vitara brezza

भारतात ३० जून रोजी मारुती सुझुकी इंडिया नेक्स्ट जनरेशन कार विटारा ब्रेझा ( Vitara Brezza) लाँच करणार आहे. आनंदाची बातमी म्हणजे ग्राहक ११,००० रुपयांच्या टोकन रकमेसह कंपनीच्या कोणत्याही एरेना शोरूममधून किंवा वेबसाइटवरून नवीन ब्रेझा (Brezza) बुक करू शकतात.

    मारुती सुझुकी (Maruti Suzuki) इंडियाने सोमवारी आपल्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही ब्रेझाच्या आगामी प्रकारासाठी बुकिंग सुरू करण्याची घोषणा केली. ही कार या महिन्याच्या शेवटी लाँच होणार आहे. ब्रेझामध्ये (Brezza) इलेक्ट्रीक सनरूफसारखे अनेक फिचर्स देण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे.

    यात सिक्स-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायासह नेक्स्ट जनरेशन पॉवरट्रेन देखील आहे. आनंदाची बातमी म्हणजे ग्राहक ११,००० रुपयांच्या टोकन रकमेसह कंपनीच्या कोणत्याही एरेना शोरूममधून किंवा वेबसाइटवरून नवीन ब्रेझा (Brezza) बुक करू शकतात.

    भारतात ३० जून रोजी मारुती सुझुकी इंडिया नेक्स्ट जनरेशन कार विटारा ब्रेझा ( Vitara Brezza) लाँच करणार आहे. Vitara Brezza मध्ये ग्राहकांना १.५ लीटर K15C DualJet पेट्रोल इंजिन पाहायला मिळेल. जे १०३ बीएचपी आणि १३७ एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. यात फाईव्ह-स्पीड मॅन्युअल आणि एक नवीन सिक्स-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देखील मिळेल. ही एसयुव्ही (SUV) सनरूफ, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट आणि ६ एअर बॅग यांसारख्या फीचर्ससह सुसज्ज असेल. यासोबतच नवीन ब्रेझामध्ये तुम्हाला अपडेटेड नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट सिस्टम देखील पाहायला मिळेल. या कारची किंमत मात्र लाँचिंगच्या दिवशीच समजेल.