प्रतिक्षा संपली! आजपासून सुरू होतेय Mahindra XUV 700 ची डिलिव्हरी

Mahindra XUV 700 SUV चे बुकिंग 7 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. कंपनीने बुकिंग सुरू केल्यापासून लोकांनी या कारमध्ये प्रचंड रस दाखवून तिचं बुकिंग करण्याचा सपाटा लावलाय.

    नवी दिल्ली : प्रसिद्ध कार निर्माता Mahindra & Mahindra ने अलीकडेच त्यांची बहुप्रतिक्षित SUV Mahindra XUV 700 लाँच केली आहे. या कारला भारतातील लोकांचे खूप प्रेम मिळत आहे आणि लोक वेगाने बुकिंग करत आहेत. बुकिंग करणारे ग्राहक गाडीच्या डिलिव्हरीची वाट पाहत होते. मात्र, आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे कारण कंपनी आजपासून या कारची डिलिव्हरी सुरू करत आहे.

    7 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे बुकिंग

    Mahindra XUV700 SUV चे बुकिंग 7 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. कंपनीने बुकिंग सुरू केल्यापासून लोकांनी या कारमध्ये प्रचंड रस दाखवून तिचं बुकिंग करण्याचा सपाटा लावलाय.

    इंजिनचे दोन पर्याय मिळतील

    कंपनी या कारमध्ये टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनचा पर्याय देत आहे. ही दोन्ही इंजिन स्वयंचलित आणि मॅन्युअल गिअरबॉक्स पर्यायांसह येणार आहेत. जेणेकरून ग्राहक त्यांच्या गरजेनुसार व्हेरिएंट निवडू शकतील.

    Mahindra XUV 700 च्या व्हेरिएंटच्या किमती

    Mahindra XUV 700 MX Petrol – Rs- 11.99 लाख
    Mahindra XUV 700 MX Diesel – Rs- 12.49 लाख

    Mahindra XUV 700 AX3 Petrol – Rs- 13.99 लाख
    Mahindra XUV 700 AX5 Petrol – Rs- 14.99 लाख

    Mahindra XUV 700 SUV त उंच उभ्या क्रोम स्लेटसह एक नवीन काळी ग्रिल आणि पुढच्या बाजूला एक नवीन लोगो आहे. यात एलईडी डीआरएलसह नवीन एलईडी हेडलॅम्प, मोठ्या ट्विन C-आकाराचे एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स मिळतात. याला नवीन फ्लश-फिटिंग डोअर हँडल, इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या ORVMs सह एकात्मिक टर्न सिग्नल्स आणि फ्लेर्ड व्हील आर्क्स मिळतात, ज्यामुळे त्याला एक खडबडीत लुक मिळतो. त्याच्या मागील बाजूस स्टायलिश रॅपराउंड एलईडी टेललॅम्पसह टेलगेट आहे.