नवीन डिफेण्‍डरने ७५ व्‍या लिमिटेड एडिशनसह आपल्‍या श्रेणीला केले सन्‍मानित

पहिल्‍यांदाच डिफेण्‍डर श्रेणीच्‍या एक्‍स्‍टीरिअर फिनिशमध्‍ये ग्रॅस्‍मेरे ग्रीन रंगाचा वापर करण्‍यात आला आहे. हा रंग खासकरून ७५व्‍या लिमिटेड एडिशनसाठी राखून ठेवण्‍यात आला होता. या लिमिटेड एडिशन वेईकलमधील ५०.८ सेमी (८० इंच) अलॉई व्‍हील्‍सच्‍या मध्‍यभागी असलेल्‍या कॅप्‍सना देखील ग्रॅस्‍मेरे ग्रीन रंग देण्‍यात आला आहे.

  • नवीन लिमिटेड-एडिशन डिफेण्‍डर आकर्षक एस्‍क्‍टीरिअर रंग व अद्वितीय वैशिष्‍ट्यांसह लँड रोव्‍हरच्‍या उल्‍लेखनीय टप्‍पा केला साजरा

मुंबई : १९४८ मध्‍ये ॲमस्‍टरडॅम मोटर शोमध्‍ये सिरीज आय (I Series) सादर करण्‍यात आली. लँड रोव्‍हर डिफेण्‍डर (Land Rover Defender) ७५व्‍या लिमिटेड एडिशनसह वर्धापन दिन साजरा करत आहे.

९० किंवा १०० बॉडी डिझाइन्‍समध्‍ये उपलब्‍ध डिफेण्‍डर ७५व्‍या लिमिटेड एडिशनमध्‍ये विशेष एक्‍स्‍टीरिअर डिझाइन थीमसह (Exclusive Exterior Design Theme) अद्वितीय वैशिष्‍ट्ये (Unique Features) आहेत, जी व्‍हील्‍स व इंटीरिअर फिनिशेसना साजेसे अशा प्रख्‍यात ग्रॅस्‍मेरे ग्रीन पेंटमध्‍ये (Grasmere Green Paint) फिनिश करण्‍यात आली आहेत.

पहिल्‍यांदाच डिफेण्‍डर श्रेणीच्‍या एक्‍स्‍टीरिअर फिनिशमध्‍ये ग्रॅस्‍मेरे ग्रीन रंगाचा वापर करण्‍यात आला आहे. हा रंग खासकरून ७५व्‍या लिमिटेड एडिशनसाठी राखून ठेवण्‍यात आला होता. या लिमिटेड एडिशन वेईकलमधील ५०.८ सेमी (८० इंच) अलॉई व्‍हील्‍सच्‍या मध्‍यभागी असलेल्‍या कॅप्‍सना देखील ग्रॅस्‍मेरे ग्रीन रंग देण्‍यात आला आहे. एक्‍स्‍टीरिअरच्‍या आकर्षकतेला ७५ इअर्स ग्राफिक आणि सेरेस सिल्‍व्‍हर बंपर्स परिपूर्ण करतात.

डिफेण्‍डरच्‍या टिकाऊ व वैविध्‍यपूर्ण इंटीरिअरमध्‍ये देखील असाच बदल करण्‍यात आला आहे. क्रॉस कार बीमला ग्रॅस्‍मेरे ग्रीन पावडर कोटचे फिनिशिंग देण्‍यात आले आहे आणि क्रॉस कार बीम एण्‍ड कॅप्‍सवर लेझर-युक्‍त फिनिशिंग आहे. सीट्सना रेसिस्‍ट एबोनी रंग देण्‍यात आला असून सेंटर कन्‍सोलवरील हॉकी स्टिकमध्‍ये डिफेण्‍डरमध्‍ये उपलब्‍ध सर्वात प्रबळ फॅब्रिक रोबूस्‍टेक साहित्‍य आहे.

डिफेण्‍डरचे लाइफसायकल चीफ इंजिनिअर स्‍टुअर्ट फ्रीथ म्‍हणाले, ‘’नवीन डिफेण्‍डर लाँच केल्‍यापासून जगभरातील ग्राहकांना ही वेईकल खूप आवडली आहे आणि या वेईकलप्रती मागणी वाढतच आहे. ही नवीन लिमिटेड एडिशन आकर्षक रंग व वैशिष्‍ट्यांसह मागील ७५ वर्षांच्‍या वारसाला साजरे करते. या वेईकलमध्‍ये नवोन्‍मेष्‍कारी नवीन तंत्रज्ञान आहेत, जसे हायब्रिड इलेक्ट्रिक पॉवर, कॉन्फिग्‍युरेबल टेरेन रिस्‍पॉन्‍स, सॉफ्टवेअर ओव्‍हर द एअर अपडेट्स आणि अद्वितीय ऑल-टेरेन क्षमता.’’

लिमिटेड एडिशनमध्‍ये उच्‍च वैशिष्‍ट्यपूर्ण एचएसईसह सर्वसमावेशक प्रमाणित इक्विपमेंट आहे. नवोन्‍मेष्‍कारी तंत्रज्ञानामध्‍ये ३डी सराऊंड कॅमेरा, कॉन्फिग्‍युरेबल टेरेन रिस्‍पॉन्‍स, मेरिडियन साऊंड सिस्टिम, मॅट्रिक्‍स एलईडी फ्रण्‍ट लायटिंग, २८.९५ सेमी (११.४ इंच) पीवी प्रो इन्‍फोटेन्‍मेंट सिस्टिम, हेड-अप डिस्‍प्‍ले आणि वायरलेस डिवाईस चार्जर यांचा समावेश आहे.

सर्व ७५व्‍या लिमिटेड एडिशन मॉडेल्‍समध्‍ये फोल्डिंग फॅब्रिक रूफ किंवा स्‍लाइडिंग पॅनोरॅमिक रूफचा पर्याय देखील आहे. १४-वे ड्रायव्‍हर व पॅसेंजर हिटेड इलेक्ट्रिक मेमरी सीट्स, हिटेड स्‍टीअरिंग व्‍हील आणि थ्री झोन क्‍लायमेट कंट्रोलमधून अधिक आरामदायी राइडच्‍या अनुभवाची खात्री मिळते. सुधारित क्षमतेसाठी इलेक्ट्रिकली डिप्‍लॉयेबल टो बार आणि ऑल-सीझन टायर्सची पर्याय म्‍हणून भर करता येऊ शकते.

पॉवरट्रेन पर्यायांसंदर्भात ११० मॉडेल्‍समध्‍ये शक्तिशाली व कार्यक्षम पी४००ई प्‍लग-इन इलेक्ट्रिक हायब्रिड (पीएचईव्‍ही) असण्‍यासोबत पी४०० व डी३०० इंजेनियम पेट्रोल व डिझेल पर्यायांचा समावेश आहे. हे दोन्‍ही पर्याय मिड हायब्रिड इलेक्ट्रिक वेईकल (एमएचईव्‍ही) तंत्रज्ञानाचा वापर करत आणि डिसलेरेशन व बेकिंगमुळे कमी होणारी ऊर्जा परत मिळवत उत्तम पॉवर व इंधन इकोनॉमी देतात.

डिफेण्‍डरने ५० हून अधिक जागतिक पुरस्‍कार मिळवले आहेत, जसे टॉप गिअचा २०२० कार ऑफ द इअर, मोटरट्रेण्‍डचा २०२१ एसयूव्‍ही ऑफ द इअर आणि ऑटोकारचा बेस्‍ट एसयूव्‍ही २०२०, तसेच ५ स्‍टार युरो एनसीएपी सेफ्टी रेटिंग.

लँड रोव्‍हर एकमेक वेईकलच्‍या लाँचसह उदयास आली; आज एसयूव्‍हींचा आमचा समूह सात दशकांहून अधिक काळापासून लँड रोव्‍हरमध्‍ये सादर करण्‍यात आलेल्या नवोन्‍मेष्‍काराच्‍या अग्रणी उत्‍साहाला सादर करतो. आमच्‍या डिफेण्‍डर, डिस्‍कव्‍हरी व रेंज रोव्‍हर ब्रॅण्‍ड समूहांनी अद्वितीय क्षमता, वैविध्‍यता व लक्‍झरी दिली आहे, ज्‍यामधून आणखी यशस्‍वी ७५ वर्षांचा परिपूर्ण पाया दिसून येतो.

ठळक वैशिष्ट्ये

• एक्‍सक्‍लुसिव्‍ह एडिशन: डिफेण्‍डर नवीन डिफेण्‍डर ७५व्‍या लिमिटेड एडिशनसह लँड रोव्‍हरच्‍या ७५ वर्षांना साजरे करत आहे
• वारसायुक्‍त वैशिष्‍ट्ये: अद्वितीय ७५ इअर्स ग्राफिकसह एक्‍स्‍टीरिअर व इंटीरिअरमध्‍ये ग्रॅस्‍मेरे ग्रीनची भर करण्‍यात आली – ९९ व ११० बॉडी डिझाइन्‍समध्‍ये उपलब्‍ध
• अजूनही नाविन्‍यता आणत आहे: आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्‍ज जसे ३डी सराऊंड कॅमेरा, मॅट्रिक्‍स एलईडी हेडलाइट्स आणि कॉन्फिग्‍युरेबल टेरेन रिस्‍पॉन्‍स
• इलेक्ट्रिक कार्यक्षमता: ७५वी लिमिटेड एडिशन पी४००ई इलेक्ट्रिक हायब्रिड म्‍हणून उपलब्‍ध असण्‍यासोबत प्रत माइल्‍ड हायब्रिड तंत्रज्ञानाने युक्‍त पी४०० व डी३०० मध्‍ये उपलब्‍ध
• खास तुमच्‍यासाठी: नवीन डिफेण्‍डर ७५वी लिमिटेड एडिशन आता www.landrover.in येथे कॉन्फिग्‍युअरसाठी उपलब्‍ध आहे किंवा ऑर्डर करण्‍यासाठी तुमच्‍या स्‍थानिक रिटेलरला भेट द्या