्ट मधून व्हिडियो कन्सल्टेशनची विनंती करणे, किआ कार बुक करणे इत्यादींचा समावेश आहे. विक्री नंतरच्या फिचर्समध्ये सर्व्हिस बुक आणि ट्रॅक करणे, सर्व्हिस कॉस्ट कॅलक्युलेटर, इलेक्ट्रॉनिक व्हेइकल हेल्थ चेक (EVHC) रिपोर्ट, सर्व्हिस खर्चाचा सारांश आणि सर्व्हिस फीडबॅक यांचा समावेश असतो.

किआ इंडियाने “मायकिआ रीवार्ड्स”चा सुद्धा परिचय दिला – युनिक आणि आकर्षक लॉयल्टी प्रोग्राम जो तीच्या ग्राहकांसाठी तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून, किआचे ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅजेट, फूड आणि बिव्हरेज, फॅशन आणि लाईफस्टाईल, हॉटेल्स आणि ट्रॅव, स्पोर्ट्स ते कॉस्मॅटिक्स आणि ज्वेलरी पर्यंत विविध ब्रॅण्ड्सवर विविध डील्स आणि सूट च्या रूपात रीवार्ड्स प्राप्त करू शकतात. मायकिआ ॲप चा वापर करून, ग्राहक या ऑफर्स निवडू शकतात, त्या ॲक्टीव करू शकतात आणि त्या स्टोअर वर ऑनलाईन किंवा ऑफलाईन रिडीम करू शकतात.

ॲपवर आणखी काही महत्वपूर्ण फिचर्स उपलब्ध आहेत, जसेकी किआ न्युज, सर्व्हिस नोटिफिकेशन्स, डिजी वॉलेट, माय कार डॅशबोर्ड, डीलर लोकेटर च्या माध्यमातून पसंतीचे डीलर लोकेट करणे, टीप्स आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs).

किआ इंडियाचे उपाध्यक्ष आणि विक्री व मार्केटींग प्रमुख हरदीप सिंग ब्रार म्हणाले, “आमच्या निराळ्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिस ऑफरिंग यांमुळे भारतीय ग्राहकांचा आजच्या तारखेपर्यंत आम्हाला मोठा प्रतिसाद मिळाला. मायकिआ यासारख्या उपक्रमासह, आम्हाला विक्री, सर्व्हिस मध्ये डिजीटल नवकल्पकता आणायची आहे आणि त्याही पलीकडे काहीतरी करायचे आहे जे ग्राहकांना मालकी प्रवासा मधून वेगळा आणि सर्वोत्तम अनुभव देईल. आम्हाला विश्वास आहे की, तांत्रीक नवकल्पकता ग्राहकांना जोडून ठेवणे आणि समाधान यांमध्ये महत्वाची भूमिका पार पाडते आणि मायकिआ सह, आम्ही ग्राहकांचा अनुभव सुधारण्याची योजना करत आहोत.”

माय किआ ॲप्लीकेशन अँड्रॉईड आणि iOS या दोन्ही यूजरसाठी उपलब्ध आहे. कस्टमाईज आर्किटेक्चर सह एक मालकी सोल्युशन असल्याने, ग्राहक डेटा गोपनियतेसह हे परिपूर्ण सुरक्षित समाधान आहे. 2 आठवड्यांच्या छोट्या कालावधीत, किआ इंडियाला आधीच माय किआ ॲपवर 10,000 पेक्षा जास्त नोंदणी प्राप्त झाल्या आहेत.