पुढल्या महिन्यात अवतरणार New Maruti Celerio, उत्तम लुक, फीचर्स आणि मायलेजची आशा

New Gen Maruti Celerio ची अलीकडेच ऑफिशियल टीव्हीसी शूट दरम्यान झलक पहायला मिळाली, ज्यात काही माहिती समोर आली आहे. नवीन सिलेरियोत उत्तम डिझाईन तर पहायला मिळेलच, सोबतच ही आकारानेही मोठी असेल आणि यात केबिन स्पेसही अधिक असेल. असं मानलं जात आहे की, ही मारुती बलेनोशी अधिक मिळतीजुळती असण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली : New Generation Maruti Celerio Launch Date India : भारतात सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी Maruti Suzuki लवकरच भारतात आपल्या अनेक कार्सच्या नेक्स्ट जनरेशन मॉडेल्स सादर करणार आहे, ज्यात मिनी हॅचबॅक Next Gen Maruti Suzuki Alto सोबतच New Generation Maruti Celerio ही आहे. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार येत असलेल्या वृत्तांनुसार नवी मारुती सिलेरियो भारतात फेस्टिवल सिझनमध्ये लाँच करण्यात येणाची शक्यता असून लाँच डेट शक्यतो १० नोव्हेंबर असणार आहे. उत्तम लुक आणि फीचर्सवाली या नेक्स्ट जनरेशन हॅचबॅच कारची लोकं खूप दिवसांपासून आतुरतेने वाट पहात आहेत.

    खूप साऱ्या नवीन गोष्टी पहायला मिळतील

    New Gen Maruti Celerio ची अलीकडेच ऑफिशियल टीव्हीसी शूट दरम्यान झलक पहायला मिळाली, ज्यात काही माहिती समोर आली आहे. नवीन सिलेरियोत उत्तम डिझाईन तर पहायला मिळेलच, सोबतच ही आकारानेही मोठी असेल आणि यात केबिन स्पेसही अधिक असेल. असं मानलं जात आहे की, ही मारुती बलेनोशी अधिक मिळतीजुळती असण्याची शक्यता आहे. येणारी सिलेरियो HEARTECT प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येणार आहे,यावर याआधी S-Presso आणि WagonR सारख्या कार्स तयार झाल्या आहेत. यात हनीकंब पॅटर्नमध्ये नवीन ओव्हल ग्रील, क्रोम स्लेट, मोठा हेडलँप, व नवीन बंपर, मोठा फॉगलँप, नवीन टेललँप आणि ORVM पहायला मिळेल.

    इंजिन आणि फीचर्स असतील खास

    New Gen Maruti Celerio दोन पेट्रोल इंजिनसह सादर करण्यात येण्याची शक्यता आहे. याचा 1.0 लीटर 3 सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन 69bhp पर्यंतची पावर आणि 91Nm चा टॉर्क जनरेट करू शकेल, तर याचं 1.2 लीटर 4 सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन 82bhp ची पावर आणि 113Nm चा टॉर्क जनरेट करण्याची शक्यता आहे. ही कार 5 स्पीड मॅन्युअल आणि AMT ट्रान्समिशन पर्यायासह सादर करण्यात येऊ शकते. नवीन सिलेरियोचं सीएनजी व्हेरिएंटही लाँच होण्याची शक्यता अधिक आहे. फीचर्सबाबत सांगायचं झालं तर, येणाऱ्या सिलेरियोच्या डॅशबोर्डमध्ये इंटिग्रेटेड 7 इंचाची टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टिम असेल, जी ॲप्पल कार प्ले आणि अँड्रॉईड ऑटो सपोर्टसह असणार आहे. यात मल्टी फंक्शनल स्टियरिंग व्हिल्स सह नवीन सीटकव्हर्सचा नवा लुकही पहायला मिळेल.